पावसाचा हाहाकार! घरांची पडझड, जनावरं मेली; पाथर्डीला तडाखा…

पावसाचा हाहाकार! घरांची पडझड, जनावरं मेली; पाथर्डीला तडाखा…

Ahilyanagar News : पाथर्डी शहर व परिसरात सोमवारी दुपारी वादळी वाऱ्यासह झालेल्या मुसळधार पावसाने (Heavy Rain) जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले. विजांच्या कडकडाटाने व जोरदार पावसाने अक्षरशः नागरिकांची दाणादाण झाली. तीव्र वादळामुळे अनेक ठिकाणी झाडे पडून नुकसान झाले आहे. तर काही ठिकाणी घरांची चांगलीच पडझड झाल्याचं चित्र पाहायला मिळतआहे. विशेष म्हणजे या अवकाळी पावसामुळे जनावरांचाही जीव गेलायं.

‘जट्ट रंधावा’ अन् ‘बिल्लो तेरी आंख कतल’ कोड; Jyoti Malhotra च्या मोबाईलमधलं सिक्रेट ओपन…

पाथर्डी तालुक्यात सोमवारी सायंकाळच्या सुमारास जोरदार पाऊस आणि वादळी वाऱ्याने हजेरी लावली. शहरासह मोहरी, मोहटादेवी, करोडी, कारेगाव, माणिकदौंडी, जाटदेवळा, सुरसवाडी, शिंदेवाडी, पिरेवाडी आणि आठरवाडी या भागांत पावसाच्या सरी कोसळल्या आहेत. काही ठिकाणी तुरळक, तर काही ठिकाणी सायंकाळी सरींच्या स्वरूपात पाऊस झाला. वादळी वाऱ्यामुळे ग्रामीण भागात झाडांच्या फांद्या तुटल्या, तर काही ठिकाणी झाडे रस्त्यावर कोसळली. या अवकाळी पावसाने तालुक्यातील शेतकऱ्यांना देखील मोठ्या नुकसानाला सामोरे जावे लागले आहे.

येत्या काळात केंद्रात सुळे तर राज्यात जयंत पाटील अन् रोहित पवार मंत्री होतील; लक्ष्मण हाकेंचा मोठा दावा

अवकाळीमुळे सातशेहून अधिक शेतकरी बाधित…
जिल्ह्यात मे महिन्यात झालेल्या अवकाळी पावसाने आणि वादळाने शेतकर्‍यांचे मोठे नुकसान केले असून, सुमारे 700 शेतकरी बाधित झाले आहेत. 325 हेक्टरहून अधिक क्षेत्रातील पिकांना पावसाचा तडाखा बसला आहे. फळबागा, भाजीपाला, चारा पिके आणि रब्बी हंगामातील शेतीला मोठा फटका बसला असून, कृषी विभागाकडून पंचनामे सुरू आहेत. दरम्यान, बाधित शेतकरी व हेक्टरची आकडेवारी अंतिम नाही. तसेच पावसाचा कहर देखील सुरूच असून आणखी नुकसान होण्याची शक्यता आहे.

हवामान विभागाने दिला इशारा…
हवामान विभागाने जिल्ह्यात येत्या 23 मेपर्यंत अवकाळी पावसाचा इशारा दिला आहे. या पार्श्वभूमीवर शेतकर्‍यांनी पिकांसह पशुधनाची विशेष काळजी घ्यावी, असा सल्ला कृषी विभागाने दिला आहे. विजा पडण्याचा धोका अधिक असल्याने नागरिकांनी सुरक्षित स्थळी राहावे. अवकाळी पावसाचा धोका अद्याप कायम आहे. शेतकर्‍यांनी हवामानाचा अंदाज पाहून पुढील शेती कामे करावीत व पशुधन सुरक्षित ठिकाणी ठेवावे, असे आवाहन प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube