अशोक परुडे हे लेट्सअप मराठीमध्ये गेल्या अडीच वर्षांपासून कार्यरत आहेत. ते 'चीफ सब इडिटर' म्हणून जबाबदारी पार पाडत आहेत. गेल्या पंधरा वर्षांपासून पत्रकारितेत कार्यरत. पुढारी, देशदूत, महाराष्ट्र टाइम्समध्ये रिपोर्टर म्हणून जबाबदारी पार पाडली. क्राईम, राजकारण, आर्थिक, क्रीडा क्षेत्राची आवड.
प्रफुल्ल साळुंखे, विशेष प्रतिनिधी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनाकुळे यांची इंदापूरमध्ये जाहीर सभा झाली. सभेचे आयोजन माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी केले होत. हर्षवर्धन पाटील यांनी बावनकुळे यांच्यावर स्तुतीसुमने उधळली. बावनकुळे हे भाजप प्रदेशाध्यक्ष झाल्यापासून पायाला भिंगरी लावल्यासारखे कसे दौरे करत आहेत. त्यांनी महाराष्ट्र पिंजून काढला आहे याबाबत अनेक दाखले दिले आहेत. प्रत्येक कार्यकर्ता त्यांना थेट […]
नाशिकः काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांच्यावर भाजपवर जोरदार आरोप होत आहे. पंतप्रधानांचा अपमान करून राहुल गांधींनी ओबीसीचा अपमान केल्याचा आरोप त्यांच्यावर होत आहे. यावरून विरोधी पक्षाचे नेते ही भाजप नेत्यांना जोरदार फटकारत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांनी भाजपला फटकारले आहे. मोदी हे आडनाव आहे. ओबीसीची जात नाही, असे भुजबळ म्हणालेत. खासदारकी गेली आता […]
पुणे : भारतीय क्रिकेटपटू केदार जाधवचे वडील महादेव सोपान जाधव हे पुण्यातून बेपत्ता झालेले आहेत. महादेव जाधव यांचे (वय ७५, रा. प्लॅट नं. ००२, बी विंग, द पॅलेडियमन, सिटी प्राईडजवळ, कोथरूड) हे पुण्यातून बेपत्ता झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. या प्रकरणी अलंकार पोलिस स्टेशनला हरविल्याची नोंद करण्यात आली आहे. क्रिकेटर केदार जाधव यांचे वडील […]
अहमदनगरः जिल्हा बँकेच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसला बसलेल्या धक्क्याची दखल अजित पवार यांनी घेतली आहे. कालच्या कर्जत येथील सभेत याबाबत अजित पवार बोलले आहेत. नुसते बोललेच नाही. तर कोणी शेण खाल्लं आहे, त्याला असा झटका देईल की त्याच्या दहा पिढ्याला लक्षात राहिल, असा सज्जड इशारा दिला आहे. अजित पवार हे कसा करेक्ट कार्यक्रम करतात हे राष्ट्रवादी, […]
मुंबईः पंतप्रधान मोदी यांच्या आडनावाबाबत मानहानीकारक विधान केल्याप्रकरणी राहुल गांधी यांना सुरतच्या न्यायालयाने दोन वर्षांची शिक्षा सुनाविली आहे. त्यानंतर राहुल गांधी यांची खासदारकी रद्द करण्यात आली. काही दिवसांपूर्वी राज्यातील आमदार बच्चू कडू यांनाही दोन वर्षांची शिक्षा सुनाविण्यात आली होती. त्यांची आमदारकी धोक्यात आली होती. पण त्यांची आमदारकी रद्द झालेली नाही. काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांची […]
एखादी व्यक्ती जिद्द, मेहनत आणि प्रेमाच्या जोरावर ध्यानीमनी नसलेलं ध्येय साध्य करते. अशी हटके कहाणी तुम्हाला फुलराणी या चित्रपटात पाहायला मिळते. विश्वास जोशी दिग्दर्शित या चित्रपटात अभिनेत्री प्रियदर्शनी इंदलकर आणि सुबोध भावे मुख्य भूमिका साकारत आहेत. प्रियदर्शनी या चित्रपटातून मराठी चित्रपटसृष्टीत मुख्य भूमिका साकारत पदार्पण करतेय. महाराष्ट्राची हास्यजत्रा या कार्यक्रमातून तिने याआधी प्रेक्षकांचं लक्ष वेधून […]
मुंबईः राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड हे या अधिवेशनात आक्रमक होऊन बोलत आहेत. ठाण्यातील अनेक प्रश्नांवरून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि जितेंद्र आव्हाड यांच्यात जोरदार जुंपली आहे. आव्हाड यांनी ठाण्यातील गुन्हेगारीचा प्रश्न उपस्थित केल्यानंतर विजेसंदर्भातील टोरंटो कंपनीसंबंधित मुद्दा उपस्थित करताना मुख्यमंत्र्यांवर जोरदार निशाणा साधला आहे. टोरंटो प्रकरणी उगाच राजकीय पिना मारुन ते पाप माझ्या गळ्यात घालू […]
मदुराईः तामिळनाडू राज्यात एका कॅथॉलिक धर्मगुरुने महिलांचा लैंगिक छळ केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. कन्याकुमारी जिल्ह्यात ही घटना घडलीय. या प्रकरणी आरोपी फादर बेनेडिक्ट अँटोविरोधात गुन्हा नोंदविण्यात आला आहे. त्याला नागरकोइल येथील फॉर्महाउसमधून पोलिसांनी अटक केली आहे. टाइम्स ऑफ इंडियाने या संदर्भात वृत्त दिले आहे. या धर्मगुरुचे काही अश्लिल फोटो व्हायरल झाले होते. त्यामुळे संतप्त […]
अशोक परुडे Ahmednagar Politics: नगर आणि श्रीगोंदा तालुक्यांतील ३२ गावांना वरदान ठरणाऱ्या साकळाई उपसा जलसिंचन योजनेच्या सर्वेक्षणास जलसंपदा विभागाने मंजुरी दिली. त्यासाठी दोन कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यामुळेच हे झाल्याने त्यांचा कृतज्ञता सोहळा नगर तालुक्यात झाला. त्यात जिल्हा बँकेचे अध्यक्ष व भाजप नेते शिवाजी कर्डिले, विखे पिता-पुत्रांनी जोरदार राजकीय टोलेबाजी […]
Ahmednagar Politics: पारनेर तालुक्यातील रस्त्यांच्या कामाच्या निधीवरून खासदार डॉ. सुजय विखे (Sujay Vikhe) आणि राष्ट्रवादीचे आमदार निलेश लंके (Nilesh Lanke) यांच्यामध्ये चांगलीच जुंपली आहे. त्यावरून दोघांमध्ये टीका सुरू झाली आहे. आता खासदार विखे यांनी लंके यांना चांगलेच सुनावले आहे. कामे मंजूर झाल्याचे हवेत बोलत नाही. पुरावा लागत असेल, तर घेऊन जा असे विखे हे लंकेंना […]