नाथाभाऊंची वेगळी वाट, उमेदवारीची धाकधूक, तरीही तिकीट मिळालंच; रक्षा खडसेंनी सांगितलं अर्ध्या लढाईचं सत्य

नाथाभाऊंची वेगळी वाट, उमेदवारीची धाकधूक, तरीही तिकीट मिळालंच; रक्षा खडसेंनी सांगितलं अर्ध्या लढाईचं सत्य

Lok Sabha Election : निवडणुकीच्या आधी एकनाथ खडसेंचा शरद पवार गटात प्रवेश.. पक्षाकडून तिसऱ्यांदा उमेदवारी मिळणार नाही.. एकाच मतदारसंघात तिसऱ्यांदा उमेदवारी पक्ष कशी देणार? रक्षाताईंचं तिकीट कट होणार अशा नकारात्मक चर्चा रावेर मतदारसंघात सुरू होत्या. भारतीय जनता पार्टीची स्ट्रॅटेजी पाहिली तर खरंच आपल्याला उमेदवारी मिळणार का, असा सवाल रक्षा खडसेंच्या मनात होता. त्यांचंही टेन्शन वाढलं होतं. पण, पक्षातील नेत्यांची साथ आणि पक्षनेतृत्वाचा धक्कातंत्राला फाटा या गोष्टी विद्यमान खासदार रक्षा खडसे यांना तिसऱ्यांदा उमेदवारी मिळवून देण्यात महत्वाच्या ठरल्या. भारतीय जनता पार्टीने बुधवारी उमेदवारांची दुसरी यादी जाहीर केली त्यात रावेर लोकसभा मतदारसंघाच्या विद्यमान खासदार यांनी उमेदवारी जाहीर करण्यात आली.

रावेर मतदारसंघ भारतीय जनता पार्टीचा स्ट्राँग होल्ड असलेला मतदारसंघ म्हणून ओळखला जातो. या मतदारसंघात दोन वेळेस रक्षा खडसे या भाजपाच्या तिकीटावर निवडून आल्या आहेत. यंदा मात्र जळगाव जिल्ह्याच्या राजकारणाला कलाटणी देणाऱ्या अनेक घटना घडल्या. भाजपातील कारभाराला कंटाळून एकनाथ खडसेंनी पक्ष सोडला.  शरद पवारांना साथ दिली. त्यानंतर गौणखनिजाच्या प्रकरणाचा ससेमिराही खडसे कुटुबियांच्या पाठीमागे लागला. तर दुसरीकडे भाजप नेत्यांच्या मनात काही वेगळं चाललंय का, एकाच उमेदवाराला तिसऱ्यांदा कशी उमेदवारी द्यायची असे प्रश्न निर्माण झाले होते.

जुन्या शिलेदारांवर भिस्त, 13 खासदारांना पुन्हा तिकीट; धक्कातंत्राचा प्रयोगही ‘सावध’

यातूनतच मग रक्षा खडसेंना यंदा तिकीट मिळणार नाही अशा चर्चा मतदारसंघात सुरू झाल्या होत्या. परंतु, तिकीट देताना खासदाराचे मतदारसंघातील काम आणि जनतेचा कौलही विचारात घेतला जातो. यात जनतेने नेहमी माझंच नाव पुढे ठेवलं. तिकीट मिळेल असा विश्वास वाटत होता. जनतेच्या पाठिंब्याच्या बळावर पक्ष नेतृत्वाने मला तिसऱ्यांदा संधी दिली, असे मत खासदा रक्षा खडसे यांनी व्यक्त केले.

एका बाजूला भीती वाटत होती. भीतीचं वातावरण काही दिवसांपासून जिल्ह्यात होतं. दहा वर्षांपासून संघटनेत आणि मतदारसंघात मी जे काही काम केलं आहे. ज्यावेळी मी मतदारसंघात फिरायचे त्यावेळी जनतेचा मला नेहमीच पाठिंबा राहिला. संघटनेने मला जी जबाबदारी दिली ती पूर्ण करण्याचा नेहमीच प्रयत्न केला. त्यामुळे विश्वास होता की संघटना माझा विचार करील. आज या गोष्टीचा आनंद आहे की मागील काळात काही गोष्टी घडल्यानंतर सुद्धा पक्षाच्या नेत्यांनी माझ्यावर विश्वास ठेवला, असेही रक्षा खडसे म्हणाल्या.

नगर दक्षिणेमध्ये विखे विरुद्ध लंके लढत? उद्या लंकेचा पक्षप्रवेश…

गौणखनिज प्रकरणाची फेरचौकशी 

गौणखनिज प्रकरणात 137 कोटींच्या वसुलीची जी नोटीस आली त्यात माझाही शेअर होता. या प्रकरणात मी सरकारकडे माझं म्हणणं मांडलं. सत्यता काय आहे ते सांगितलं. त्यात त्यांनाही तथ्य जाणवलं आणि सरकारने या वसुलीला स्थगिती दिली. सरकारने नोटिसीत स्पष्ट सांगितलं आहे की या प्रकाराची फेरचौकशी होणार, असे रक्षा खडसे यांनी एका प्रश्नाच्या उत्तरात स्पष्ट केले.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube