मुंबईः प्रफुल्ल साळुंखे (विशेष प्रतिनिधी)-उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) हे दिल्लीच्या राजकारणात जाणार असल्याच्या चर्चा असतात. त्यात ते पुणे, नागपूर, मुंबईतून लोकसभा (Loksabha Election) निवडणूक लढतील, अशा चर्चाही सुरू होतात. परंतु देवेंद्र फडणवीस यांनीच या चर्चांना आता पूर्णविराम दिला आहे. मी नागपूरातून विधानसभा निवडणूक लढणार आहे, हे विधान उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकारासोबत अनौपचारिक गप्पामध्ये […]
AUS vs SA : वर्ल्डकपच्या (World Cup 2023) दुसऱ्या रोमहर्षक सेमीफायनलमध्ये ऑस्ट्रेलियाने दक्षिण आफ्रिकेचा (South Africa) पराभव करत फायनलमध्ये धडक मारली. येत्या रविवारी अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडियमवर भारत (India) व ऑस्ट्रेलिया संघ वर्ल्डकप जिंकण्यासाठी भिडणार आहेत. या सामन्यात प्रथम फलंदाजीला उतरलेल्या दक्षिण आफ्रिकेची सुरुवातीला दाणादाण उडाली. परंतु डेव्हिड मिलरच्या झुंजार शतकीय खेळीच्या जोरावर दक्षिण […]
जालना: राज्यात मराठा आरक्षणावरून (Maratha Reservation) ओबीसी आणि मराठा नेत्यांमध्ये जोरदार जुंपली आहे. मराठा आंदोलनाचे नेते मनोज जरांगे यांनी आरक्षणासाठी राज्याचा दौरे काढला आहेत. जरांगे हे आक्रमक भाषा वापरून राज्यकर्त्यांना थेट इशारा देत आहे. तर मंत्री छगन (Chhagan Bhujbal) भुजबळ ही मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र देऊन ओबीसीत घेऊ नये, यासाठी जोरदार विरोध करत आहेत. […]
AUS vs SA : वर्ल्डकपमधील (World Cup 2023) दुसऱ्या सेमीफायनलमध्ये दक्षिण आफ्रिकेने ऑस्ट्रेलियासमोर 213 धावांचे लक्ष्य ठेवले आहे. दक्षिण आफ्रिकेचे (South Africa) सुरुवात खराब झाली. टॉप ऑर्डरमधील चारही फलंदाज संघाच्या 24 धावांवर तंबूत परतले होते. परंतु त्यानंतर ऑस्ट्रेलियाच्या वेगवान गोलंदाजांसमोर डेविड मिलरने झुंजार खेळी केली. त्याने शानदार शतकही झळकविले आहे. वर्ल्डकपमधील त्याचे पहिले शतक आहे. […]
पुणेः मराठा आरक्षणासाठी (Maratha Reservation) लढणारे मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांचा बोलविता धनी कोण आहे? निवडणुकांच्या तोंडावर जातीय वाद पेटविण्यासाठी त्यांच्या आडून दुसरे कोणीतरी बोलण्याचा प्रयत्न करत आहे का? असा सवाल मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackrey) यांनी उपस्थित केला आहे. त्याला आता मराठा आंदोलक मनोज जरांगे यांनी थेट उत्तर दिले आहे. राज […]
मुंबईः सहारा इंडियाचे प्रमुख सुब्रतो रॉय (Subrato Roy) यांचे निधन झाले आहे. आजारपणामुळे त्यांना मुंबईतील कोकिलाबेन धीरूभाई अंबानी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. मंगळवारी रात्री उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली आहे. ते 75 वर्षांचे होते. गेल्या काही दिवसांपासून ते आजारी होते. त्यांच्या निधनाबद्दल देशभरातून शोक व्यक्त करण्यात येत आहे.त्यांचे पार्थिव लखनौमध्ये नेण्यात येणार असून, तेथे सहारा […]
नवी दिल्ली:आपचे प्रमुख आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल (Arvind Kejariwal), काँग्रेस नेत्या प्रियंका गांधी (Priyanka Gandhi) यांना भारत निवडणूक आयोगाने कारणे दाखवा नोटीस काढली आहे.निवडणूक प्रचारादरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबाबत वादग्रस्त विधान केल्याप्रकरणी ही नोटीस काढण्यात आली आहे. केजरीवाल आणि प्रियंका गांधी यांना येत्या दोन दिवसांत,गुरुवारपर्यंत नोटीसाला उत्तर द्यायचे आहे. एका रॅलीमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी […]
मुंबई: एेन दिवाळीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) गटाचे नेते रामदास (Ramdas Kadam) कदम आणि खासदार गजानन कीर्तिकर (Gajanan Kiritkar) यांच्यात जोरदार जुंपली होती. त्यात रामदास कदम यांनी गजानन कीर्तिकर यांच्यावर थेट वैयक्तिक पातळीवरून टीका केली होती. त्यामुळे या दोघांतील वाद आणखी टोकाला जाईल, असे वाटत होते. परंतु आता दोन्ही नेते हे मुख्यमंत्री एकनाथ […]
बीडः मराठा आरक्षणाच्या (Maratha Reservation) मागणीच्या आंदोलनाला बीडमध्ये हिंसक वळण लागले होते. बीडमध्ये जिल्ह्यात मोठी जाळपोळ झाली. आमदार संदीप (MLA Sandip Shirsagar) क्षीरसागर यांचे घरही जाळण्यात आले. तर राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरद पवार गट) कार्यालय जाळण्यात आले.या कार्यालयात आमदार रोहित पवार व संदीप क्षीरसागर यांच्यासह कार्यकर्त्यांनी दिवाळी पाडवा साजरा केला. यावेळी आमदार क्षीरसागर यांनी पोलिस प्रशासनावर […]
पुणे : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांच्या जन्म दाखल्यावरून ते ओबीसी असल्याचा दावा केला जात आहे.यावरून जोरदार आरोप-प्रत्यारोप होत आहेत.आज शरद पवार यांनीच आपल्या जन्म दाखल्याबाबत भूमिका मांडली आहे. जन्माने जी प्रत्येकाची जात असते ती लपवू शकत नाही.सर्व जगाला माझी जात कोणती हे माहीत आहे, असे शरद पवारांनी म्हटले आहे. त्यावरून राजमाता […]