महाराष्ट्राचे ‘ट्रेडिंग गुरू’च्या क्लासवर मोठी कारवाई, सेबीच्या रडारवर आलेले अवधूत साठे आहेत तरी कोण?

मुंबई: सेबीच्या (SEBI) अंमलबजावणी पथकाने २० ऑगस्टला अवधूत साठे (Avadhoot Sathe) यांच्या कर्जत (Karjat) येथील कार्यलयात छापे टाकले. साठे यांच्या चुकीच्या सल्ल्यांमुळे गुंतवणूकदारांचे पैसे बुडाल्याच्या तक्रारींनंतर सेबीने ही कारवाई केली. या कारवाईमुळे शेअर बाजारातील (Stock market) प्रशिक्षण देणाऱ्या संस्थांवरही आगामी काळात कायदेशीर कारवाईचा बडगा उगारला जाऊ शकतो.
Dream 11, MPL, Bingo ॲप्सवर बंदी; ऑनलाइन गेमिंग विधेयकला राष्ट्रपतींची मंजुरी
सेबीने कर्जत येथील अवधूत साठे यांच्या ट्रेडिंग अकादमीमध्ये कथितरित्या शोध आणि जप्तीची कारवाई केल्याचे वृत्त एका वेबसाईटने दिलं. साठे यांच्याविरुद्ध कारवाई करण्यापूर्वी न्यायालयाची परवानगी घेण्यात आल्याची माहिती आहे. सेबीने फॉरेन्सिक विश्लेषणासाठी डिजिटल उपकरणे आणि व्यापाराशी संबंधित डेटा जप्त केला आहे.
अवधूत साठे १९९१ पासून बाजारपेठेत सक्रिय आहेत. ते मध्य मुंबईतील दादर येथील एका साध्या चाळीत वाढले. नंतर ते त्यांच्या कुटुंबासह मुलुंड येथे स्थलांतरित झाले. त्यांच्याकडे अभियांत्रिकी पदवी आहे. साठे यांनी हेक्सावेअर टेक्नॉलॉजीजमधून सॉफ्टवेअर उद्योगात आपल्या कारकिर्दीची सुरुवात केली. ते परदेशातही गेले आणि काही काळ अमेरिका, सिंगापूर आणि ऑस्ट्रेलियामध्ये नोकरी केली. २००८ मध्ये नोकरी सोडून त्यांनी फायनान्शिअर सल्लागार म्हणून प्रशिक्षण देण्याचा निर्णय घेतला.
जरांगे मुंबईत धडकण्याआधीच मोठा निर्णय, मराठा आरक्षण उपसमितीचं अध्यक्षपद विखेंकडे
साठेंच्या युट्यूब चॅनलचे 9 लाखांहून अधिक सबस्क्रायबर्स
साठे हे त्यांच्या यूट्यूब चॅनलद्वारे लाखो लोकांना शेअर बाजाराचे धडे देतात. त्यांचे यूट्यूब चॅनलचे 9 लाखांहून अधिक सबस्क्रायबर्स आहेत. येथे ते शेअर बाजारातील रणनीती, चार्ट विश्लेषण आणि गुंतवणुकीच्या टिप्स देतात. त्यांच्या प्रशिक्षणामुळे अनेकांनी ट्रेडिंग सुरू केले, पण काही गुंतवणूकदारांनी त्यांच्या सल्ल्यांमुळे मोठे नुकसान झाल्याचा आरोप केला आहे. साठे यांच्या जाहिरातींमध्ये अवास्तव नफ्याच्या हमी दिल्याचाही दावा आहे.
या कारवाईमुळे साठे यांच्या विद्यार्थ्यांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. काहींनी त्यांच्या प्रशिक्षणाचे समर्थन केले, तर काहींनी त्यांच्या दाव्यांवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. साठे यांनी या प्रकरणावर अद्याप कोणतेही अधिकृत निवेदन दिलेले नाही. सेबीच्या या पावलांमुळे गुंतवणूकदारांना खोट्या सल्ल्यांपासून संरक्षण मिळण्याची अपेक्षा आहे.
दरम्यान, सेबीचे सदस्य कमलेश वार्ष्णेय यांनी २२ ऑगस्ट २०२५ रोजी फिक्कीच्या कार्यक्रमात सांगितले की, फायनान्शियल इन्फ्लुएन्सर्सनी नियमांचे पालन न केल्यास कठोर कारवाई होईल. तसेच गुंतवणूकदारांनी केवळ सेबी-नोंदणीकृत सल्लागारांचा सल्ला घ्यावा आणि अवास्तव नफ्याच्या जाहिरातींवर विश्वास ठेवू नये, असंही ते म्हणाले. दरम्यान, साठे यांच्यावरील चौकशीचा निकाल काय लागतो, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.