‘मतदारसंघाकडे ढुंकुनही बघितले नाही पण आता…’, पृथ्वीराज चव्हाणांवर डॉ. अतुलबाबा भोसलेंचा हल्लाबोल

  • Written By: Published:
‘मतदारसंघाकडे ढुंकुनही बघितले नाही पण आता…’, पृथ्वीराज चव्हाणांवर डॉ. अतुलबाबा भोसलेंचा हल्लाबोल

Atulbaba Bhosle :  केंद्रात मंत्री, राज्यात मुख्यमंत्री, खासदार, आमदार अशी सगळी पदे गेली अनेक वर्षे विद्यमान आमदारांनी भोगली. केंद्रात आणि राज्यात सत्ता पदावर असताना त्यांनी या मतदारसंघाकडे ढुंकुनही बघितले नाही. मात्र आता निवडणुकीच्या तोंडावर आयटी हब, रोजगारासारखी खोटी आश्वासने देत ते फिरत आहेत. अशी खोटी आश्वासने देणाऱ्या विद्यमान आमदारांना आता जनतेनेच जाब विचारुन, येत्या निवडणुकीत त्यांना त्यांची जागा दाखवून द्यावी, असे आवाहन भाजपा – महायुतीचे (Mahayuti) उमेदवार डॉ. अतुलबाबा भोसले (Atulbaba Bhosle) यांनी केले.

भाजपा – महायुतीचे कराड दक्षिणमधील उमेदवार डॉ. अतुलबाबा भोसले यांच्या प्रचारार्थ येळगाव (ता. कराड) येथे जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी व्यासपीठावर मो. कृष्णा सहकारी साखर कारखान्याचे संचालक दयानंद पाटील, पैलवान आनंदराव मोहिते, पंकज पाटील, भूषण जगताप, संजय शेवाळे आदी मान्यवर प्रमुख उपस्थित होते.

यावेळी मतदारांशी संवाद साधताना डॉ. अतुलबाबा भोसले म्हणाले, की येळगाव भागात होत असलेल्या जाहीर सभेला मतदारांचा मिळत असलेला प्रतिसाद भारावून टाकणारा आहे. गेल्या अडीच वर्षात महायुती सरकारच्या माध्यमातून कराड दक्षिणमध्ये 745 कोटींचा विकासनिधी आणला. यात प्रामुख्याने येळगाव भागातील विविध गावांमध्ये मोठ्या प्रमाणावर निधी आणण्यात आम्ही यशस्वी झालो.

मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना, बांधकाम कामगार योजना, आयुष्यमान भारत, वयोश्री योजना, नमो शेतकरी योजना यासारख्या योजनांचा लाभ तळागाळातील लोकांना मिळावा, यासाठी मी विशेष प्रयत्न केले. येत्या काही दिवसात कृष्णा हॉस्पिटलची दुसरी शाखा शिरवळ सुरु होत आहे. तिथे मोठ्या प्रमाणात युवकांच्या हाताला रोजगार मिळणार आहे. तसेच कराडसाठी केंद्र सरकारच्या माध्यमातून मोठा उद्योग प्रकल्प येणार असून, त्या माध्यमातूनही मोठी रोजगार निर्मिती करण्याचे माझे ध्येय आहे. त्यामुळे मतदारांनी या मोठ्या मताधिक्याने मला विजयी करुन, लोकसेवेची संधी द्यावी, असे आवाहन डॉ. भोसले यांनी केले.

पैलवान आनंदराव मोहिते म्हणाले, आज अतुलबाबांच्या रुपाने भोसले कुटुंबाची तिसरी पिढी सामाजिक क्षेत्रात कार्यरत आहे. कृष्णा हॉस्पिटल, कृष्णा विद्यापीठाच्या माध्यमातून आरोग्य व शिक्षणक्षेत्रात मोठे काम झाले आहे. त्यामुळे भोसले कुटुंबाने केलेल्या या कार्याची परतफेड म्हणून कराड दक्षिणमधील जनतेने डॉ. अतुलबाबांना आमदार करण्याचा निश्चय केला आहे. यावेळी बळीराजा शेतकरी संघटनेने डॉ. अतुलबाबांना जाहीर पाठिंबा दिला.

यावेळी मदनराव मोहिते, सुनील पाटील, प्रमोद मोहिते, अण्णासाहेब जाधव, राजू मुल्ला, विवेक पाटील, राजू पाटील, गणेश शेवाळे यांच्यासह कार्यकर्ते व मतदार मोठ्या संख्येने उपस्थित होते.

अंबानींच्या लग्नात मोदी गेले होते, मी नाही कारण…, राहुल गांधींचा पंतप्रधानांवर हल्लाबोल

तर आ. पृथ्वीराज चव्हाण (Prithviraj Chavan) यांनी माजी आमदार विलासराव पाटील – उंडाळकर यांना गेल्या काही वर्षांत प्रचंड मानसिक त्रास देण्याचे काम केले. 2014 साली ज्यांनी विलासकाकांचे तिकीट कापले, तेच आता काकांच्या नावाने मते मागतायत. पण विलासकाकांचे कार्यकर्ते असल्या खोटेपणाला भूलणारे नसून, ते त्यांना चांगलाच धडा शिकवतील, याची मला खात्री आहे. येळगावमधील सभेला झालेली गर्दी पाहता, हीच गर्दी उद्याच्या अतुलबाबांच्या विजयाच्या गुलालाची नांदी ठरणार आहे, असे प्रतिपादन पैलवान आनंदराव मोहिते यांनी केले.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube