व्हीएसआरच्या मालकाची चौकशी करा; मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीत राष्ट्रवादीची मागणी

Ajit dada accident ची सीबीआय चौकशी तसेच व्हीएसआर कंपनीच्या मालकाची चौकशी करण्याची मागणी करण्यात आली.

Ajitdada's Accident

Investigate VSR owner in Ajitdada’s accident case NCP demands in meeting CM Fadnavis : अजित पवारांच्या अपघाताबाबत राष्ट्रवादीच्या नेत्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भेट घेतली. त्यावेळी अजित पवारांच्या विमान अपघाताची सीबीआय चौकशी तसेच व्हीएसआर कंपनीच्या मालकाची चौकशी करण्याची मागणी करण्यात आली.

या जिहादींना थांबवा आणि… नितेश राणे यांची केरला स्टोरी 2 च्या ट्रेलरवर प्रतिक्रिया देत चित्रपटाला जाहीर पाठिंबा

याबाबत राष्ट्रवादी काँग्रेसमार्फत आज 17 फ्रेब्रुवारी रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निवेदन देण्यात आले. यावेळी राष्ट्रीय कार्याध्यक्ष खासदार प्रफुल पटेल, उपमुख्यमंत्री श्रीमती सुनेत्रा अजितदादा पवार, प्रदेशाध्यक्ष खासदार सुनिल तटकरे, वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ, युवा नेते पार्थ पवार उपस्थित होते.

पिंपरी चिंचवड विद्यापीठातील “न्यूट्रिसोल 2026” चे कार्यकारी संचालक डॉ. गिरीश देसाईंच्या हस्ते उद्घाटन

यामध्ये व्हीएसआर कंपनीच्या मालकाची चौकशी करावी. त्यांच्या संचालकांची चौकशी करण्यात यावी. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीत राष्ट्रवादीने ही मागणी केली. तर मुख्यमंत्र्यांनी यावर याबाबत केंद्रीय गृह मंत्रालयाला पाठवणार पत्र पाठणार असल्याचं अश्वालन दिलं आहे.

अजितदादांच्या अपघाताची सीबीआय चौकशी करा, राष्ट्रवादीची मोठी मागणी तटकरेंची माहिती

दरम्यान याबाबत माध्यमांशी बोलताना सुनील तटकरे म्हणाले की, आमच्या सीबीआय चौकशीच्या मागणीच्या निवेदनाबाबत केंद्रीय गृहमंत्र्यांशी पत्रव्यवहार करण्याचं अश्वासन फडणवीसांनी दिलं. तसेच ज्या दिवशी ही दुर्देवी घटना घडली. त्या दिवशीच याच खात्याचे केंद्रीय मंत्री नायडू आणि केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ हे देखील तेथे उपस्थित होते. त्यामुळे या अपघाताची चौकशी करण्यासाठी स्वायत्त संस्था अगोदरच नेमलेली आहे. मात्र यामध्ये आणखी सखोल तपासासाठी आम्ही सीबीआय चौकशीची मागणी आहे.

follow us