टी 20 विश्वचषकात पाकिस्तान संघाला सुपर ओव्हरमध्ये पराभूत करून नवख्या अमेरिकेच्या संघाने इतिहास रचला.
बारामतीमधील विजयानंतर आज सुप्रिया सुळे पुणे शहरात आल्या होत्या. यावेळी कार्यकर्त्यांनी गुलालाची उधळण करत त्यांचे स्वागत केले.
उत्तर प्रदेश सरकारमधील मंत्री दिनेश प्रताप सिंह यांचा रायबरेली मतदारसंघात पराभव झाला.
राज्यात आज नैऋत्य मोसमी पावसाचे आगमन झाले आहे. रत्नागिरी, सोलापूर, मेडक, भद्राचलम, विजयनगर असा पाऊस सुरू झाला आहे.
लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रातील महायुती उमेदवारांच्या प्रचारासाठी मोदींनी 17 सभा घेतल्या यातील फक्त 3 उमेदवार विजयी झाले.
लोकसभा निवडणुकीनंतर चंद्राबाबू नायडूंच्या टीडीपी आणि नितीश कुमारांच्या जेडीयूचं महत्व प्रचंड वाढलं आहे.
भाजप आणि जेडीयूच्या जागांचा स्ट्राइक रेट कमी झाला आहे. याबाबतीत समाजवादी पार्टी आणि काँग्रेसचा फायदा झाला आहे.
लोकसभा निवडणुकीतील महायुतीच्या पराभवाची जबाबदारी घेत देवेंद्र फडणवीस यांनी राजीनाम्याची तयारी दर्शवली.
यंदाच्या निवडणुकीचा एक वैशिष्ट्य राहिलं ते म्हणजे सत्ताधारी पक्षाच्या ताब्यात असलेल्या 208 जागा विरोधकांनी काबीज केल्या.
टी 20 विश्वचषक स्पर्धेत भारतीय संघाने विजयी सुरुवात केली आहे. पहिल्याच सामन्यात आयर्लंडवर एकतर्फी विजय मिळवला.