अमोल भिंगारदिवे 'लेट्सअप मराठी' ऑनलाईनमध्ये मल्टिमीडिया प्रोड्यूसर म्हणून कार्यरत आहेत. ऑनलाईन पत्रकारिता क्षेत्रात 5 वर्षांचा अनुभव तसेच दैनंदिन बातम्या, राजकीय घडामोडी, क्राईम स्टोरीज यांसारख्या बातम्यांमध्ये रस.
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या म्हणण्यात तथ्य असून आम्ही सर्वांच्या सहमतीनेच निर्णय घेत असल्याचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितलंय. ते मुंबईत बोलत होते.
विरोधक लाडकी बहीण योजनेत खोडा घालण्याचा प्रयत्न करत असल्याचे टीकास्त्र मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलं आहे. दरम्यान, मुंबईत ते माध्यमांशी बोलत होते.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी सांगावं, मराठा आरक्षणाला माझा अडथळा आहे, तर मी उपमुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देईल, असं स्पष्टीकरण उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलंय. ते मुंबईत माध्यमांशी बोलत होते.
सावळा गोंधळ करुन योजना जाहीर केल्या असल्याची सडकून टीका राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर केलीयं. ते बीडमध्ये बोलत होते.
जनतेने लोकसभेला हिसका दाखवल्याने सरकार हादरलं, असल्याचं म्हणत राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी सत्ताधाऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळलंय.
राष्ट्रवादीच्या शिवस्वराज्य यात्रेत खासदार सुप्रिया सुळेंचं भाषण सुरु असतानाच मराठा आंदोलकांनी थेट मंचावरच चढत आरक्षणाबाबत भूमिका स्पष्ट करण्याची मागणी केलीयं. लातूरमध्ये शिवस्वराज यात्रेत ही घटना घडलीयं.
29 तारखेचा अल्टिमेटम दिलायं, नाही तर निर्णय घेणार असल्याचा इशारा मराठा आंदोलक नेते मनोज जरांगे यांनी दिलायं. ते जालन्यात माध्यमांशी बोलत होते.
मला लोकसभा लढवायची नव्हती, पण समोरच्याची जिरवली, असा खोचक टोला खासदार निलेश लंके यांंनी माजी खासदार सुजय विखेंना लगावलायं. ते एका कार्यक्रमात बोलत होते.
महाविकास आघाडी देईल तेवढ्या जागांवर आम्ही निवडणुका लढवण्यास तयार, अशी खुली ऑफर एमआयएमचे माजी खासदार इम्तियाज जलील यांनी महाविकास आघाडीला दिलीयं. ते छत्रपती संभाजीनगरमध्ये बोलत होते.
मराठे क्षत्रिय, लढाऊ, 96 कुळी तर मग ओबीसीतून आरक्षण कशासाठी हवंय, असा थेट सवाल करीत ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी मनोज जरांगेंना मार्मिक टोला लगावलायं.