भाजपला सोडचिठ्ठी देत सुभाष साबणेंचा तिसऱ्या आघाडीत प्रवेश, संभाजीराजे म्हणाले, ‘जोरात तयारीला लागा..’
Subhash Sabane : विधानसभा निवडणुकीच्या (Vidhansabha Election) पार्श्वभूमीवर राजकीय घडामोडींना वेग आला. आता नांदेडच्या देगलूर-बिलोली विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार सुभाष साबणे (Subhash Sabane) यांनी तिसऱ्या आघाडीमध्ये प्रवेश केला. संभाजीराजे छत्रपतींच्या (Sambhajiraje Chhatrapati) उपस्थित त्यांनी हा प्रवेश केला. यावेळी संभाजीराजेंनी साबणेंची नांदेड देगलूरचे उमदेवार म्हणून घोषणा करत जोरात तयारीला लागा असे आदेश साबणेंना दिलेत.
समोरचा उमेदवार कोणीही असला तरी संगमनेरात परिवर्तन होणारच; विखेंचा थोरातांना टोला
संभाजाराजे म्हणाले, परिवर्तन महाशक्ती आघाडी एक चांगला पर्याय देणार आहे. परिवर्तन महाशक्तीला मोठा रिस्पॉन्स भेटत आहे. अनेक लोक परिवर्तन महाशक्तीकडे उमेदवारी मागत आहेत. मात्र, आम्ही उमेदवारांची यादी मुद्दाम जाहीर केली नाही. आता सुभाष साबणे यांनी परिवर्तन महाशक्तीत प्रवेश केलाय. त्यांना कोणत्या पक्षाच्या द्यमातून उमेदवारी द्यायची ते तिसऱ्या आघाडीतीत घटक पक्ष बसून ठरवू. मात्र, ते नांदेड देगलूर मतदारसंघातून निडवणूक लढतील. जोरात तयारीला लागा असे आदेश दिल्याचं संभाजीराजे म्हणाले.
समोरचा उमेदवार कोणीही असला तरी संगमनेरात परिवर्तन होणारच; विखेंचा थोरातांना टोला
288 जागा लढवणार का? असा सवाल संभाजीराजेंना केला असता ते म्हणाले, 288 जागा लढवण्याचा आमचा प्रयत्न आहे. सगळ्या जगावर चांगले उमदेवार देण्याचा विचार असून आतापर्यंत 150 जगावंर एकमत झालेय. यावेळी बोलतांना सत्ताधारी आणि विरोधकांवर जोरदारी टीका केली. आम्ही महाविकास आघाडी आणि महायुतीच्या विरोधात आहोत. कारण, 75 वर्ष हे लोक सत्तेत आहेत. मात्र, अजूनही प्रश्न तसेच आहेत, असं संभाजीराजे म्हणाले.
निवडणूक लढवणे वाईट नाही पण अडकून राहणं मान्य नाही. गरज पडल्यास मी निवडणूक लढवणार, असं संभाजीराजेंनी स्पष्ट केलं.
दरम्यान, सुभाष साबणे हे 1999, 2004, 2014 च्या निवडणुकीत तीन वेळा आमदार म्हणून निवडून आले आहेत. शिवसेनेच्या उमेदवारीवर साबणे विजयी झाले होते. सध्या ते भाजपमध्ये होते. 2024 च्या विधानसभा निवडणुकीसाठी साबणेंनी भाजपकडून तिकीट मागितल्याच्या चर्चा होत्या. मात्र, जितेश अंतापूरकरांनी काँग्रेसमधून भाजपमध्ये प्रवेश केल्याने साबणे नाराज असल्याची चर्चा होती.