Download App

Ind Vs Pak : भारताने परंपरा राखली! 4 षटकं राखत पाकिस्तानवर दणदणीत विजय…

भारताने पाकिस्तानला अक्षरश: लोळवल्याचं चित्र सामन्यात पाहायला मिळालंय. भारताने 4 षटकं राखून पाकिस्तानवर दणदणीत विजय मिळवलायं.

Ind VS Pak : भारताने पाकिस्तानला अक्षरश: लोळवल्याचं चित्र सामन्यात पाहायला मिळालंय. भारताने 4 षटकं राखून पाकिस्तानवर दणदणीत विजय मिळवलायं. भारताने परंपरा राखत पाकिस्तान संघाचा (Ind VS Pak) धुव्वा उडवलायं. पाकिस्तानने दिलेल्या 128 धावांचा पाठलाग करत भारताने अवघ्या 15.5 षटकांत 131 धावा केल्या आहेत. आशिया कप 2025 स्पर्धेत दुबईत झालेल्या सामन्यात भारताने पाकिस्तानवर दणदणीत विजय मिळवलायं. सुर्यकुमार यादवने आपली बॅट तळपवत पाकच्या भेदक गोलंदाजीवर मारा केलायं.

पाकिस्तान विरुद्ध सामन्याआधी टीम इंडियाला धक्का, शुभमन गिलला दुखापत; नक्की काय घडलं?

पाकिस्तानने दिलेल्या आव्हानाला भारतीय संघाची पहिली जोडी अभिषेक आणि शुभमनने षटकार, चौकाराने सुरुवात केली. मात्र पाकच्या भेदक गोलंदाजासमोर ही जोडी जास्त वेळ टिकली नाही. दुसऱ्याच ओव्हरला शुभमन गिल अवघ्या 10 धावा करीत तंबूत परतला. त्यापाठोपाठ अभिषेक शर्माने 31 धावांचा पल्ला गाठत तंबूत परतला. अयुबच्या गोलंदाजीवर शॉट मारताना अभिषेक चुकला आणि झेलबाद झाला.

पोलीस भरतीची तयारी करणाऱ्यांना गुडन्यूज! वयोमर्यादा ओलांडली तरी संधी मिळणार

भारताने पॉवर प्लेच्या 6 षटकात दोन गडी गमवून 61 धावांची खेळी केली. शुबमन गिल 10, तर अभिषेक शर्मा 31 धावांवर बाद झाला. तर कर्णधार सूर्यकुमार यादव आणि दुबे मैदानात आहेत. पाकिस्तानच्या सॅम अयुब याने टीम इंडियाला तिसरा झटका दिला. सॅमने तिलक वर्मा याला आऊट केलं. तिलक आणि सूर्यकुमार यादव या दोघांनी तिसऱ्या विकेटसाठी 56 रन्सची पार्टनरशीप केली. तिलकने 31 बॉलमध्ये 31 धावा केल्या. अखेर 16 व्या षटकांच्या पाचव्या बॉलवर सुर्यकुमारने षटकार मारत भारतीय संघाला विजयी बनवलंय.

समस्यांचं रुपांतर संधीत करणाऱ्यांच्या यादीत आपले नाव असायला हवं; मंत्री नितीन गडकरी यांचं प्रतिपादन

follow us