Glenn Maxwell: क्रिकेटमध्ये काहीही अशक्य नाही, असं म्हटलं जात. याचीच प्रचिती क्रिकेट चाहत्यांना अफगाणिस्तान-ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सामन्यात पाहायला मिळाली. ( AUSTRALIA VS AFGHANISTAN) दरम्यान ऑस्ट्रेलियन संघ कसा लढला? अफगाणिस्तानचं गणित नक्की कुठं चुकलं? याबद्दल अधिक सविस्तर जाणून घेण्यासाठी हा व्हिडीओ शेवटपर्यंत पाहा.
पक्षांतरबंदी किंवा अन्य कोणत्याही मुद्द्यावर एखादा सदस्य अपात्र ठरल्यास किती काळासाठी तो अपात्र ठरू शकतो याबाबत नेहमीच संभ्रम आहे. याबाबत सर्वोच्च न्यायालयाने आपली भूमिका स्पष्ट केली आहे. तसेच काही राजकीय जाणकारांनी सुद्धा आपल मत व्यक्त केल आहे. यासंदर्भातील अनेक प्रश्नांची उत्तर देणारा हा व्हिडिओ…
विश्वचषक 2023 मध्ये दमदार एंट्री केल्यानंतर टीम इंडियातून मात्र ऑलराउंडर हार्दिक पांड्या विश्वचषक स्पर्धेतून बाहेर पडला आहे. हार्दिक पांड्याच्या जागी प्रसिद्ध कृष्णाची टीम इंडियामध्ये वर्णी लागली. टीम इंडियात हार्दिक पांड्याच्या जागी मोठ्या स्पर्धांचा अनुभव नसलेल्या प्रसिद्ध कृष्णालाच का संधी देण्यात आली असा प्रश्न आता विचारला जात आहे. याबद्दलचा आढावा.
कार्यकर्त्यांच्या भेटीदरम्यान फोटोच्या मधे आलेल्या बॉडीगार्डवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे चिडले.
राजस्थानचे माजी उपमुख्यमंत्री आणि काँग्रेसचे महत्वाचे नेते सचिन पायलट यांनी आगामी निवडणुकीसाठी काँग्रेसकडून उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. या अर्जात सचिन पायलट यांनी घटस्फोटीत असा उल्लेख केला आहे. या उमेदवारी अर्जातील उल्लेखामुळे आता राजकीय वर्तुळात सुद्धा सचिन आणि सारा पायलट यांच्या लव्ह स्टोरीची चर्चा चांगलीच रंगली आहे.
मराठा आरक्षणाबद्दल राज्य शासनाने दाखल केलेली क्युरेटिव्ह याचिका सर्वोच्च न्यायालयाने स्वीकारली आहे. परंतु क्युरेटिव्ह पिटीशन म्हणजे नक्की काय? कोणत्या कारणासाठी दाखल केल्या जातात? आणि त्यांची सुनावणी कोणापुढे केली जाते ? या सगळा प्रश्नांची उत्तरं सोप्या भाषेत समजून घ्या.