सुधीर साळवींना डावलून अजय चौधरींना पुन्हा उमेदवारी; लालबागचरणी ठेवलेली ‘ती’ चिठ्ठी पुन्हा चर्चेत…
Sudhir Salvi News : विधानसभा निवडणुकीची (Assembly Election) रणधुमाळी सुरु असतानाच आता उद्धव ठाकरे गटाकडून (Udhav Thackeray Group) उमेदवारांची यादी जाहीर करण्यात आलीयं. या यादीमध्ये लालबाग राजा ट्रस्टचे मानद सचिव सुधीर साळवी (Sudhir Salvi) यांना डावलण्यात आलंय. तर विद्यमान आमदार अजय चौधरी यांनाच पुन्हा उमेदवारी देण्यात आलीयं. साळवी यांना ‘आमदारकी मिळावी’, अशी चिठ्ठी लालबाग राजाच्या चरणी ठेवण्यात आली होती. त्यावेळी ही चिठ्ठी सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाली. आता उमेदवारी नाकारल्याने ही चिठ्ठी पुन्हा चर्चेत आलीयं.
आमदार आशुतोष काळे उद्या भरणार अर्ज; सुनिल तटकरे अन् सयाजी शिंदेंची असणार उपस्थिती
शिवसेना पक्षात फुट पडल्यानंतर शिवसेना पक्षाशी एकनिष्ठ राहिलेल्या अजय चौधरी यांना पुन्हा उमेदवारी देण्यात आलीयं. याआधीच सुधीर साळवी यांनाच उमेदवारी देण्यात यावी, या मागणीसाठी उद्धव ठाकरे यांच्याकडे शिवसैनिकांनी जोर धरला होता. आता उमेदवारी नाकारल्यानंतरही मी संघटनेशी एकनिष्ठ शिवसैनिक म्हणून काम करणार असल्याचं सुधीर साळवी यांनी माध्यमांना स्पष्ट सांगून टाकलंय.
संग्राम जगताप हॅट्रिक मारणार? महायुतीच्या पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत उमेदवारी अर्ज दाखल
गणेशोत्सव सुरु असतानाच लालबाग राजाच्या चरणी सुधीर साळवींना आमदारकी मिळावी अशी ठेवण्यात आली होती. आता शिवडी मतदारसंघातून अजय चौधरी यांच्या उमेदवारीवर शिक्कामोर्तब करण्यात आल्याने ही चिठ्ठी पुन्हा चर्चेत आलीयं. लालबागचरणी ठेवण्यात आलेली चिठ्ठी राजकीय वर्तुळात चांगलीच चर्चेत आली होती.
मोठी बातमी! ठाकरेंच्या यादीत ट्विस्ट, धाराशिवमधील ‘या’ मतदारसंघातील उमेदवार बदलणार
दरम्यान, शिवडी मतदारसंघातून उमेदवारी नाकारण्यात आली तरीही सुधीर साळवी यांनी पक्षाशी एकनिष्ठ राहण्याचा निर्णय घेतलायं. शिवडी मतदारसंघात ठाकरे गटाचे अजय चौधरी विद्यमान आमदार आहेत. शिवसेनेत बंड झाल्यानंतर अजय चौधरी यांनी ठाकरे यांच्यासोबतच राहण्याचा निर्णय घेतला होता. तर सुधीर साळवीदेखील याच मतदारसंघातून इच्छूक होते. साळवी यांचा मतदारसंघात चांगलाच जनसंपर्क आहे. त्यामुळे या मतदारसंघातून कोणाला उमेदवारी मिळणार? याकडं सर्वांचंच लक्ष लागून राहिलं होतं.