राष्ट्रवादी पक्ष नेमका कुणाचा?, घड्याळ कुणाला मिळणार?, सर्वोच्च न्यायालयात आज सुनावणी

Hearing on NCP Symbol and Name : सर्वोच्च न्यायालयात आज (ता.25) राष्ट्रवादी काँग्रेस नेमकी कोणाची ? तसंच, राष्ट्रवादी पक्षाचे चिन्ह नेमकं कोणाला मिळणार याबाबतचा निकाल येण्याची शक्यता आहे. या प्रकरणावर सुनावणी होणार आहे. (NCP ) यामुळे राजकीय वर्तुळात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या आधीच हा निकाल येण्याची शक्यता असल्याची चर्चा रंगली आहे. तसं झाल्यास राष्ट्रवादी पक्षासह घड्याळ (चिन्ह) नेमकं कोणाचं यावरून देखील आता कायमचा पडदा उठणार आहे.
राज्यात शिवसेनेत पडलेल्या फुटीमुळे अनेकांना धक्का बसला होता. या धक्क्यातून राज्मयातील जनता सावरते न सावरते तोच राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये देखील असाच बंड झाला. अजित पवार यांनी बंडखोरी करत पक्ष फोडत 40 हून अधिक आमदार आपल्याबाजूने करत थेट उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. त्यानंतर आधी निवडणूक आयोगात याबाबत राष्ट्रवादी विरोधात राष्ट्रवादी असा लढा झाला. ज्यात आयोगाने राष्ट्रवादी अजित पवार यांना दिली.
आधुनिक तंत्रज्ञान देण्यासाठी कायम प्रयत्नशील राहणार रयत मध्ये एआय तंत्रज्ञान आणणार -शरद पवार
फक्त पक्षच दिला नाही तर बहुमताच्या जोरावर पक्षाचे चिन्हही दिले. ज्यामुळे शरद पवार यांच्या गटाने राष्ट्रवादी काँग्रेससाठी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती. सध्या सर्वोच्च न्यायालयात राष्ट्रवादी कोणाची? यावरून कायदेशीर लढाई सुरू आहे. सर्वोच्च न्यायालयात आज (ता.25) सुनावणी होणार असून ती दुपारी 12 वाजल्यानंतर होणार आहे. तर आज निर्णय येण्याची शक्यता व्यक्त केली जातेय. यामुळे आजच्या होणाऱ्या सुनावणीकडे दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेससह राज्यातील जनतेचं लक्ष लागलं आहे.
अजित पवार यांच्या राष्ट्रवादीने लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीमध्ये घडयाळ चिन्हावर निवडणूक लढवली. तर शरद पवार यांना तुतारी हे चिन्ह देण्यात आले. अजित पवार गटाने सर्वाधिक 41 जागा जिंकल्या होत्या. तर शरद पवार गटाला फक्त 7 जागांवर समाधान मानावं लागलं होतं. दरम्यान आता स्थानिक निवडणुकीचा बिगुल वाजणार आहे. पण त्याआधी राष्ट्रवादी कुणाची? याचा निर्णय सुप्रीम कोर्टात लागण्याची शक्यता आहे.