राष्ट्रवादी काँग्रेसच्या ( NCP ) नेत्या व महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर ( Rupali Chakankar ) यांनी 2024 ची विधानसभा निवडणूक लढवण्याचे संकेत दिले आहेत. 2024 च्या विधानसभेसाठी त्या खडकवासला या मतदारसंघातून निवडणूक लढवू शकतात. एका वाहिनीला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी हे भाष्य केले आहे. चाकणकर या राष्ट्रवादीच्या काँग्रेसच्या एक फायब्रँड महिला नेत्या म्हणून ओळखल्या जातात. […]
मुंबई : एका अज्ञात व्यक्तीने मुंबईतील बीकेसी कार्यालयात फोन करून पुणे गुगल कार्यालयात (Pune Google Office) बॉम्ब ठेवण्याची धमकी (Threat) दिली. मात्र, या प्रकरणाची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी पोहोचले, मात्र त्यांना काहीही संशयास्पद आढळले नाही. फोन करणाऱ्याला ताब्यात घेण्यात आले असून त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आल्याचे पुणे पोलिसांनी (Pune Police) सांगितले. इमारतीला अलर्ट करण्याचा […]
तुर्कस्थानमध्ये झालेल्या भूकंपाची जगभर चर्चा असतानाच आज सकाळी सिक्कीमच्या (Sikkim Earthquake) काही भागात भूकंपाचे (Earthquake) धक्के जाणवले. पण भूकंपामुळे कोणतीही जीवितहानी किंवा मालमत्तेचे नुकसान झाल्याची कोणतीही माहिती नाही. राष्ट्रीय भूकंप केंद्राच्या माहितीनुसार पहाटे ४.१५ वाजता भूकंपाचे धक्के जाणवले. सिक्कीममधील युकसोमपासून 70 किमी ईशान्येला भूकंप झाला. An earthquake of magnitude 4.3 on the Richter scale occurred […]
पुणे : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांच्या ‘लोक माझे सांगाती’ या पुस्तकात शेतकऱ्यांचं कौतुक नाही. मात्र, गौतम अडाणीचं कौतुक केले आहे. शरद पवार म्हणजे ओसाड गावचे पाटील आहेत. अशा ओसाड गावच्या पाटलांच्या बोलण्याला अर्थ नसतो, अशी टीका माजी मंत्री सदाभाऊ खोत (Sadabhau Khot) यांनी केली. सदाभाऊ खोत म्हणाले की, आज ही सर्व […]
पंढरपूर : गेल्या काही दिवसांपासून गौतमी पाटीलच्या (Gautami Patil) कार्यक्रमांनी तरुणांना मोठ्या प्रमाणात भुरळ घातली. अनेक ठिकाणी राजकीय नेत्यांच्या वाढदिवस असो की गावातील कार्यक्रम असो गौतमी पाटीलला पहिलं निमंत्रण असतं. राष्ट्रवादीच्या (NCP) नेत्यांनी देखील गौतमीला बोलावण्याचे प्रकार केले, त्यामुळे अजित पवार (Ajit Pawar) चांगलेच संतापले होते. त्यामुळे अजित पवारांनी कार्यकर्त्यांना चांगलीच तंबी दिली होती. त्यानंतर […]
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे नेते संजय राऊत ( Sanjay Raut ) यांनी शिंदे गट व भाजपवर निशाणा साधला आहे. सामना वृत्तपत्राच्या अग्रलेखामध्ये त्यांनी शिंदे गटाचा उल्लेख सोनेरी टोळी असा केला आहे. मंत्र्यांच्या बंगल्यावर काय चालले याचा शोध पत्रकारांनी घ्यावा, असे ते म्हणाले. तसचे महाराष्ट्राचा मुख्यमंत्री हा पहिल्या दहामध्ये नाही, हे महाराष्ट्राचे दुर्दैव आहे. उद्धव […]
नवी दिल्ली : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात सध्या सुरू असलेल्या बॉर्डर- गावस्कर ट्रॉफी 2023 ची तिसरी कसोटी 1 मार्चपासून धर्मशाला येथे होणार होती, (Ind Vs Aus Test) परंतु धर्मशालाचे मैदान सध्या सामन्याचे आयोजन करण्यास अनुकुल नसल्याने ही कसोटी दुसऱ्या ठिकाणी हलवली जाणार आहे. (Ind Vs Aus ) सध्या बीसीसीआयने (BCCI) तिसऱ्या कसोटीच्या स्थानाविषयी कोणताही खुलासा […]
कल्याण : केंद्रीय मंत्री अनुराग ठाकुर दुसऱ्यांदा कल्याण लोकसभेचा दौरा करणार आहेत. एक दिवसीय दौरा आहे. ठाकुर यांच्या कल्याण लोकसभा दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर कल्याण लोकसभा जागेवर भाजप दावा करत असल्याच्या चर्चांना उधाण आले आहे. याबाबत बोलताना भाजपचे आमदार संजय केळकर यांनी मात्र सावध पवित्रा घेत भाजपने ज्या १८ जागा निवडल्या आहेत. त्या जागा पूर्ण बळकट करण्याचं […]
वर्धा : ‘अनिल देशमुख (Anil Deshmukh) प्रकरणात सत्तेचा गैरवापर करून करून बेकसुरावर कारवाई करण्यात आली आहे. अनिल देशमुख आणि त्यांच्या जवळच्या लोकांवर १३० धाडी टाकण्यात आल्या. त्यांना हेच सांगत होते की, तुम्ही पक्ष, नेतृत्व बदला पण अनिल देशमुख डगमगले नाहीत. यासाठी तुम्हाला सत्ता दिली का, पूर्ण पणे सत्तेचा वापर चुकीच्या पद्धतीने केला जात आहे. संधी […]
ठाणे : ठाण्यात (Thane) राष्ट्रवादी काँग्रेसला (NCP) मोठे खिंडार पडले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे ठाण्यातील जेष्ठ नेते आणि माजी नगरसेवक हणमंत जगदाळे (Hanmant Jagdale) यांनी राष्ट्रवादी काँग्रेसला सोडचिठ्ठी देत शिंदे गटात प्रवेश केलाय. त्यांच्यासोबत ठाणे मनपा प्रभाग क्रमांक सहा मधील सर्वच म्हणजे चारही माजी नगरसेवकांनी राष्ट्रवादीला सोडून शिंदे गटात प्रवेश केलाय. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) […]