मराठी रंगभूमीवर नवा विक्रम; अमेरिकेतही ‘वाडा चिरेबंदी’चा डंका!

मराठी रंगभूमीवर नवा विक्रम; अमेरिकेतही ‘वाडा चिरेबंदी’चा डंका!

Wada Chirebandi : सध्या जगभरात मराठी माणूस पसरलेला आहे त्यामुळेच मराठी नाट्यमंडळी परदेशात मराठी नाटकांचे प्रयोग करीत असतात. या नाटकांना चांगला प्रतिसादही मिळत असतो. मराठी नाटक ‘वाडा चिरेबंदी’ची (Wada Chirebandi) टीम सध्या अमेरिका दौऱ्यावर असून या नाटकाला प्रेक्षकांचा तुफान पाठिंबा मिळत आहे. वाडा चिरेबंदी या नाटकाच्या थ्रीडी नेपथ्याच्या डिझाईनने मराठी रंगभूमीवर एक वेगळा प्रयोग घडत असून नवा विक्रमही घडत असल्याचं पाहायला मिळतंय.

थ्री डी नेपथ्याच्या डिझाईनने इतिहास घडवलायं…
प्रसिद्ध नाटककार महेश एलकुंचवार यांनी ऐंशी ते नव्वदीच्या दशकादरम्यान लिहिलेली नाट्ययात्री म्हणजे ‘वाडा चिरेबंदी’. या नाटकाच्या 3 डी नेपथ्याच्या डिझाईनने मराठी रंगमंचावर एक वेगळा प्रयोग घडत आणि विक्रम घडत आहे. हे नाटक थ्री डे सेटमध्ये अवतरलं असून मागील तीन दशकातील एक अप्रतिम डिझाईन साकारण्यात आलंय. नेपथ्यकार प्रदीप यांनी वाडा चिरेबंदी थ्री डी सेटमध्ये साकारुन एक नवा इतिहास घडवलायं. वाडा चिरेबंदीचा हा वेगळा प्रयोग आता अमेरिकेतही नवीन विक्रम घडवत आहे.

यासंदर्भाआत दिग्दर्शक चंद्रकांत कुलकर्णी यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केलीयं. कुलकर्णी पोस्टमध्ये म्हणाले, “सर … “वाडा चिरेबंदी “
करूया अमेरिकेत…! फाईव्ह डायमेन्शनचा सर्वेसर्वा , आमचा मित्र शैलेश शेट्ये म्हणाला ….. आवडेल रे आम्हा सगळ्यांना.. पण मुख्य अडचण नेपथ्याची आहे मित्रा … डिझाईन तर पाठवा ! .. तो शांतपणे पुटपूटला… गेल्या ३ दशकातलं एक अप्रतिम डिझाईन , वन ॲंड ओनली नेपथ्यकार प्रदीपमामानं ( मुळ्ये ) बनवून एक इतिहास घडवलाय… त्यानं डिझाईन पाठवलं… मग सुरू झाला शैलेशचा ध्यास.. पाठपुरावा .. आणि तो फक्त चर्चा करायला चक्क भारतात आला … मग एका उडिपी हॅाटेलात २ तास मॅरेथॉन चर्चा झडली … आवश्यक रंगमंचाची लांबी, रुंदी, खोली … वेगवेगळ्या स्तरावरच्या खोल्या , मोठा दरवाजा, त्रिमितीचा आभास असणारा “वाडा “ अमेरिकेत उभा करायचाच असं शैलेशनं ठाम ठरवलंच होतं हे लक्षात आल्यावर मलाच टेंशन आलं … अर्थात आमचा दुसरा मित्र प्रमोद पाटील त्याच्याबरोबर भावासारखा खंबीरपणे उभा होताच … मग प्रदीप , श्रीपाद, शैलेश असे सतत फोनवर बोलत होते… शैलेशनं नेपथ्याचं साहित्य मुंबईत बनवून घेतलं .. शिपमेंट करून ते अमेरिकेत पोहोचलं .. एक मोठ्ठा ट्रक महिनाभर बूक करून , हा नाट्यवेडा संयोजक बॅास्टन ते सॅनहोजे , अशा १० सेंटर्स वर “वाडा”चे प्रयोग करण्यासाठी चक्क ६,५०० कि.मी. स्वतः ट्रक चालवत फिरतोय… हे अफाट साहस- धाडस आहे मित्रा शैलेश … शक्यतो कमी नटसंच , मिनिमम नेपथ्य आणि विनोदी नाटक अशी प्रपोजल्स ठरवण्याच्या काळात तुझ्या या विक्रमाची इतिहासात नक्की नोंद होईल!” असं कॅप्शन देत कुलकर्णी यांनी वाडा चिरेबंदीचा अमेरिकेतील प्रवासाचं वर्णन केलंय.

वाडा चिरेबंदी या नाटकाने अमेरिकेतील मराठी प्रेक्षकांच्या मनात एक वेगळं स्थान निर्माण केलं आहे. मराठी रंगभूमीवरील प्रेक्षक, समीक्षकांसह रसिकांकडून मिळणाऱ्या कौतुकाच्या थापेमुळे या नाटकाचा अमेरिकेतही जोमाने दौरा सुरु आहे.

जरांगे यानेच सगळ्यात जास्त मराठा समाजाचे नुकसान केलं, मंत्रिपदाची शपथ घेताच भुजबळांचा हल्लाबोल

या नाटकामध्ये एकत्र कुटुंबपद्धतीचा होत चाललेला ऱ्हास, बदलत्या काळानुसार बदलणारी नाते आणि त्यातून तयार होणाऱ्या भावना रंगमंचावर अनुभवण्याचा हा एक अद्भूत अनुभव असल्याची भावना अनेक प्रेक्षकांकडून हे नाटक पाहिल्यानंतर व्यक्त करण्यात येत आहे. अमेरिकेतील मराठी संस्थांनी या नाटकाचे नियोजन केले असून नाटकाला उत्स्फुर्त असा प्रतिसाद मिळतोयं. अमेरिकास्थित शैलेश शेट्ये आणि प्रमोद पाटील यांच्या फाईव्ह डायमेन्शन्स संस्थेने या नाटकाचं आयोजन केलंय.

दरम्यान, जिगीषा-अष्टविनायक’ निर्मित या नाटकात निवेदिता सराफ, पौर्णिमा मनोहर, प्रतिमा जोशी, राजश्री गढीकर, धनंजय सरदेशपांडे, विनिता शिंदे, अजिंक्य ननावरे, सिमरन सैद, वैभव मांगले आणि प्रसाद ओक यांच्या महत्त्वपूर्ण भूमिका आहेत. दिलीप जाधव आणि श्रीपाद पद्माकर यांनी या नाटकाची निर्मिती केली आहे.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube