Adani उद्योग समुहाच्या तारण Share चं पुढं काय? कंपनीनं स्पष्ट सांगितलं

Adani उद्योग समुहाच्या तारण Share चं पुढं काय? कंपनीनं स्पष्ट सांगितलं

Adani Share News : मागील दिवसांपासून उद्योपती गौतम अदानी (Gautam Adani) अडचणीत सापडले आहेत. हिंडेनबर्ग रिसर्चच्या अहवालामुळे गौतम अदानी यांच्या अदानी समूहाचे तारण शेअर्स (Adani Share News) सोडवण्यासाठी 1114 डॉलर्स अर्थात सुमारे 9 हजार कोटींचे प्री पेमेंट करणार आहेत. याबाबत कंपनीकडून एक निवेदन प्रसिध्द करण्यात आलं आहे.

यामध्ये अदानी पोर्टस, अदानी ग्रीन एनर्जी आणि अदानी ट्रान्समिशनचे शेअर्स असल्याचं कंपनीकडून प्रसिध्द करण्यात आलेल्या निवेदनात म्हंटलंय. कंपनीने निवेदनात म्हंटले की, अलीकडे बाजारातील चढ-उतार पाहता अदानींच्या सूचीबद्ध कंपन्यांच्या शेअर्सनी समर्थित समग्र प्रमोटर लिव्हरेज कमी करण्यासाठी प्रमोटर्सच्या कटीबद्धतेसाठी प्रयत्न सुरु आहेत.

प्रमोटर्सनी मॅच्युरिटीपूर्वी 1114 डॉलर्सचे प्री पेमेंट करण्याबाबत रक्कम पोस्ट केली असून हे जाहीर करताना आम्हाला आनंद होत असल्याचंही कंपनीच्या निवेदनात स्पष्ट करण्यात आलं आहे. हे सर्व शेअर-समर्थित वित्तपोषणाच्या प्री-पेमेंटसाठी प्रमोटर्सच्या आश्वासनाच्या निरंतरतेमध्ये असल्याचंही सांगण्यात आलंय.

दरम्यान, अमेरिकेच्या रिसर्च फर्म हिंडेनबर्गच्या अहवालामुळे अदानी समूहाच्या शेअरमध्ये चांगलीच घसरण झाल्याचं दिसून येतंय. त्यामुळे कंपनीकडून भागधारकांना दिलासा देण्याचा प्रयत्न कंपनीकडून करण्यात आला आहे.

अदानी समूहाकडून 1.1 अब्ज डॉलरचे कर्ज मुदतीआधीच फेडलेत, कर्ज फेडल्यानंतर समूहाकडून तारण शेअर्स सोडवण्यात आले आहेत. त्यानंतर कंपनीची अर्थिक परिस्थिती चांगली असल्याचा संदेश लोकांपर्यंत गेला पाहिजे, अशी चर्चाही सध्या बाजारात ऐकायला मिळत आहे.

दरम्यान, आपला व्यवसाय मोठ्या प्रमाणात वाढविण्यासाठी कंपन्यांकडून आपले शेअर्स तारण ठेऊन कर्ज घेतले जाते, त्यासाठी तारण म्हणून कंपनीकडून आपले शेअर्स ठेऊन कर्ज घेता येतं. बॅंकेमार्फतही हे कर्ज मिळवता येत असतं.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube