नागपूरचे हिवाळी अधिवेशन संपले. त्यानंतर लगेचच राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांची सागर बंगल्यावर भेट झाली. दोघांमध्ये अर्धा तास चर्चा झाली. फडणवीस यांनी नाराज भुजबळ यांची समजूत काढण्यासाठी महायुतीचे नेते एकत्र बसून निर्णय घेतील, असे सांगितले. आता महिन्याभरानंतर केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) महाराष्ट्रात आले. मालेगावमधील कार्यक्रमाला […]
“वाट पाहीन पण एसटीने जाईन…” असं म्हणत दररोज लाखो प्रवासी लाल परीने प्रवास करतात. राज्यातील शहरे आणि खेड्यांना जोडणारी एसटी सर्वसामान्य प्रवाशांची जीवनवाहिनी मानली जाते. त्यामुळे महाराष्ट्राच्या अर्थकारणात एसटीचे अनन्यसाधारण महत्व आहे. लहान मुले, महिला, ज्येष्ठ नागरिक, अंध, अपंग, पुस्कारप्राप्त अशा अनेक घटकांना असलेली सवलत आणि इतर प्रवाशांनाही खिशाला परवडणारा दर असल्याने एसटीनेच प्रवास करण्याकडे […]
बीडमधील प्रशासन, पोलीस यंत्रणा ही राजकीय नेत्यांनी आणि त्यांच्या चेल्या चपाट्यांनी किती पोखरलीय, याची रोज नवनवी प्रकरणे समोर येत आहेत. वाल्मिक कराड आणि त्याच्या गुंडांच्या काळ्या कृत्यांकडे होत असलेले दुर्लक्ष, वाढलेली गुन्हेदारी, वाल्मिक कराडच्या आदेशावर सगळे नियम धाब्यावर बसवून अवघ्या तीन दिवसात अगदी दारूच्या दुकानाचे मिळणारे परवाने, वाल्मिक कराडच्या चौकशी पथकातच त्याच्याशी संबंधित असलेले पोलीस, […]
अडीच-तीन वर्षांपूर्वी झालेले एकनाथ शिंदे यांचे बंड पुन्हा आठवा. पक्षाच्या आमदारांनी बंडाचा झेंडा हाती घेण्यास सुरुवात केली. आणि बघता-बघता तब्बल 39 आमदारांनी पक्षनेतृत्वाला आव्हान दिले. एकनाथ शिंदेंसोबत (Eknath Shinde) बंडखोर गटात सामील होणे पसंत केले. पण ठाकरेंसोबत राहिले केवळ 16 आमदार. यात कोकणातून सोबत होते, वैभव नाईक, भास्कर जाधव (Bhaskar Jadhav) आणि ठाकरेंचे कडवट शिवसैनिक […]
खासदार सुनिल तटकरे (Sunil Tatkare), मंत्री आदिती तटकरे (Aditi Tatkare), पालकमंत्री आदिती तटकरे, विधानपरिषदेवर आमदार अनिकेत तटकरे. रायगडमध्ये मागचे पाच वर्षे तटकरे कुटुंबियांची ही दादागिरी शिवसेनेने (Shivsena) आणि आमदार भरत गोगावले (Bharat Gogavle) यांनी सहन केली. आताही नाय होय करत गोगावले मंत्री झाले पण पालकमंत्रीपद आदिती तटकरेंकडे गेले. राष्ट्रवादीच्या त्या जिल्ह्यातील एकमेव आमदार, तर शिवसेनेचे […]
एकच छंद, गोपीचंद… भाजप आमदार गोपीचंद पडळकर (Gopichand Padalkar) यांच्या समर्थकांनी प्रसिद्ध केलेले हे वाक्य. बोलण्याची लकब, आक्रमक शैली, योग्य शब्द फेक यामुळे पडळकर यांच्या रूपाने एक पठडीचा वक्ता भाजपला मिळाला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांचे निकटवर्तीय म्हणून ज्या मोजक्या आमदारांना ओळखले जाते त्यापैकी पडळकर एक. राष्ट्रवादी काँग्रेस, शरद पवार, जयंत पाटील, रोहित […]
अभिनेता सैफ अली खान (Actor Saif Ali Khan) मागच्या काही दिवसांपासून चर्चेत आहे तो त्याच्यावर झालेल्या हल्ल्यामुळे. सध्या उपचारानंतर त्याला हॉस्पिटलमधून डिस्चार्ज दिला आहे. शिवाय हल्लेखोराला आता अटक करण्यात आली आहे. सैफ अली खान पुन्हा चर्चेत येण्याचे कारण ठरले आहे ते त्याची संपत्ती. त्याच्याशी आणि पतौडी कुटुंबाची संबंधित भोपाळ येथील तब्बल 15 हजार कोटींची मालमत्ता […]
‘अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष’ (President of America) म्हणजे जगातील सर्वात अधिकाराची आणि ताकदीची व्यक्ती. त्यामुळे या पदाविरोधात किंवा पदावरील व्यक्तीविरोधात बोलण्याचे धाडस शक्यतो कोणी करत नाही. कारण त्यांना बोलणे म्हणजे थेट अमेरिकेलाच (America) अंगावर घेण्यासारखे आहे. त्यातही नवनियुक्त राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (President Donald Trump) यांना झापणे तर लांबच, त्यांच्या विरोधातही बोलण्याचे धाडस कोण करत नाही. असे कोणी […]
मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख (Santosh Deshmukh) हत्या प्रकरण ताजे आहे. या प्रकरणातील आठ आरोपींना अटक झाली आहे. या सर्वांवर मोक्का लावून त्यांची न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली आहे. तर तिसरा मुख्य आरोपी कृष्णा आंधळे (Krishna Andhale) अद्यापही फरार आहे. त्याला वाँटेड घोषित करण्यात आले आहे. एकूण तीन पातळ्यांवर या प्रकरणाची चौकशी सुरू आहे. या सगळ्या […]
डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump). अमेरिकेचे नवे राष्ट्राध्यक्ष. त्यांचा पहिला कार्यकाळ बघितल्यास कधी काय निर्णय घेतील, कधी काय बोलतील आणि कधी काय करतील याचा नेम नसायचा. आताही ट्रम्प यांनी दुसऱ्यांदा राष्ट्राध्यक्ष म्हणून शपथ घेतल्यानंतर अवघ्या 24 तासांत जगाला हादरवणारे अनेक निर्णय घेतले. यात जो बायडेन (joe biden) यांच्या काळातले तब्बल 78 निर्णय फिरवले आहेत. यातील काही […]