लोकसभा निवडणुकीची मतमोजणी सुरु असून पश्चिम महाराष्ट्रातील माढा, माळशिरस, शिरुर, हातकणंगले, बारामती आणि कोल्हापुरात महाविकास आघाडीचाच डंका असल्याचं दिसून येतंय.
बारामती लोकसभा मतदारसंघात महाविकास आघाडीच्या उमेदवार सुप्रिया सुळे चौथ्या फेरीअखेर 19 हजार मतांनी आघाडी आहेत.
सोलापुरातील माढा लोकसभा मतदारसंघात मतमोजणीला सुरुवात झाली असून महाविकास आघाडीचे उमेदवार धैर्यशील मोहिते 5 हजार मतांनी आघाडीवर आहेत.
दुष्काळी परिस्थितीवर सरकारने तातडीने पाऊलं न उचलल्यास संघर्षाची भूमिका घ्यावी लागणार असल्याचा इशारा शरद पवार यांनी मुख्यमंत्र्यांना पत्राद्वारे दिलायं.
पुढील 24 तासांत INDIA आघाडीचाच पंतप्रधान होणार असल्याचा भलताच कॉन्फिडन्स ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी व्यक्त केला आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी निवडणूक निकालाच्या एक दिवस आधी पोस्ट शेअर केलीयं. यामध्ये त्यांनी ध्यानधारणेचे अनुभव शेअर केले आहेत.
देशातील 64 कोटी नागरिकांनी मतदानाचा हक्क बजावला असून हा विश्वविक्रम झाला असल्याचं निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी म्हटलंय. ते पत्रकार परिषदेत बोलत होते.
पुणे अपघात प्रकरणी अल्पवयीन आरोपीची आई शिवानी अग्रवाल, वडिल विशाल अग्रवाल यांना 5 जूनपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आलीयं.
पंढरपुरातील विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात तळघर सापडल्याचं समोर आलं असून या मंदिराच्या तळघरात पुरातन मुर्ती आढळून आल्या आहेत.
पुण्यश्लोक अहिल्यादेवींच्या भूमीत राजकारण करणाऱ्यांची माती झाल्याचं डोळ्यांनी पाहिलं असल्याचं म्हणत गोपीचंद पडळकर बरसले आहेत. अहिल्यादेवी यांच्या जयंतीनिमित्त चौंडीमध्ये आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.