बिहारचं इलेक्शन येतंय, तुम्ही हिंदी घ्या आम्ही मराठीची बाजू घेतो, असंच काहीसं राजकारण झालं असावं असं भाकीत ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरेंनी केलंय.
महाराष्ट्र प्रमियर लीगसाठी पुनीत बालन ग्रुपचा 'कोल्हापूर टस्कर' संघ सज्ज झाला असून टीममध्ये नव्या चेहऱ्यांनाही संधी देण्यात आलीयं.
निवडणुकीच्या दिवशी माझ्या अकाऊंटवर 10 लाख आले, असल्याचा आरोप निलंबित पोलिस अधिकारी रणजित कासलेंनी आमदार धनंजय मुंडेंवर केलायं.
मी कुठेही दर्ग्यात प्रवेश केलेला नाही, आरोप करणाऱ्यांनी व्हिडिओ समोर आणावा, असं स्पष्टीकरण राज्यसभा खासदार मेधा कुलकर्णी यांनी दिलंय.
बाप चोरल्याच्या मुद्द्यावर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बाळासाहेब ठाकरे यांचा व्हिडिओ दाखवत उद्धव ठाकरेंना प्रत्युत्तर दिलंय.
गालावरुन वारं गेलं, चांगली वाणी बंद, धनंजय मुंडेसाठी प्रार्थना करा, या शब्दांत भगवान बाबा गडाचे महंत नामदेव शास्त्री यांनी आमदार धनंजय मुंडे यांची पाठराखण केलीयं.
बुलढाण्यात दोन गटांत तुफान राडा झाला असून भाजपचे युवा तालुकाध्यक्ष नंदू लवंगे यांच्यासह इतर 6 जण गंभीर झाले आहेत.
नवा वक्फ सुधारणा कायदा बेकायदेशीरच असल्याचं सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर एमआयएमचे खासदार असदुद्दीन ओवेसी यांनी म्हटलंय.
महाराष्ट्रात आम्ही हिंदी भाषेची सक्ती महाराष्ट्रात खपवून घेणार नाही, असा थेट इशाराच मनसेचे अध्यक्ष राज ठाकरेंनी दिलायं.
ज्या व्यक्तीला अक्कल नाही त्याचं नाव गोपीचंद पडळकर असल्याचं म्हणत संभाजी ब्रिगेडने आमदार गोपीचंद पडळकरांचा वचपा काढलायं.