नव्या सरकारमध्ये एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्रिपद घेणार नाहीत, असा दावा शिंदेंचे विश्वासू नेते आमदार संजय शिरसाट यांनी केलायं.
बांग्लादेशातील हिंदुंवरील हल्ल्याच्या मुद्द्याबाबत मी केंद्र सरकारच्यासोबत असल्याचं पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी ठणकावून सांगितलंय.
महाराष्ट्रात राजस्थान, मध्यप्रदेशचा पॅटर्न राबवणार आहेत की नाही, याबाबत माहित नाही पण भाजप नेहमीच नव्या पिढीचा शोध घेत असल्याचं भाजपचे नेते चंद्रकांत पाटील यांनी सांगितलंय.
मुख्यमंत्रिपदाबाबत बाकीच्यांनी फुकटचा सल्ला द्यायची गरज नाही, या शब्दांत अजित पवार यांनी आमदार रोहित पवार यांच्यावर पलटवार केलायं.
आमच्यात मतभेत नाहीत, सर्वच निर्णय महायुतीच्या नेत्यांसोबत बसूनच घेतले जाणार असल्याचं भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केलंय.
दारुण झालेला पराभव EVM च्या माथी मारण्याचा केविलवाणा प्रयत्न विरोधकांकडून केला जात असल्याची जहरी टीका अजित पवार यांनी केलीयं.
अमोल खताळ यांना कोणीतरी बोलायला सांगतंय, ते माझी इमेज डॅमेज करण्याचा प्रयत्न करत असल्याचं प्रत्युत्तर काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात यांनी दिलंय.
मी कुठेही ताणून ठेवलेलं नाही, PM मोदी देतील तो निर्णय मान्य असेल या शब्दांत काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी क्लिअर सांगितलयं. ते ठाण्यात बोलत होते.
सर्वोच्च न्यायालयाने काय करावं हे एक पक्ष सांगणार का? या शब्दांत सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश डी.वाय. चंद्रचूड यांनी ठाकरे गटाला फटकारलंय. एका मुलाखतीत ते बोलत होते.
पाकिस्तानात इम्रान खान समर्थकांच्या आंदोलनाला हिंसक वळण लागलं असून या हिंसाचारात 6 सुरक्षा जवानांचा मृत्यू तर 100 जवान गंभीर जखमी झाले आहेत.