Lalu Yadav : काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांना लवकर लग्न करण्याचा सल्ला देणारे आरजेडी प्रमुख लालूप्रसाद यादव (Lalu Prasad Yadav) पुन्हा एकदा अशाच वक्तव्याने चर्चेत आले आहेत. विरोधी पक्षांकडून पंतप्रधान पदाचा उमेदवार कोण असेल आणि राहुल गांधी यांनी दिलेल्या लग्नाच्या सल्ल्यावर त्यांनी भाष्य केले. विमानतळावर पत्रकारानी लालू प्रसाद यादव यांना घेरले. त्यावेळी पत्रकारांनी […]
Vinayak Raut : उद्धव ठाकरेंनी साद दिली तर त्याला सकारात्मक प्रतिसाद देऊ, असं म्हणत मंत्री शंभुराज देसाई यांनी खळबळ उडवून दिली होती. या विधानावरुन मुख्यमंत्री शिंदे यांनी देसाईंना झापलं असल्याची माहिती सुत्रांनी दिली. असे असले तरी शिंदे गटातील नेत्यांची नाराजी आता स्पष्टपणे बाहेर येऊ लागली असून त्याला ठाकरे गटाच्या नेत्यांकडून हवा दिली जात आहे. ठाकरे […]
Raj Thackeray : राष्ट्रवादीतील अजित पवारांच्या बंडानंतर महाविकास आघाडीतील घालमेल वाढली आहे. आघाडीतील घटक पक्ष नवीन मित्राची शोधाशोध करत आहेत. यातच मनसे आणि ठाकरे गट एकत्र येणार असल्याच्या जोरदार चर्चा सुरू झाल्या होत्या. मनसे नेते अभिजीत पाटील यांनी ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांची भेट घेतल्याने या चर्चा सुरू झाल्या होत्या. मात्र, या […]
Chandrashekhar Bawankule on Bacchu Kadu : अजित पवार यांनी राष्ट्रवादीत काँग्रेसमध्ये बंड करून दोन दिवस उलटून गेले आहेत. मात्र या राजकीय भूकंपाचे सत्तेत आधीपासूनच सहभागी असलेल्या शिंदे गटाला जबरदस्त हादरे बसले आहेत. शिंदे गटाच्या काही आमदारांनी नाराजी स्पष्टपणे बोलूनही दाखविली आहे. यामध्ये आमदार बच्चू कडूही (Bacchu Kadu) आहेत. या घटनांमुळे नाराज असल्याच्या चर्चा आहेत. मात्र, […]
Sharad Pawar vs Chandrashekhar Bawankule : ‘पवार साहेब मग तुम्ही शिवसेनेबरोबर जाऊन मोठे झालात का? उद्धव ठाकरेंसोबत जाऊन तुम्ही मोठे झालात का? काही काळ तुम्ही सत्तेत आलात पण आज काय परिस्थिती आहे? ना पक्ष राहिला, पक्षातील निष्ठावान लोक बाहेर चालले. तुमच्या पक्षाची स्थिती केंद्रात चांगली नाही. राज्यातही तीच परिस्थिती आहे. आता तर इतकी वाईट परिस्थिती […]
Maharashtra State Cooperative Bank Scam : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील फाटाफुटीमुळे राज्यातील राजकारण ढवळून निघाले आहे. रोजच खळबळजनक घटना घडत आहेत. त्यातच आता शिखर बँकेतील घोटाळ्याप्रकरणी उपमुख्यमंत्री अजित पवार व त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यती असल्याची बातमी धडकली आहे. या प्रकरणात अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) जे आरोपपत्र दाखल केले होते त्या आरोपपत्राची विशेष […]
Chagan Bhujbal : अजित पवार (Ajit Pawar) यांनी राष्ट्रवादीत बंडाचे निशाण फडकवत शिंदे-फडणवीस सरकारला पाठिंबा दिला. त्यांच्यासह राष्ट्रवादीच्या 9 आमदारांनीही मंत्रीपदाची शपथ घेतली. यानंतर काल मुंबईत दोन्ही गटाच्या बैठका झाल्या. अजित पवार यांनी आपल्या भाषणात राष्ट्रवादी काँग्रेसमधील अंतर्गत राजकारणावर जोरदार प्रहार केले. पक्षात असताना आपल्याला काय त्रास सहन करावा लागला हे ही सांगितले. साहेब, बडव्यांना […]
Sanjay Raut : अजित पवार (Ajit Pawar) यांनी राष्ट्रवादीत फूट पाडून उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर राज्यातील राजकारणाचे चित्रच बदलून गेले आहे. शिंदे गट आणि भाजपात आणखी एका साथीदाराची भर पडली आहे. आता अजितदादांबरोबर आणखी 9 आमदारांनीही शपथ घेतली. त्यामुळे या आमदारांनाही मंत्रीपदे द्यावी लागणार आहेत. आधीच्या शिंदे गटातील अनेकांना अजूनही मंत्रीपद मिळालेली नाहीत. त्यातच आणखी […]
Sharad Pawar : राष्ट्रीय राजधानी नवी दिल्लीत आज राष्ट्रवादी काँग्रेस (NCP Crisis) पक्षाच्या कार्यकारिणीची बैठक होणार आहे. या बैठकीआधी राज्यातील राजकारणात चर्चेचा विषय ठरणारी एक घटना घडली आहे. बैठकीआधी दिल्लीत अजित पवार (Ajit Pawar) गटाचा गद्दार असा उल्लेख असणारे बॅनर्स झळकले आहेत. दरम्यान, दिल्ली महानगरपालिकेने कारवाई करत हे बॅनर आता काढून टाकल्याची माहिती मिळत आहे. […]
Maharashtra Politics : राष्ट्रवादी काँग्रेसमधील फाटाफुटीनंतर पक्षातील आमदार, पदाधिकारी आणि कार्यकर्ते प्रचंड गोंधळात सापडले आहेत. अजित पवार यांच्या गटात जावे की राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनाच पाठिंबा द्यावा याचा निर्णय अनेक आमदारांना अजूनही घेता आलेला नाही. आमदारांची द्विधा मनस्थिती झाली आहे. आमदार सरोज अहिरे (Saroj Ahire) यांनीही असेच मत व्यक्त केले आहे. […]