जागावाटप कधी होणार, शाहांसोबत बैठकीत काय झालं? CM शिंदेंनी थेट सांगूनच टाकलं
Eknath Shinde And Amit Shah Meeting : राज्यात विधासभेसाठी निवडणुकांची घोषणा झाली आहे. त्यामुळे प्रत्येक पक्ष आता तयारीला लागला आहे. राज्यात यावेळी महाविकास आघाडी (MVA) आणि महायुतीमध्ये (Mahayuti) मुख्य लढत पाहायला मिळणार आहे. त्यामुळे दोन्ही आघाड्यांकडून जागावाटपावर बैठका सुरु आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी देशाचे गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) यांची भेट घेत महायुतीच्या जागावाटपाबाबत चर्चा केली आहे. त्यामुळे महायुतीकडून येत्या दोन तीन दिवसात जागावाटपाची घोषणा होणार असल्याची माहिती समोर येत आहे. तर दुसरीकडे गृहमंत्री अमित शाह यांच्यासोबत कोणत्या मुद्यांवर बैठकीत चर्चा झाली याबाबत आज माध्यमांशी बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी माहिती दिली आहे.
माध्यमांशी बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, दिल्लीमध्ये अमित शाह यांच्यासोबत जागावाटपासंदर्भात चर्चा झाली आणि ही चर्चा सकारात्मक झाली असून आता महायुतीच्या जागावाटपाची चर्चा अंतिम टप्य्यात आहे अशी माहिती माध्यमांशी बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली.
पुढे बोलताना मुख्यमंत्री शिंदे म्हणाले की, सध्या महायुतीमध्ये 30 ते 35 जागांवर तिढा असून तो लवकरच सुटणार आहे आणि यासाठी दिल्लीला येण्याची गरज नसून त्यावर फक्त अमित शाह यांच्याशी चर्चा करून तो तिढा सोडवला जाणार असं देखील मुख्यमंत्री शिंदे म्हणाले. तसेच जागावाटपाचा तिढा सुटल्यानंतर तिन्ही पक्षांकडून यादी जाहीर केली जाणार असल्याची माहिती देखील त्यांनी यावेळी दिली.
Prajakta Tanpure : भाजपची गळती थांबेंना…राहुरीत तनपुरेंचे राजकीय बळ वाढले
तसेच या बैठकीमध्ये अमित शाह यांनी जनकल्याण योजना जनतेपर्यंत पोहोचवातसेच महायुतीचे सरकार सर्वसामान्य जनतेचं सरकार आहे हे जनतेला पटवून सांगा तसेच प्रत्येक उमेदवार महायुतीचा समजून प्रचार करा मतभेद बाजूला ठेवा आणि बंडखोरी होणार, नाही याची सगळ्यांनी काळजी घ्या असं कानमंत्र देखील या बैठकीमध्ये अमित शाह यांनी महायुतीच्या नेत्यांना दिले असल्याची माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी माध्यमांशी बोलताना दिली.
लाडकी बहीण योजना बंद होणार का? अजित पवार म्हणाले, राखीची शपथ घेतो अन्…