चला तर…, मुंब्रात शिवरायांचा मंदिर उभारु, फडणवीसांचे उद्धव ठाकरेंना चॅलेंज

  • Written By: Published:
चला तर…, मुंब्रात शिवरायांचा मंदिर उभारु, फडणवीसांचे उद्धव ठाकरेंना चॅलेंज

Devendra Fadnavis On Uddhav Thackeray : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी आज कोल्हापूरमधून (Kolhapur) विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराची सुरुवात केली आहे. यावेळी आयोजित जाहीर सभेत बोलताना त्यांनी उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्यासह महाविकास आघाडीच्या (MVA) नेत्यांवर जोरदार हल्लाबोल केला.

यावेळी बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणाले की, कोल्हापूर उत्तरमधून पंजा गायब झाला आहे आणि आता दक्षिण कोल्हापूरमधून काँग्रेसला (Congress) गायब करायचा आहे. आज उद्धव ठाकरे यांची देखील कोल्हापूरमध्ये सभा झाली.

या सभेत उद्धव ठाकरे म्हणाले की, छत्रपती शिवाजी महाराज यांना इंग्रजांवर राग होता म्हणून त्यांनी सुरत लुटली मात्र तेव्हा इंग्रज होते कुठे? तुम्हाला आता औरंगजेबाचं नाव घ्याला लाज वाटू लागली. असा टोला उद्धव ठाकरे यांना देवेंद्र फडणवीस यांनी लावला. उद्धव ठाकरे यांनी हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या नावातून हिंदुहृदयसम्राट कडून टाकला आणि आज औरंगजेबाचं नाव घ्याला लाज वाटत आहे. अशी टीका देखील फडणवीस यांनी यावेळी केली.

पुढे बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणाले की, छत्रपती शिवाजी महाराजांचा सुरतमध्ये मंदिर बांधणार असं उद्धव ठाकरे म्हणाले मात्र 22 वर्षांपूर्वी छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा नरेंद्र मोदी यांनी उभारला आहे. त्यामुळे माझी एकच विनंती आहे. उद्धव ठाकरे तुम्ही म्हणतात सर्व ठिकाणी शिवरायांचा मंदिर उभारू चला तर मुंब्रामध्ये शिवरायांचा मंदिर उभारू, त्यासाठी आम्ही तुम्हाला मदत करणार असेही देवेंद्र फडणवीस म्हणाले.

तसेच देशातील एकूण गुंतवणुकीमध्ये 52 टक्के गुंतणवूक महाराष्ट्रात आहे. देशात रोजगारमध्ये महाराष्ट्र पुढे आहे. राज्यात आम्ही उद्योगाचा जाळा आम्ही तयार केला तसेच महिलांसाठी अनेक योजना आम्ही लागू केले असं म्हणत त्यांनी विरोधकांना प्रतिउत्तर दिला. तुमचे उमेदवार लाडकी बहिणीला माल म्हणतात तर एक उमेदवार बकरी म्हणतो. त्यामुळे महिलांना सुरक्षा तुमच्या वाचाळवीरांपासून दिली पाहिजे. असा टोला देखील त्यांनी उद्धव ठाकरे यांना लावला.

सतेज पाटलांकडून अपमान झाला का? राजीनामा देणार का? दोन पाणी पत्रातून शाहु महाराजांची मांडली भूमिका

तसेच आमची एकही योजना बंद होणार नाही अशी ग्वाही देखील या सभेत बोलताना त्यांनी दिली आणि जर हे लोक निवडणूक आले तर सर्व योजना बंद होणार असेही ते म्हणाले. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, रामदास आठवले, हसन मुश्रीफ यांच्यासह महायुतीचे सर्व नेते देखील उपस्थित होते.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube