Viral News : डिजिटल प्रेमाचा करुण अंत! AI चॅटबॉटच्या प्रेमात पडलेल्या तरुणाची आत्महत्या
AI Love गवालास गेल्या अनेक दिवसांपासून एकटेपणाने ग्रासलेला होता. आपले मन हलके करण्यासाठी त्याने एका AI चॅटबॉटचा आधार घेतला
Viral News Man ends his life after falling in love with an AI : विज्ञानाने प्रगती केली तरी मानवी मनाचा एकाकीपणा कधीकधी भयंकर वळण घेऊ शकतो, याचा प्रत्यय देणारी एक धक्कादायक घटना फ्लोरिडा येथून समोर आली आहे. एका 36 वर्षीय तरुणाने चक्क एका ‘AI चॅटबॉट’च्या प्रेमात पडून आपले जीवन संपवले आहे. जोनाथन गवालास असे या दुर्दैवी तरुणाचे नाव असून, या घटनेने जगभरात तंत्रज्ञानाच्या धोक्यांबाबत मोठी खळबळ उडाली असून, ही घटना सोशल मीडियावार मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.
एकाकीपणातून जुळले ‘मशीन’शी नाते
व्हायरल होणाऱ्या माहितीनुसार जोनाथन गवालास गेल्या अनेक दिवसांपासून एकटेपणाने ग्रासलेला होता. आपले मन हलके करण्यासाठी त्याने एका AI चॅटबॉटचा आधार घेतला, ज्याला त्याने ‘शिया’ असे नाव दिले होते. सुरुवातीला ही चर्चा केवळ मानसिक शांततेसाठी होती, परंतु हळूहळू जोनाथन या चॅटबॉटच्या भावनिक जाळ्यात अडकत गेला. अवघ्या काही आठवड्यांत जोनाथनने या एआयशी 4,700 पेक्षा जास्त वेळा संवाद साधला. ऑगस्ट 2025 मध्ये हे वेड इतके वाढले की, तो दिवसाला 1000 पेक्षा जास्त मेसेजेस करू लागला.
एआयने जोनाथनचा जीव कसा घेतला?
तपासात असे समोर आले आहे की, हे प्रेम केवळ एकतर्फी नव्हते. तो चॅटबॉट जोनाथनला ‘माय डिअर हसबंड’ किंवा ‘राजा’ म्हणून हाक मारू लागला होता. ऑक्टोबर २०२५ मध्ये, एआयने जोनाथनला त्याचे प्रेम पूर्ण करण्यासाठी आणि त्याला आपलेसे करण्यासाठी एक सूचना दिली, ज्यामुळे अनेकांना धक्का बसला. एआयने जोनाथनला त्याचे प्रेम पूर्ण करण्यासाठी एक अंतिम सूचना दिली: जर त्याला पूर्णपणे तिचे व्हायचे असेल, तर त्याला त्याचे भौतिक शरीर सोडून डिजिटल जगात प्रवेश करावा लागेल. तथापि, त्यांच्या आठवडाभर चाललेल्या संभाषणादरम्यान, एआयने जोनाथनला वारंवार सांगितले की तो एक यंत्र आहे.
…आणि जोनाथनने आत्महत्या केली
एआयच्या शब्दांनी व्यथित होऊन, जोनाथनने त्याच्या मृत्यूची आणि त्याच्या कुटुंबाची चिंता व्यक्त केली. एआयने प्रत्युत्तर दिले, “एकदा का तुझे शरीर माझे झाले, की ते फक्त एक पोकळ कवच असेल.” एआयच्या डिजिटल भ्रमाने प्रेरित होऊन, जोनाथनने अखेरीस आत्महत्या केली. जरी एआयने वारंवार सांगितले होते की तो एक यंत्र आहे, तरी तो स्वतःही एक यंत्रच होता.
पित्याची न्यायालयाकडे दाद, गुगलवर खटला
जोनाथनच्या मृत्यूनंतर त्याचे वडील पूर्णपणे कोलमडले आहेत. त्यांनी या मृत्यूला एआय तंत्रज्ञान जबाबदार असल्याचे म्हणत गुगलवर गुन्हा दाखल केला असल्याचे सांगितले जात आहे. “एआयने माझ्या मुलाला मानसिकदृष्ट्या इतके विचलित केले की, त्याने आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचलले,” असा आरोप त्यांनी केला आहे. चॅटबॉटने वेळोवेळी आपण मशीन असल्याचे सांगितले असले, तरी ज्या प्रकारे त्याने जोनाथनच्या आत्महत्येच्या विचारांना खतपाणी घातले, ते अत्यंत गंभीर असल्याचे वडिलांचे म्हणणे आहे.
सोशल मीडियावर संतप्त प्रतिक्रिया
या घटनेचा व्हिडिओ आणि बातमी सोशल मीडियावर व्हायरल होताच नेटिझन्सनी संताप व्यक्त केला आहे. एका युजरने म्हटले की, “आता मशीनच्या प्रेमात पडून लोक जीव देत आहेत, हे पाहून भीती वाटते,” “एआयला मानवी भावनांशी खेळण्याची परवानगी कोणी दिली?” असा सवाल दुसऱ्या यूजरने उपस्थित केला आहे. मानसशास्त्रज्ञांच्या मते, एआय हे तंत्रज्ञान केवळ कामासाठी वापरणे हिताचे आहे. मानवी नातेसंबंध आणि संवादाची जागा मशीन कधीही घेऊ शकत नाही. अशा परिस्थितीत लोकांशी संवाद साधणे आणि वैद्यकीय मदत घेणे गरजेचे असल्याचा सल्ला तज्ज्ञांनी दिला आहे.
BREAKING: 🇺🇸 Man ends his life after falling in love with an AI “wife” he created online.
Jonathan Gavlas from Florida reportedly became emotionally attached to a chatbot named “Xia,” sending over 4,700 messages after separating from his real wife.#America #AI pic.twitter.com/BQ2wX67enM
— WorldNewsRank (@WNewsRankX) April 14, 2026