Ashok Chavan Speak on Nanded Death : नांदेडच्या शासकीय रुग्णालयात एकाच दिवसात २४ जणांना जीव गमवावा लागला. रुग्णालयात अपुऱ्या सोयीसुविधा, डॉक्टरची कमतरता, नर्सेच्या बदल्या झाल्याने अनेकांना जीव गमवावा लागला आहे. मृत्यूंचा आकडा वाढतच चालला असून आत्तापर्यंत 35 जणांचा मृत्यू झाल्याचं समोर आलं आहे. नांदेडच्या रुग्णालयातील मृत्यूंची हायकोर्टाकडून दखल, सु-मोटो याची दाखल, उद्या होणार सुनावणी या […]
Bachchu Kadu On Chandrashekhar Bawankule : एक नाहीतर 10 खासदार पाठवा, बच्चू कडू पडणार नसल्याचं प्रहारचे अध्यक्ष आमदार बच्चू कडू यांनी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांना ठणकावूनच सांगितलं आहे. दरम्यान, अचलपूर मतदारसंघात बच्चू कडू यांना पाडण्यासाठी भाजपने लक्ष घातलं असल्याचा आरोपही त्यांनी यावेळी केला आहे. वाशिममध्ये दिव्यांग मेळाव्यात ते बोलत होते. Sonu Sood: चाहत्याने मानले […]
Kumar Ketkar : राज्यात सध्या आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सर्वच राजकीय पक्षांकडून जोरदार हालचाली सुरु झाल्या आहेत. अशातच आता भाजपला पराभूत करण्यासाठी विरोधी पक्षांची इंडिया आघाडी समोरासमोर उभी ठाकली आहे. तर भाजपविरोधी असलेल्या वंचित आघाडीची भूमिका काही वेगळीच असल्याचं दिसून येत आहे. वंचितला इंडिया आघाडीने अद्याप सामावून घेतलेलं नाही. याचं कारण काँग्रेसचे खासदार कुमार केतकर(Kumar Ketkar) […]
Nagar Urban Bank : कोणत्या ना कोणत्या कारणावरुन चर्चेत असलेल्या अहमदनगरमधील नगर अर्बन बॅंकेवर अखेर रिझर्व्ह बॅंक ऑफ इंडियाने(RBI) कारवाईचा बडगा उगारला आहे. नियमांचं उल्लंघन केल्याप्रकरणी रिझर्व्ह बॅंक ऑफ इंडियाने नगर अर्बन बॅंकेची मान्यता रद्द केल्याची माहिती समोर आली आहे. बँकेवर अवसायकाची नियुक्ती करण्याचे आदेश केंद्रीय सहकार मंत्रालयाच्या अतिरिक्त सचिवांना आणि केंद्रीय सह निबंधकांनी दिले […]
Devendra Fadnvis : राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करण्याबाबतची आयडिया ही राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार(Sharad Pawar) यांचीच होती, असा मोठा गौप्यस्फोट उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस(Devendra Fadnvis) यांनी केला आहे. एका वृत्तवाहिनीच्या कार्यक्रमात देवेंद्र फडणवीस(Devendra Fadnvis) राजकीय स्थितीवर बोलताना त्यांनी हा गौप्यस्फोट केला आहे. त्यामुळे आता राजकीय वर्तुळात शरद पवार(Sharad Pawar) यांच्या भूमिकेवरुन प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात […]
Asain Games 2023 : आशियाई क्रीडा स्पर्धेत महाराष्ट्राचा सुपुत्र अविनाश साबळेने आणखी एक मोठी कामगिरी केली आहे. आशियाई क्रीडा स्पर्धेत 5 हजार मीटर शर्यतीत अविनाश साबळेने रौप्यपदक पटकावलं आहे. रौप्यपदाकाआधी अविनाश साबळेने सुवर्णकामगिरी केली. 3 हजार मीटर स्टीपलचेसमध्ये त्याने सुवर्णपदक पटकावलं होतं. त्यानंतर आता पुन्हा रौप्यपदक पटकावून साबळेने कौतुकास्पद कामगिरी केली आहे. नायब सूबेदार अविनाश […]
Chagan Bhujbal : पालकमंत्रिपदाबाबत महायुतीमध्ये वाद नाहीतर चर्चा सुरु असल्याचं स्पष्टीकरण अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ(Chagan Bhujbal) यांनी दिलं आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे(Eknath Shinde) यांनी आज पालकमंत्र्यांची घोषणा केल्यानंतर झाल्यानंतर छगन भुजबळांनी आपली भूमिका माध्यमांसमोर स्पष्ट केली आहे. भरत गोगावलेंची धास्ती; आदिती तटकरे वेटिंगवरच! रायगड अन् साताऱ्याचा तिढा कायम राज्यातील 12 जिल्ह्यांच्या पालकमंत्र्यांची […]
Dehradun : उत्तराखंडमधील पिथोरागढ जिल्ह्यातील धारचुला गावात एका कामगाराचा खांद्यापासून तुटलेला हात डॉक्टरांनी सलग 5 तास शस्त्रक्रिया करुन पुन्हा बसवल्याचं समोर आलं आहे. घटना घडल्यानंतर कामगाराला तत्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. यावेळी खांद्यापासून वेगळा झालेला एक हातही या जखमी कामगारासोबत रुग्णालयात पाठवण्यात आला होता. तत्काळ शस्त्रक्रिया केल्याने डॉक्टरांनी कामगाराला अपंगत्व येण्यापासून वाचवलं आहे. राज्यात […]
Nobel Prize 2023 : रसायनशास्त्रातील नोबेल पुरस्काराची घोषणा रॉयल स्वीडीश अकॅडमी ऑफ सायन्सकडून करण्यात आली आहे. यंदाच्या वर्षीचा रसायनशास्त्रातील नोबेल पुरस्कार मौंगी जी, बावेंडी, लुईस ई, ब्रुस आणि एलॅक्सी आई यांना घोषित करण्यात आला आहे. क्वांटम डॉट्सच्या संशोधनासाठी हा पुरस्कार देण्यात आला आहे. रॉयल स्वीडिश अॅकॅडमी ऑफ सायन्सेसने बुधवारी यासंदर्भात घोषणा केली आहे. BREAKING NEWSThe […]
Chandrashekhar Bawankule : अजितदादा कधीच नाराज नव्हते ते तर स्पष्ट वक्ते आहेत, असं थेट भाष्य भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे(Chandrashekhar Bawankule) यांनी अजित पवार यांच्या नाराजीवर केलं आहे. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बावनकुळे यांनी सातारा लोकसभेचा आढावा घेतला. त्यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला आहे. यावेळी बावनकुळे दादांच्या नाराजीवर स्पष्ट बोलले आहेत. Maharashtra : मलिन होणारी प्रतिमा सुधारा; दिल्ली […]