लाडकी बहीण योजना चालू ठेवायची असेल तर तुम्ही आमचं बटन दाबल पाहिजे असं आवाहन अजित पवार यांनी महिलांना केल. ते नाशिकमध्ये बोलत होते.
वसंत दादा पाटलांनंतर शब्दावर विश्वास ठेवावा असा नेता कोण असेल तर ते अजित दादा आहेत असं म्हणत तटकरे यांनी अजित पवारांचं कौतूक केलं.
वक्फ बोर्ड सुधारणा बिलावरून काँग्रेस टीका करत असल्याने उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काँग्रेस नेत्यांवर थेट घोटाळ्याचे आरोप केले.
मोस्ट वॉन्टेड दहशतवादी रिझवान अब्दुल याला दिल्ली पोलिसांना पकडण्यात मोठे यश मिळालं आहे. त्याला अटक करण्यात आली आहे.
कुख्यात गुंड राजू शिवशरण याचा मध्यरात्री दगडाने ठेचून खून करण्यात आला आहे. पुण्यातील रामटेकडी परिसरात ही घटना घडली.
वायनाडमधील भूस्खलनातील बेपत्ता लोकांच्या शोधार्थ दहा दिवसांपासून अथक मोहीम सुरू असताना आज लष्कराने अंशत: माघारी जाण्याचा निर्णय घेतला.
कोल्हापूरचा मानबिंदू संगीतसूर्य केशवराव भोसले नाट्यगृह काल रात्री अचानक लागलेल्या भीषण आगीत बेचिराख झाले. संपूर्ण कोल्हापूरकर हळहळले.
सुवर्ण मिळालं नाही याबाबत कसलीही खंत नाही. नीरजने सुवर्ण जिंकलं नसलं तरी नदीम देखील आमचाच मुलगा आहे असं नीरज चोप्राच्या आई म्हणाल्या.
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचा महाराष्ट्र दौरा नवनिर्माण यात्रा सुरु असून, त्यांनी मनसेच्या तिसऱ्या विधानसभा उमेदवाराची घोषणा केली.
भारताची कुस्तीपटू विनेश फोगाटला वजन 50 किलोपेक्षा 100 ग्रॅम जास्त आढळून आल्यानं अपात्र केल. त्यानंतर काय कमी राहिलं याची चर्चा सुरू झाली.