एकनाथ खडसेंच्या घरातली एक गोष्ट सांगितली तर लोकं जोड्याने मारतील, असा पलटवार मंत्री गिरीश महाजन यांनी एकनाथ खडसेंवर केलायं.
श्री राम नवमीनिमित्त अयोध्येतील राम मंदिरात रामललावर सुर्यकिरणांचा अभिषेक करण्यात आलायं.
लोकसभा आणि राज्यसभेत वक्फ बोर्ड विधेयक मंजूर झाल्यानंतर मुस्लिम पर्सनल लॉ बोर्ड राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची भेट घेणार आहे.
छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान करणं आता गुन्हा ठरणार आहे, याबाबतची घोषणा केंद्रीय मंत्री अमित शाहा करणार असल्याची माहिती खासदार उदयनराजे भोसले यांनी दिलीयं.
गर्भवती महिलेला कॅन्सर होता, हा रुग्णालयाचा आरोप धादांत खोटा असल्याचा दावा आमदार अमित गोरखे यांनी माध्यमांशी बोलताना केलायं.
पुण्यातील गर्भवती महिला मृत्यू प्रकरणी सुर्या हॉस्पिटलच्या डॉक्टरांनी संपूर्ण घटनाच माध्यमांसमोर सांगितलीयं.
हिंगोलीतील वसमत तालुक्यातील गुंज येथे ट्रॅक्टरच्या भीषण अपघातात आठ महिलांचा मृत्यू झाल्याची घटना घडलीयं.
परिवहन विभागाच्या जमीनींवरील अतिक्रमण हटवण्याचे निर्देश परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिले आहेत.
पुण्यातील गर्भवती महिलेच्या मृत्यूप्रकरणी दीनानाथ रुग्णालयाच्या तक्रारी अधिवेशनात मांडणार असल्याचं आमदार अमित गोरखे यांनी स्पष्ट केलंय.
वक्फ बोर्ड विधेयक काल बुधवारी लोकसभेत मंजूर झाल्यानंतर आज केंद्रीय मंत्री किरेन रिजीजू यांनी राज्यसभेत सादर केलंय.