ठाकरे गटाला भगदाड! शिरूरमध्ये अशोक पवारांविरोधात अजितदादांना सापडला तगडा उमेदवार

  • Written By: Published:
ठाकरे गटाला भगदाड! शिरूरमध्ये अशोक पवारांविरोधात अजितदादांना सापडला तगडा उमेदवार

पुणे : विधानसभेसाठी भाजपने काल (दि.20) 99 उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे. त्यानंतर आता महायुतीतील राष्ट्रवादी आणि शिवसेनेच्या उमेदवारी यादीकडे सर्वांच्या नजर लागल्या आहे. या सर्व घडामोडींमध्ये शिरूर विधानसभा मतदारसंघात शरद पवार गटाचे विद्यामान आमदार अशोक पवार यांच्याविरोधात अजितदादांना तगडा उमेदवार सापडला असून, उबाठा गटाचे पुणे जिल्हाप्रमुख ज्ञानेश्वर (माऊली) आबा कटके यांनी अजितदादांच्या (Ajit Pawar) उपस्थितीत राष्ट्रवादीत प्रवेश केला आहे. त्यामुळे ऐन निवडणुकीच्या तोंडावर ठाकरे गटाला (Uddhav Thackeray) मोठे भगदाड पडले असून, शिरूरचे विद्यामान आमदार अशोक पवार यांच्याविरोधात अजितदादांना तगडा उमेदवार मिळाल्याचे बोलले जात आहे.

वाघोली परिसरात कटकेंचा वरचष्मा

उमेदवारी जाहीर होण्यापूर्वी शिरूर मतदारसंघ भाजपकडे जाण्याची शक्यता होती. मात्र, आता माऊली कटकेंनी अजित पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश केला आहे. त्यामुळे शिरूरमध्ये पवार गटाचे विद्यामान आमदार अशोक पवार यांच्या विरोधात माऊली कटके हेच उमेदवार असू शकतात असे बोलले जात आहे. या मतदारसंघांमध्ये चार लाख 60 हजारच्या आसपास मतदार असून, कटके हे माजी जिल्ह परिषदेचे सदस्य असून यांचा वाघोली परिसरात वरचष्मा आहे. त्यात आता कटके यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केल्याने ही जागा राष्ट्रवादीला सुटल्याचे संकेत महायुतीकडून देण्यात आल्याचे मानले जात आहे. कटके यांचा वाघोली आणि परिसरात असलेला संपर्क बघात याचा फायदा विजयासाठी महायुतीला होऊ शकतो.

Ground Zero : अशोक पवार पुण्याचे पालकमंत्री होणार की माजी आमदार?

अशोक पवारांनी दिले होते अजित पवारांना आव्हान

मध्यंतरीच्या काळात अजित पवार शिरूर मतदारसंघातून निवडणुकीच्या मैदानात उतरून निवडणूक लढवणार असल्याच्या चर्चांनी जोर धरला होता. त्यावेळी शरद पवार गटाचे विद्यमान आमदार अशोक पवार यांनी माझी कोणाविरुद्ध लढण्याची पूर्ण तयारी आहे. लोकशाहीमध्ये कुणालाही कुठूनही लढण्याचा अधिकार आहे. त्यानुसार शिरूरमध्ये कुणीही येऊन लढू शकतो अशी प्रतिक्रिया दिली होती. मात्र, आता माऊली कटके यांनी ठाकरे गटाला जय महाराष्ट्र करून अजित पवारांच्या पत्रात जाहीर प्रवेश केल्याने अशोक पवारांविरोधात माऊली कटके यांच्याच थेट लढत होऊ शकते असे बोलले जात आहे.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube