Barsu Refinery News: सध्या बारसू रिफायनरीवरून राजकारण चांगलेच पेटले आहे. या रिफायनरीला स्थानिक नागरिकांसह विरोधकांनी जोरदार विरोध केला आहे. त्यात आज स्थानिक खासदार विनायक राऊत (Vinayak Raut) आंदोलकांना भेटायला जात होते, त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. मुंबईहून बारसूकडे जात असताना तिकडे जाऊ नये असे पोलिसांनी त्यांना सांगितले होते मात्र राऊत आपल्या भूमिकेवर ठाम होते. राऊत […]
Kirit Somaiya on Uddhav Thackeray : भाजप नेते किरीट सोमय्या (Kirit Somaiya) यांनी रायगड जिल्ह्यातील कोर्लई गावातील 19 बंगल्यांच्या घोटाळ्याप्रकरणी खळबळजनक दावा केला आहे. ठाकरे कुटुंबाविरोधातील ही 19 बंगल्यांची फाइल मला मिळाली आहे. 80 पानांची ही फाइल आहे. मंत्रालयाने काल मला ही फाइल दिली. फाइल मिळाली असली तरी ठाकरे यांनी गायब केलेले बंगले अजूनही मिळालेले […]
BRS News : तेलंगाणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांच्या बीआरएस (BRS) पक्षाची अनेकांना भुरळ पडत आहे. कन्नडचे माजी आमदार तथा केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांचे जावई हर्षवर्धन जाधव यांनी पक्षात प्रवेश केल्यानंतर आता विदर्भातील माजी आमदारानेही भारत राष्ट्र समितीचा झेंडा हाती घेतला आहे. तुमसर मोहाडी विधानसभा क्षेत्राचे माजी आमदार चरण वाघमारे यांनी भारत राष्ट्र समिती […]
Mann Ki Baat in Pune : पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या मन की बात (Mann Ki Baat) या कार्यक्रमाचा 100 वा भाग येत्या रविवारी सकाळी 11 वाजता प्रसारित होणार आहे. या कार्यक्रमाची जय्यत तयारी भाजपने केली आहे. मन की बातद्वारे मोदींचे संबोधन जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचावे यासाठी नियोजन केले जात आहे. पुणे शहरात तब्बल एक हजार ठिकाणी […]
Karnataka Assembly Elections 2023 : कर्नाटक विधानसभेच्या निवडणुकीत (Karnataka Assembly Elections) प्रचार शिगेला पोहोचला आहे. भाजप आणि काँग्रेसकडून जोरदार प्रचार केली जात आहे. भाजपने तर पंतप्रधानांनाही प्रचाराच्या मैदानात उतरवले आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह देखील राज्यात झंझावाती प्रचार करत आहेत. शाह यांनी बागलकोट येथे प्रचार सभेत काँग्रेसवर मोठा आरोप केला होता. ते म्हणाले होते की […]
Rohit Pawar : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी काल मुंबईतील पक्षाच्या युवा संवाद कार्यक्रमात भाकरी फिरवण्याचे नव्या चेहऱ्यांना पक्ष संघटनेत सामावून घेण्याचे संकेत दिले होते. त्यांच्या या वक्तव्यावर राज्याच्या राजकारणात जोरदार चर्चा सुरू असतानाच त्यांच्या या वक्तव्याची प्रचितीही आली आहे. राज्य विधिमंडळाच्या अत्यंत महत्वाच्या अशा लोकलेखा समितीच्या अध्यक्षपदासाठी राष्ट्रवादी काँग्रेसने कर्जत-जामखेड विधानसभा […]
शेतकरी व कष्टकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी किसान सभेने सुरू केलेला अकोले ते लोणी असा लाँग मार्च आज स्थगित करण्यात आला. नगर जिल्ह्याचे पालकमंत्री तथा राज्याचे महसूलमंत्री राधाकृष्ण विखे यांनी मोर्चेकऱ्यांशी यशस्वी चर्चा केली. त्यानंतर हा मोर्चा स्थगित करण्यात येत असल्याचे जाहीर करण्यात आले. विशेष म्हणजे, हा मोर्चा माजी महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांच्या संगमनेर तालुक्यातच थांबविण्यात आला. […]
Solapur News : करमाळा तालुक्यातील श्री आदिनाथ सहकारी साखर कारखान्याला जोरदार झटका बसला आहे. संचालक मंडळाची मुदत संपल्यानंतरही निवडणूक घेण्यात हलगर्जीपणा केल्याने कारखान्याचे संचालक मंडळच बरखास्त करण्यात आले आहे. या कारखान्यावर आता प्रशासकाची नियुक्ती करण्यात आली आहे. प्रशासक म्हणून प्रादेशिक सहसंचालक कार्यालयाचे विशेष लेखापरीक्षक बाळासाहेब बेंद्रे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. प्रशासक नियुक्त करण्याचा हा […]
Sushma Andhare : शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट (Sanjay Shirsat) यांच्याविरोधात ठाकरे गटाच्या प्रवक्त्या सुषमा अंधारे (Sushma Andhare) यांनी आज अखेर अब्रुनुकसानीचा दावा दाखल केला आहे. फक्त तीन रुपयांचा हा अब्रुनुकसानीचा दावा दाखल करण्यात आला आहे. सुषमा अंधारे यांच्यावर टीका करताना शिरसाट यांची जीभ घसरली होती. छत्रपती संभाजीनगर येथे झालेल्या मेळाव्यात त्यांनी अंधारे यांच्यावर टीका […]
Maharashtra Politics: राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते तथा विधानसभेतील विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) यांनी स्वतःच आपण राष्ट्रवादी काँग्रेस सोडून कुठेच जाणार नसल्याचे स्पष्ट केले आहे. मात्र तरी देखील त्यांची जी चलबिचल सध्या सुरू आहे ही काही राजकारणी मंडळींच्या नजरेतून सुटलेली नाही. त्यामुळे अजित पवारांबाबत काही प्रश्न आला की लागलीच त्यावर प्रतिक्रिया येतात. यामध्ये भाजप नेते […]