अवकाळी पावसाला मोठ्या प्रमाणात सुरूवात झाली असून हा पाऊस मुंबईत शिरला आहे. येथे अनेक ठिकाणी बॅनर कोसळल्याने मेट्रो सेवा ठप्प झाली आहे.
राज्यात चौथ्या टप्प्यातील मतदान होत आहे. यामध्ये 11 लोकसभा मतदारसंघ आहेत. त्यामध्ये दुपारी 3 वाजेपर्यंत 42.35 टक्के मतदान झालं आहे.
राज्यात लोकसभेचा चौथा टप्पा सुरू असताना भामरागड येथे नक्षलविरोधी मोठी कारवाई झाली असून यामध्ये तीन नक्षलवाद्यांचा खात्मा करण्यात आला आहे.
मराठ्यांनी जातीवाद केला असता तर गोपीनाथ मुंडे, प्रितम मुंडे, पंकजा मुंडे, धनंजय मुंडे इतक्या मोठ्या पदावर गेले असते? असं जरांगे पाटील म्हणाले
मी कायम भाजपसोबत होते. रोहिणी खडसे यांना काय निर्णय घ्यायचा हा त्यांचा अधिकार असं म्हणत मी पुन्हा निवडून येईल असा दावा रक्षा खडसे यांनी केला.
लोकसभा मतदानाच्या एक दिवस अगोद अहमदनगर शहरात माजी नगरसेवक सचिन जाधव आणि सागर मुर्तडकर यांचे कार्यकर्ते एकमेकांविरुद्ध भिडले.
असदुद्दीन ओवेसी म्हणाले, एकेदिवशी भारताला हिजाब घालणारी मुस्लीम महिला पंतप्रधान मिळेल. त्यांनी एका वृत्तपत्राला मुलाखतीत दिली.
जळगावच्या महायुतीच्या उमेदवार स्मिता वाघ यांनी 1019 ला आपलं तिकीट कापलं तरी आपण साथ दिली. पण उन्मेश पाटलांनी भूमिका बदलली अशी खंत व्यक्त केली
भाजपने प्रज्वल रेवण्णाची सीबीआय चौकशीची मागणी केली असून त्यांनी एसआयटीकडून होत असलेल्या तपासावर संशय घेतला आहे.
पुणे लोकसभा मतदारसंघातील मतदान सोमवारी पार पडणार असून, मतदान केंद्रांच्या परिसरात प्रतिबंधात्मक आदेश लागू करण्यात आले आहेत.