कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या (KDCC) कर्जवाटपात माजी मंत्री हसन मुश्रीफ (Hasan Mushrif) यांच्यावर झालेल्या छाप्यानंतर कोल्हापूर (Kolhapur) जिल्ह्यात खळबळ माजली होती. त्यानंतर याच प्रकरणात बँकेच्या पाच अधिकाऱ्यांची सुद्धा चौकशी करण्यात आली आहे. तसेच तीन माजी संचालकांची चौकशी करण्यात आली आहे. या सर्व पार्श्वभूमीवर आता कोल्हापूर जिल्ह्यातील काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आमदार पी. एन. पाटील (PN […]
शिवसेना (ठाकरे गट) नेत्या रोशनी शिंदे यांना झालेल्या मारहाणी प्रकरणी आयोजित निषेध मोर्चाला आणि सभेला अखेर ठाणे पोलिसांकडून (Thane Police) परवानगी देण्यात आली आहे. रोशनी शिंदे प्रकरणात पोलिसांनी पक्षपातीपणा केला असा आरोप ठाकरे गटानं केला आहे आणि त्याचा निषेध म्हणून शिवाजी मैदान ते पोलीस आयुक्तालय असा मोर्चा काढण्यात येणार आहे. ठाकरे गटाच्या नेत्या रोशनी शिंदे […]
Kolhapur collector office : आजवर अनेकदा तुम्ही सामान्य माणसांवर किंवा काही संस्थांवर जप्ती आल्याचं वाचलं असेल पण कधी थेट जिल्हाधिकारी कार्यालयावर जप्ती झाल्याचं ऐकलं आहे का, नसेल ऐकलं असेल. तर आता वाचा. कारण आज न्यायालयाने थेट कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यलयावर जप्तीचे आदेश दिले आहेत. कोल्हापूर जिल्हा प्रशासनाने वारंवार दुर्लक्ष केल्याने न्यायालयाने नुकसान भरपाई म्हणून थेट जिल्हाधिकारी […]
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दौऱ्याच्या तीन दिवस आधी तेलंगणा पोलिसांनी भाजप प्रदेशाध्यक्ष बंदी संजय यांना अटक केली आहे. काल रात्री 12 वाजण्याच्या सुमारास पोलीस त्यांच्या करीमनगर येथील निवासस्थानी पोहोचले आणि त्यांना जबरदस्तीने कारमध्ये बसवून घेऊन गेले. मीडिया रिपोर्ट्सनुसार पेपर लीक प्रकरणी त्याला चौकशीसाठी बोलावण्यात आले होते, पण ते त्याला उपस्थित राहिले नाहीत, म्हणून त्यांना अटक […]
ठाकरे गटाचे खासदार संजय राऊतांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधला आहे. काल ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका करताना त्यांना फडतूस म्हटले होते. यावरुन भाजपकडून त्यांच्यावर जोरदार टीका करण्यात आली. देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंवर जोरदार निशाणा साधत मी फडतूस नाही तर काडतूस असल्याचे म्हटले आहे. यावरुन संजय राऊतांनी आता […]
Forbe’s Rich List 2023 : भारतातील सर्वाधिक श्रीमंत व्यक्ती आणि रिलायन्स इंडस्ट्रीजचे प्रमुख मुकेश अंबानी हे पुन्हा एकदा आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती ठरले आहेत आहेत. फोर्ब्सने 2023 या वर्षातील अब्जाधीशांची यादी जाहीर केली आहे. त्यामध्ये मुकेश अंबानी पुन्हा एकदा नंबरवर राहिले आहेत. तर याच यादीत आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती ठरणारे मुकेश अंबानी जगातील टॉप – […]
अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांना काही वेळापूर्वी औपचारिक अटक करण्यात आली आहे. अटकेपूर्वी त्याला पोलीस कोठडीत ठेवण्यात आले आहे. आज सुनावणीसाठी न्यायालयात पोहोचताच त्याला अटक करण्यात आली. गुन्हेगारी आरोपांचा सामना करणारे ते अमेरिकेचे पहिले राष्ट्राध्यक्ष ठरले आहेत. काय आहे संपूर्ण प्रकरण? गोष्ट आहे २०१६ ची. डोनाल्ड ट्रम्प अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बनण्याची तयारी करत […]
राज्यात सत्ताधारी आणि विरोधक यांच्यातील शाब्दिक वाद संपता संपत नाही. मागील काही दिवसापासून ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे आणि शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट यांच्यातले वाकयुद्ध जोरदार पेटले आहे. आमदार संजय शिरसाट यांच्या आक्षेपार्ह राज्यभरातून त्यांच्यावर टीका करण्यात आली. ठाकरे गटाकडून यावर पोलिसात तक्रार दाखल करण्याचा देखील प्रयत्न केला. पण तक्रार दाखल होत नसल्याचे पाहून […]
राज्यभरात बाजार समिती निवडणुकीच्या चर्चा होत असताना मोहोळ बाजार समितीची निवडणूक बिनविरोध करण्यात माजी आमदार राजन पाटील यांना यश आले आहे. त्यामुळे तब्बल ७५ वर्ष एकहाती वरचष्मा असलेल्या मोहोळ (Mohol) बाजार समितीवर राजन पाटील (Rajan Patil) यांनी आपला दबदबा दाखवून दिला आहे. मोहोळ बाजार समितीची स्थापना १९५४ साली झाली तेव्हापासून आजवर राजन पाटील यांच्या परिवाराचेच […]
राज्यसभा न मिळाल्यामुळे काँग्रेसमधून बाहेर पडून नवा पक्ष स्थापन केलेल्या गुलाम नबी आझाद यांनी पुन्हा एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदींचे कौतुक केले आहे. गुलाम नबी आझाद तब्बल पाच दशकाहून अधिक काळ काँग्रेसचे नेते होते. पण काँग्रेसवर नाराज होत त्यांनी नवा पक्ष स्थापन केला आहे. ते भाजपच्या सोबत जातील अशा शक्यता वर्तवली जात आहे. या पार्श्वभूमीवर त्यांनी […]