अहिल्यानगर जिल्ह्यातील काही भागांत पुढील दोन दिवस वादळी वाऱ्यासह पाऊस पडणार असल्याची शक्यता हवामान विभागाकडून वर्तवण्यात आलीयं.
भारत-पाकिस्तान युद्धात मी मध्यस्थी नाही तर मदत केली असल्याचा दावा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केला आहे.
रस्त्याच्या कामात दिरंगाई केल्याप्रकरणी खासदार निलेश लंके यांनी उपअभियंता आणि ठेकेदाराविरोधात गुन्हा दाखल करण्यासाठी ठिय्या आंदोलन केलंय.
पाकिस्तान्यांच्या कुठल्याही धमकीला भीक घालू नका, आपण त्यांना घरात घुसून मारलंय व्यापाऱ्यांना आम्ही संरक्षण देणार असल्याचा शब्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी दिलायं.
वरिष्ठ पोलिस हवालदार आता पोलिस उपनिरीक्षकाप्रमाणे एखाद्या गुन्ह्याचा तपास करणार असल्याचा निर्णय राज्य सरकारकडून घेण्यात आलायं.
पुण्यातील ससून रुग्णालयात बॉम्ब ठेवल्याचा धमकीचा मेसेज पाठवल्याप्रकरणी आरोपीला पुणे पोलिसांनी अटक केलीयं. रुग्णालयातील सुरक्षा गार्डच आरोपी निघाल्याचं समोर आलंय.
अजित पवार यांच्यावर विषारी टीका करणाऱ्या शरद पवार गटातील नेत्यांनी नाक घासून माफी मागावी, अशी अट अमोल मिटकरींनी घातलीयं.
उन्हाळ्याच्या सुट्टीची नोस्टाल्जिक सफर घडवणारा ‘एप्रिल मे ९९’ चित्रपटाच येत्या 23 मे रोजी चित्रपटगृहात प्रेक्षकांच्य भेटीला येणार आहे.
धरणातील गाळ काढण्यासाठी इतर राज्यांचं धोरण आणि महाराष्ट्राच्या धोरणाचा तुलनात्मक अभ्यास करुन सर्वसमावेशक धोरण करण्याच्या सूचना जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनी दिल्या आहेत.
बलोच नेता मीर यार बलोच याने रिपब्लिक ऑफ बलुचिस्तानची घोषणा करीत पाकिस्तानापासून स्वातंत्र्य झाल्याची घोषणा केलीयं.