अमोल भिंगारदिवे 'लेट्सअप मराठी' ऑनलाईनमध्ये मल्टिमीडिया प्रोड्यूसर म्हणून कार्यरत आहेत. ऑनलाईन पत्रकारिता क्षेत्रात 5 वर्षांचा अनुभव तसेच दैनंदिन बातम्या, राजकीय घडामोडी, क्राईम स्टोरीज यांसारख्या बातम्यांमध्ये रस.
क्षमा तोच मागतो जो चुकतो, या शब्दांत काँग्रेसचे खासदार राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या माफीनाम्यावरुन जखमेवर मीठ चोळलंय. ते सांगलीत बोलत होते.
छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याचं काम आरएसएसच्या व्यक्तील दिलं असल्याचा आरोप काँग्रसचे खासदार राहुल गांधी यांनी केलायं. ते सांगलीत बोलत होते.
भाजपने हरियाणा विधानसभा निवडणुकीसाठी भाजपकडून उमेदवारांची पहिली यादी जाहीर करण्यात आलीयं. या यादीमध्ये 67 उमेदवारांची नावे घोषित करण्यात आले आहेत.
दोन दिवसांपूर्वी एसटी महामंडळाकडून पुकारण्यात आलेला संप अखेर मागे घेण्यात आला असल्याची आमदार गोपीचंद पडळकर यांनी दिलीयं. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंसोबतच्या बैठकीत तोडगा निघाल्याचंही पडळकरांनी यावेळी सांगितलंय.
बटले डॅनी...इतनी बात मत कर अगर दम है तो कुर्ला में आ हाजी अराफत शेख खडा है, या शब्दांत भाजपचे नेते हाजी अराफत शेख यांनी आमदार नितेश राणे यांना घरचा आहेर दिलायं.
वीजबिल थकबाकीदारांना सरकारने मोठा दिलासा दिला असून येत्या 1 सप्टेंबरपासून 'अभय योजना' लागू करण्यात येणार आहे. या योजनेद्वारे थकबाकीदारांना दिलासा मिळणार आहे.
वडगाव शेरी विधानसभा मतदारसंघाच्या जागेवरुन राष्ट्रवादी-भाजपातील वाद विकोपाला गेला असून भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे यांच्यासमोरच कार्यकर्त्यांनी तक्रार केलीयं.
प्रदीप मुखर्जी लिखित परमात्मांचा संदेश पुस्तकाचे अहमदनगरमध्ये प्रकाशन करण्यात येणार असून एक संवाद प्रदीप सरांशी या कार्यक्रमातून प्रदीप मुखर्जी संवाद साधणार आहेत.
पुण्यातील माजी नगरसेवक वनराज आंदेकर यांच्या मारेकऱ्यांना पोलिसांनी ताम्हिणी घाटातून ताब्यात घेतलंय. या प्रकरणी 13 जणांना अटक केलीयं.
अहमदनगर महापालिका कर्मचार्यांना सातवा वेतन आयोग लागू करण्याच्या प्रस्तावावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी स्वाक्षरी केली असल्याची माहिती आमदार संग्राम जगताप यांनी दिलीयं.