ज्येष्ठ किर्तनकार बाबा महाराज सातारकर यांचे वृद्धापकाळाने निधन झाले. ते 89 वर्षांचे होते. मागील काही दिवसांपासून आजरपणामुळे ते अंथरुनालाच खिळून होते. 26 ऑक्टोबर रोजी त्यांची प्राणज्योत मालवली. 27 ऑक्टोबर रोजी सायंकाळी पाच वाजता नेरुळमध्ये त्यांच्यावर अंत्यसंस्कार होणार आहेत. बाबा महाराज सातारकर यांच वारकरी संप्रदायात अमुल्य योगदान आहे.
आयसीसी विश्वचषक 2023 स्पर्धेत अफगाणिस्तान विरुद्ध पाकिस्तान यांच्यात खेळण्यात आलेला 22वा सामना खऱ्या अर्थाने ऐतिहासिक सामना ठरला आहे, कारण या सामन्यात अफगाणिस्तानने पाकिस्तानला पराभवाची धूळ चारत ऐतिहासिक विजय मिळवला आहे. या सामन्यातील काही विशेष बाबींवर आणि अफगाणिस्तानच्या कामगिरीबद्दल माहिती देणारा हा व्हिडीओ शेवटपर्यंत पाहा…
मराठा आरक्षणाचा मुद्दा राज्यात पेटुन उठला आहे.मराठा आरक्षणाचा मुद्दा चर्चेत येतो, तेव्हा कुणबी-मराठा हा मुद्दाही चर्चेत येतो.या पार्श्वभूमीर खरंच कुणबी आणि मराठा हे दोन्ही समाज एकच आहेत की वेगळे आहेत? ही माहिती समजून घेणे गरजेचे आहे.
मराठा आरक्षणाची मागणी लावून धरणाऱ्या मनोज जरांगे पाटील यांनी शिंदे सरकारला 40 दिवसांची मुदत दिली आहे. ही मुदत येत्या 24 ऑक्टोबरला संपणार आहे. मुदती नतंर पाटील यांनी आमरण उपोषण करणार असल्याची घोषणा केली. मात्र आमरण उपोषणासोबत त्यांच्याकडे अन्य काही पर्याय आहेत का? असेही प्रश्न विचारण्यात येत आहेत. याच प्रश्नाचा लेट्सअप मराठीने घेतलेला आढावा.
समाजातील विशेष विद्यार्थ्यांसाठी पुढाकार घेत त्यांना शिक्षण देणाऱ्या, या विद्यार्थ्यांना समाजातील मुख्य प्रवाहात आणण्यासाठी अहोरात्र मेहनत करणाऱ्या हॅप्पी किड्स नर्सरी स्कूलच्या संचालिका विशाखा नाडकर्णी यांची नवदुर्गा निमित्त विशेष मुलाखत…
ड्रग्ज माफिया ललित पाटीलला पोलीसांनी अटक केल्यानंतर याप्रकरणामध्ये कोणाकोणाचा हात आहे हे सांगेल असं ललितने सांगितल. त्याच्या या वक्तव्यामुळे पोलीस खाते, आरोग्य खाते, राज्य उत्पादन शुल्क खात्यामधील अनेक अधिकारी अडचणीत येण्याची शक्यता आहे. शिवाय ललित पाटील या एका व्यक्तीने नक्की किती मंत्र्यांना अडचणीत आणले याबद्दल जाणून घ्या….