अमोल भिंगारदिवे 'लेट्सअप मराठी' ऑनलाईनमध्ये मल्टिमीडिया प्रोड्यूसर म्हणून कार्यरत आहेत. ऑनलाईन पत्रकारिता क्षेत्रात 5 वर्षांचा अनुभव तसेच दैनंदिन बातम्या, राजकीय घडामोडी, क्राईम स्टोरीज यांसारख्या बातम्यांमध्ये रस.
Sharad Pawar News : राष्ट्रवादी काँग्रेस भाजपसोबत जाणार नसल्याचं राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार(Sharad Pawar) यांनी ठणकावून सांगितलं आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार(Ajit Pawar) आणि शरद पवार यांची गुप्त भेट झाली होती. या भेटीमुळे राजकीय वर्तुळात कमालीचा सस्पेंन्स निर्माण झाला होता. ही भेट नेमकी कशासाठी? याबाबत कोणतीही माहिती समोर आली नव्हती, अशातच राष्ट्रवादी भाजपसोबत जाणार असल्याच्या चर्चांना […]
कष्टकरी, शेतकऱ्यांच्या व्यथा मांडण्याचे शब्द गणपतरावांच्याच ठायी होत्या, असं सांगत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माजी आमदार गणपतराव देशमुख यांच्या आठवणी सांगितल्या आहेत. दरम्यान, सांगोल्यात आज गणपतराव देशमुखांच्या पुतळ्याचं लोकार्पण करण्यात आलं. या कार्यक्रमात ते बोलत होते. शरद पवार-अजितदादांच्या भेटीवर फडणवीसांचे कानावर हात; म्हणाले, मला जर.. उपमुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, आमदार असताना गणपतराव मंत्रिपदाच्या मोहात कधीच अडकले […]
Kalwa Hospital : महापालिकेच्या कळवा येथील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात गुरूवारी दिवसभरात उपचाराअभावी 6 रुग्णांचा मृत्यू झाला. या घटनेच्या दोन दिवसांनंतर आणखी 17 रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची घटना घडली. या प्रकरणावर रुग्णालयाचे डीन राकेश बारोट यांनी प्रतिक्रिया दिली असून त्यांनी रुग्णांचा मृत्यूचं कारणंही स्पष्ट केलं आहे. राजपूत करणी सेनेच्या अध्यक्षावर गोळीबार, प्रकृती चिंताजनक राकेश बारोट […]
मध्य प्रदेशातील कथित ’50 टक्के कमिशनचं सरकार’ ट्विटवरुन काँग्रेस नेत्या प्रियंका गांधी यांचा पाय खोलात जाणार असल्याची शक्यता आहे. प्रियंका गांधी यांचं कथिक 50 टक्के कमिशनचं सरकार ही टीका चांगलीच झोंबली आहे. या टीकेविरोधात भाजपने आक्रमक पवित्रा घेतला असून ट्विटप्रकरणी प्रियंका गांधी यांच्यावर मध्य प्रदेशात 41 पेक्षा अधिक ठिकाणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यामुळे […]
टीम इंडियाचा टी20 मालिकेतला चौथा सामना आज अमेरिकेतल्या फ्लोरिडा इथल्या लॉडरहिल मैदानात खेळवण्यात येणार आहे. आधीच्या 3 सामन्यांपैकी सलग 2 सामन्यात वेस्ट इंडिजने टीम इंडियावर विजय मिळवत 2-0 अशी आघाडी घेतली, तर टीम इंडियाने तिसरा सामना जिंकून मालिकेत पुनरागमन केलं आहे. आता टीम इंडियाला चौथ्या सामन्यात मालिकेत बरोबरी करण्याच्या उद्देशाने मैदानात उतरावं लागणार आहे. पुणेकरांची […]
Ahmednagar News : सोशल मीडियावरून दोन जाती-धर्मात तेढ निर्माण होईल, अशा प्रकारे कोणीही आक्षेपार्ह पोस्ट टाकल्यास संबंधितांवर गुन्हा दाखल करण्यात येणार असून, सीआरपीसी कलम १४९ नुसार सर्व सोशल मीडियावरील ग्रुपला नोटीस जारी करण्यात आली आहे. व्हॉट्सअॅप, फेसबुक, इंस्टाग्राम यासारख्या कोणत्याही सोशल मीडियावर आक्षेपार्ह मजकूर पसरवून धार्मिक तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात येणार […]
मणिपूरमधील महिलांच्या विवस्त्र व्हिडिओ प्रकरणाची चौकशी सर्वोच्च न्यायालयाकडून गठीत करण्यात आलेल्या तीन सदस्यीय समितीकडून करण्यात येणार आहे. तसेच जमावाकडून लैंगिक हिंसाचार केला जात असून लोकांचं संरक्षण करणं हे राज्याचं कर्तव्य असल्याचं सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट केलं आहे. स्वातंत्र्यदिनी राज्यातल्या कैद्यांना मुक्त करणार? केंद्रीय गृह सचिवाची माहिती मणिपूर हिंसाचाराप्रकरणी सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरु आहे. न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती […]
येत्या 15 ऑगस्टला देशाचा 76 वा स्वातंत्र्यदिन साजरा करण्यात येणार आहे. या पार्श्वभूमीवर राज्याच्या कारागृहातील विशिष्ट प्रवर्गाच्या कैद्यांना तीन टप्प्यांत विशेष माफी देण्यात येत आहे. माफीच्या तिसऱ्या टप्प्यांनूसार स्वातंत्र्यदिनी 186 कैद्यांना माफी देऊन मुक्त करण्यात येणार आहे. यासंदर्भातील माहिती केंद्रीय गृह सचिवाकडून देण्यात आली आहेत. अमित शाहांनी राहुल गांधींपेक्षा जास्त मूर्खपणा केला; बच्चू कडूंनी सुनावलं […]
Pune News : पुणेकरांची आता वाहतूक कोंडीतून सुटका होणार आहे. पुण्यातील चांदणी चौकात उभारण्यात आलेल्या नव्या प्रकल्पाचं आज केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते उद्घाटन होणार आहे. 1 ऑक्टोबर रोजी चांदणी चौकातला जुना पुल स्फोट करुन पाडण्यात आला होता. त्यानंतर चौकात नवा प्रकल्प उभा करण्यात आला आहे. या नव्या प्रकल्पामुळे चांदणई चौकातल्या वाहतूक कोंडीतून पुणेकरांची […]
Conjunctivitis Eye Infection : काही दिवसांपासून राज्यात डोळ्यांच्या संसर्गात मोठ्या प्रमाणात वाढ झाली असून राज्यात 10 ऑगस्टपर्यंत 3 लाख 90 हजार 338 रुग्णांची नोंद झाली आहे. तर बुलढाणा जिल्ह्यांत आत्तापर्यंत 44 हजार 398 रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. त्याखालोखाल पुण्यातही 30 हजार 63 रुग्ण आढळून आले आहेत. डोळ्यांचा संसर्ग झाल्यानंतर नागरिकांनी डॉक्टरांकडून योग्य उपचार घेण्याचं […]