Big Breaking : विधान परिषदेतील 12 आमदार नियुक्त प्रकरण पुन्हा लांबणीवर
Maharashtra VidhanParishad 12 MLA : विधानपरिषदेतील राज्यपाल नियुक्त 12 आमदारांच्या निर्णयावरील सुनावणी पुढे ढकलण्यात आली आहे. राज्यपाल नियुक्त 12 आमदारांची केस ही सर्वोच्च न्यायालयात सुरु आहे. आज या प्रकरणावर सुनावणी होणार होती. पण ही सुनावणी आता पुढे ढकलली आहे. आता दीड महिन्यांनंतर, 4 जुलैला या प्रकरणावर सुनावणी होणार आहे.
राज्यात महाविकास आघाडी सरकार असल्यापासून म्हणजे गेल्या तीन वर्षांपासून राज्यपाल नियुक्त 12 आमदारांच्या मुद्द्यावरुन मोठं राजकारण घडलेलं पाहायला मिळालं. राज्यात महविकास आघाडी सरकार असताना तत्कालीन राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी राज्यपाल नियुक्त आमदारांची राज्य सरकारने शिफारस केल्यानंतरही नेमणूक केली नाही. त्यावरुन मोठा वादही पाहायला मिळाला होता.
Video : ‘भाजपला नैतिकतेची शिकवणी पवार साहेबांसाठी कठीणच’.. फडणवीसांचा खोचक टोला
राज्यात शिंदे-फडणवीस सरकार आल्यानंतर नव्या सरकारकडून राज्यपाल नियुक्त आमदार नेमणून करण्यासाठी हालचाली सुरु केल्या होत्या. त्या पार्श्वभूमीवर या निर्णयाला स्थगिती देण्यासाठी न्यायालय आव्हान दिले होते. त्यावर आज सुनावणी होणार होती.
Video : अखेर अजितदादांनी वचपा काढलाचं; म्हणाले, इथं रडण्यापेक्षा…
राज्याच्या विधान परिषदेत एकूण सदस्यसंख्या ही 78 इतकी आहे. यापैकी 12 जागा या राज्यपाल नियुक्त असतात. या 12 जागांवर विविध क्षेत्रातील दिग्गजांना राज्यपालांकडून संधी दिली जाते. त्यासाठी राज्य सरकार सदस्यांची नावं सूचवतं आणि त्याबाबतचा प्रस्ताव पाठवतं. पण महाविकास आघाडी सरकारने पाठवलेली 12 नावे तत्कालीन राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी मंजूर केली नाहीत.