Lok Sabha Election : लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर (Lok Sabha Election 2024) राज्यात महाविकास आघाडीची शकले होत असताना महायुतीत ‘फिलगुड’ वातावरण आहे. महायुतीत आणखी एक नव्या ‘मित्रा’ची एन्ट्री होण्याची दाट शक्यता दिसत आहे. निवडणुकीत मनसेला दोन जागांची चर्चा, मनसे आणि भाजप नेत्यांच्या गाठीभेटी, भाजप नेत्यांकडून मनसेच्या नेत्यांना आग्रहाचं आमंत्रण, भाजपच्या कार्यक्रमांना मनसे नेत्यांची हजेरी.. या सगळ्या […]
NCP Party and Symbol Hearing : केंद्रीय निवडणूक आयोगाने राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि चिन्ह अजित पवार (Ajit Pawar) यांना देण्याचा निर्णय घेतला होता. या निर्णयाविरोधात शरद पवार गटाने सर्वोच्च न्यायालायात धाव घेतली. या प्रकरणी दाखल याचिकेवर आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी पार पडली. या सुनावणीत आज सर्वोच्च न्यायालयाने अजित पवार गटाला तुम्ही दुसरे चिन्ह का निवडत […]
Sharad Pawar Criticized Modi Government : ‘मला आठवतं, एकदा यवतमाळ जिल्ह्यात शेतकऱ्याने आत्महत्या केली त्याची माहिती घेण्यासाठी आम्ही गेलो. त्या कुटुंबाला भेटलो. मी शेतकऱ्याच्या पत्नीला विचारलं, तुझ्या मालकानं आत्महत्या का केली? तिनं सांगितलं, मुलीचं लग्न ठरलं होतं. सावकाराचं कर्ज होतं. पण बँकेने नोटीस पाठवली. घरातली भांडीकुंडी बाहेर काढली. यानंतर मुलीचं लग्न मोडलं. ऐकून धक्का बसला. […]
Jayant Patil : लोकसभेच्या निवडणुका कधीही जाहीर होऊ शकतात. त्यामुळे जागावाटपाच्या चर्चा अंतिम टप्प्यात आल्या आहेत. सभा आणि मेळाव्यांचा धडाका सुरू झाला आहे. महाराष्ट्रात तर अटीतटीची लढाई होणारच आहे. नेत्यांची वक्तव्ये तर तशीच येत आहेत. आताही शरद पवार गटाचे प्रवक्ते जयंत पाटील (Jayant Patil) यांनी निफाड येथील सभेत केलेल्या वक्तव्याची तुफान चर्चा होत आहे. “मी […]
Lok Sabha Election 2024 : भारतीय जनता पार्टीने रावेर लोकसभा मतदारसंघातून विद्यमान खासदार रक्षा खडसे (Raksha Khadse) यांना उमेदवारी जाहीर केली आहे. या मतदारसंघात भाजपने पत्ते खुले केले. त्यानंतर विरोधी पक्षातील राजकारणाने वेग घेतला आहे. काल मध्यरात्री राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार, आमदार एकनाथ खडसे आणि मुलगी रोहिणी खडसे यांच्यात बंद दाराआड […]
Lok Sabha Election : निवडणुकीच्या आधी एकनाथ खडसेंचा शरद पवार गटात प्रवेश.. पक्षाकडून तिसऱ्यांदा उमेदवारी मिळणार नाही.. एकाच मतदारसंघात तिसऱ्यांदा उमेदवारी पक्ष कशी देणार? रक्षाताईंचं तिकीट कट होणार अशा नकारात्मक चर्चा रावेर मतदारसंघात सुरू होत्या. भारतीय जनता पार्टीची स्ट्रॅटेजी पाहिली तर खरंच आपल्याला उमेदवारी मिळणार का, असा सवाल रक्षा खडसेंच्या मनात होता. त्यांचंही टेन्शन वाढलं […]
BJP Candidate List : लोकसभा निवडणुकीसाठी काल भारतीय जनता पार्टीने दुसरी यादी (BJP Candidate List) जाहीर केली. या यादीत महाराष्ट्रातील 20 मतदारसंघातील उमेदवारांची घोषणा करण्यात आली. यादी जाहीर होण्याआधी असे (Lok Sabha Election) सांगितले जात होते की भाजप अनेक खासदारांची तिकीटे कापणार. परंतु, तीन ते चार खासदारांचा अपवाद वगळता भाजपाचं धक्कातंत्र कुठे दिसलं नाही. विद्यमान […]
BJP Candidate List : लोकसभा निवडणुकीसाठी भारतीय जनता पार्टीने काल उमेदवारांची दुसरी (BJP Candidate List) यादी जाहीर केली. या यादीत महाराष्ट्रातील 20 उमेदवारांचा समावेश आहे. पहिल्या यादीत दिग्गज नेते आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांचे नाव नव्हते. त्यामुळे विरोधकांनी मोठे काहूर उठवले होते. गडकरींचा पत्ता कट होणार, मोदी शहांकडून गडकरींना साईडलाईन करण्याचा डाव […]
Sharad Pawar : नाशिक लोकसभा मतदारसंघाच्या उमेदवारीवरून महायुतीत धुसफूस सुरू असताना दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी मात्र उमेदवारीचं गणित सहज सोडवलं. जागावाटपात नाशिक लोकसभा मतदारसंघ उद्धव ठाकरे गटाकडे आहे. दिंडोरी लोकसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) उमेदवार देणार आहे, अशी मोठी घोषणा शरद पवार यांनी आज पत्रकार […]
Maharashtra Politics : काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) भारत जोडो न्याय यात्रा घेऊन नंदूरबारमध्ये दाखल झाले. नेमक्या याच वेळी भाजपने राजकारणाचा डाव टाकत काँग्रेसचा मोठा नेता गळाला लावला. नंदूरबार जिल्ह्याचे माजी पालकमंत्री उत्तर महाराष्ट्रातील काँग्रेसचे बडे प्रस्थ पद्माकर वळवी (Padmakar Valvi) आता भाजपवासी झाले आहेत. भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, खासदार अशोक चव्हाण यांच्या उपस्थितीत […]