‘बंटेंगे तो कटेंगे’ राज्यात चालले नाही, पण…; निकालापूर्वीच भुजबळांचे मोठे विधान…

Assembly constituency Result : राज्यातील २८८ विधानसभा मतदारसंघात (Vidhansabha Election) मतमोजणीला सुरुवात झाली. दरम्यान, आता निकालापूर्वीच राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी मोठं विधान केलं. बंटेंगे तो कटेंगे (Bantenge to Katenge) महाराष्ट्रात चालले नाही, असे भुजबळ यांनी म्हटलं. तसेच राज्यात महायुतीचे (Mahayuti) सरकार येणार असल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
विधानसभा निवडणूक प्राथमिक कल : विदर्भात देवेंद्र फडणवीस, नाना पटोले आघाडीवर…
छगन भुजबळ माध्यमांशी बोलताना म्हणाले की, राज्याचा निकाल हा स्पष्ट आहे. अनेक सर्वे करणाऱ्या संस्थांनी जनतेचा कल सांगितला. त्यामुळे राज्यात महायुतीचेच सरकार स्थापन होणार आहे. कोणी म्हणतं बहुमतापेक्षा महायुतीला दहा जागा जास्त असेल, कोणी महायुतीला बहुमतापेक्षा दहा जागा जास्त मिळतील, कोणी म्हणतं पन्नास जागा जास्त, कोणी म्हणतं पंचवीस जागा जास्त. त्यामुळं महायुतीचेच सरकार बनणार आहे. महाविकास आघाडीला जनतेने नाकारले आहे.
महाविकास आघाडी सत्ता स्थापन करणार, बहुमताचा आकडा जुळवण्यासाठी खास ‘प्लॅन’ तयार…
कोणत्या मुद्द्यावर निवडणुका झाल्या, त्यावर छगन भुजबळ म्हणाले, महाराष्ट्रात बटेंगे तो कटेंगे हा मुद्दा चाललेला नाही. मात्र राज्यातील लोकप्रिय योजना मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना चालली आहे. शेतकऱ्यांना मोफत वीज हा मुद्दा महायुतीसाठी जमेची बाजू ठरला. मुलींना मोफत शिक्षण हा मुद्दाही चालेलला आहे. महायुती सरकारने गरिबांना अनेक चांगल्या योजना दिल्या आहेत, त्या योजनेमुळं लोकांनी महायुतीला कौल दिल्याचं भुजबळ म्हणाले.
विधानसभा निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर 48 तासांत आम्ही सरकार स्थापन करू, असे छगन भुजबळ यांनी म्हटले आहे. राज्यात राष्ट्रपती राजवटीची अजिबात शक्यता नाही, आम्हीच सरकार स्थापन करू, त्याची काळजी करू नका, असा ठाम विश्वास भुजबळांनी व्यक्त केला.
पहिला कल काय सांगतो, विदर्भात कोण आघाडीवर?
विदर्भातील नागपूर दक्षिण-पश्चिम मतदारसंघातून देवेंद्र फडणवीस आघाडीवर आहेत. साकोलीतून नाना पटोले आघाडीवर आहेत. विदर्भात महायुती 12 जागांवर आघाडीवर, तर महाविकास आघाडी तीन जागांवर आघाडीवर आहे.
चंद्रपूर जिल्ह्यातील ब्रह्मपुरीतून विजय वडेट्टीवार, कामठीतून भाजपचे उमेदवार चंद्रशेखर बावनकुळे, हिंगणा मतदारसंघातून भाजपचे समीर मेघे आहेतवर आहेत. काटोलमधून भाजपचे चरणसिंह ठाकूर आघाडीवर आहेत.