CM शिंदेंच्या तिकीटवाटपात ‘भावकी’ जिंकली, कुठे भाऊ मुलगा तर कुठे भाऊ; वाचा खास रिपोर्ट..

CM शिंदेंच्या तिकीटवाटपात ‘भावकी’ जिंकली, कुठे भाऊ मुलगा तर कुठे भाऊ; वाचा खास रिपोर्ट..

Eknath Shinde Shivsena First Candidate List : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी शिवसेनेची (Shivsena) 45 उमेदवारांची पहिली यादी जाहीर करण्यात आली आहे. यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्यासह, मंत्री गुलाबराव पाटील, दादा भुसे, शंभुराज देसाई, अब्दुल सत्तार, उदय सामंत यांना उमेदवारी देण्यात आली. याशिवाय बंडात साथ दिलेल्या अपक्ष आमदार मंजुळा गावित, चंद्रकांत निंबा पाटील, आशिष जैस्वाल आणि नरेंद्र भोंडेकर यांचाही समावेश आहे. तसेच या यादीत घराणेशाहीचा चांगलाच दबदबा दिसून येत आहे. कुठे आमदाराचा भाऊ तर कुठे मुलगा असे तिकीट वाटप एकनाथ शिंदे यांनी केलं आहे. एकूणच तिकीट वाटपात कुणी नाराज होणार नाही. बंडखोरीचं टेन्शन राहणार नाही याची काळजी घेण्यात आली आहे.

खासदार सांदिपान भुमरे यांचा मुलगा विलास भुमरे यांना पैठणमधून तिकीट मिळालं आहे. खासदार रवींद्र वायकर यांच्या पत्नी मनीषा वायकर यांना जोगेश्वरी पूर्व मधून उमेदवारी मिळाली आहे. माजी खासदार आनंद अडसूळ यांचे पुत्र अभिजीत अडसूळ यांना दर्यापूरमधून तिकीट मिळालं आहे. तर उद्योगमंत्री उदय सामंत यांचे बंधू किरण सामंत यांना राजापूरमधून उमेदवारी मिळाली आहे.

शिवसेनेची 45 नावांची पहिली यादी जाहीर; बंडात साथ दिलेल्या सर्वांना CM शिंदेंकडून उमेदवारी

शिंदेंच्या तिकीटवाटपात ‘भावकी’चा विजय

सांदिपान भुमरे लोकसभा निवडणुकीत विजयी झाल्याने पैठण विधानसभा मतदारसंघ रिक्त झाला होता. आता येथे त्यांचा मुलगा विलास भुमरे यांना शिंदे सेनेने संधी दिली आहे. आटपाडी खानापूर येथून सुहास अनिल बाबर यांना संधी मिळाली आहे. त्यांचे वडील अनिल बाबर यांचं काही दिवसांपूर्वी निधन झालं होतं. एरंडोल विधानसभा मतदारसंघातून चिमणराव पाटील यांच्याऐवजी त्यांचे पुत्र अमोल पाटील यांना उमेदवारी निश्चित करण्यात आली आहे. कोकणातील दापोली मतदारसंघातून माजी मंत्री रामदास कदम यांना संधी मिळाली आहे. उद्योगमंत्री उदय सामंत यांचे बंधू किरण सामंत यांना उमेदवारी मिळाली आहे.

कोणाला कुठून मिळाली उमेदवारी?

कोपरी पाचपाखाडी – एकनाथ शिंदे
साक्री (अज) – मंजूळाताई गावित
चोपडा (अज) – चंद्रकांत सोनावणे
जळगाव ग्रामिण – गुलाबराव पाटील
एरंडोल – अमोल चिमणराव पाटील
पाचोरा – किशोर पाटील
मुक्ताईनगर – चंद्रकांत निंबा पाटील
बुलढाणा – संजय गायकवाड
मेहकर (अजा) – डॉ. संजय रायमुलकर
दर्यापूर (अजा) – अभिजित अडसूळ
रामटेक – आशिष जैस्वाल
भंडारा (अजा) – नरेंद्र भोंडेकर
दिग्रस – संजय राठोड
नांदेड उत्तर – बालाजी कल्याणकर
कळमनुरू – संतोष बांगर
जालना – अर्जुन खोतकर
सिल्लोड – अब्दुल सत्तार
छत्रपती संभाजीनगर मध्य – प्रदीप जैस्वाल
छत्रपती संभाजीनगर पश्चिम (अजा) – संजय शिरसाट
पैठण – विलास भूमरे
वैजापूर – रमेश बोरनारे
नांदगाव – सुहास कांदे
मालेगाव बाह्य – दादाजी भुसे
ओवळा माजीवडा – प्रताप सरनाईक
मागाठाणे – प्रकाश सुर्वे
जोगेश्वरी (पूर्व) – मनिषा वायकर
चांदिवली – दिलीप लांडे
कुर्ला (अजा) – मंगेश कुडाळकर
माहिम – सदा सरवणकर
भायखळा – यामिनी जाधव
कर्जत – महेंद्र थोरवे

Eknath Shinde : ‘पराभव ही सामुहिक जबाबदारी, एका निवडणुकीने सर्वकाही संपत नाही 

अलिबाग- महेंद्र हरी दळवी
महाड- भरतशेठ मारुती गोगावले
उमरगा- ज्ञानराज धोंडीराम चौगुले
परांडा- डॉ.तानाजी जयवंत सावंत
सांगोला- शहाजी बापू पाटील
कोरेगाव- महेश शिंदे
पाटण- शंभूराज देसाई
दापोली- योगेश कदम
रत्नागिरी- उदय सामंत
राजापूर- किरण सामंत
सावंतवाडी- दीपक केसरकर
राधानगरी- प्रकाश आबिटकर
करवीर- चंद्रदिप नरके
खानापुर- सुहास बाबर

follow us
  • fb
  • instagram
  • youtube