पुणे: चिंचवड पोटनिवडणूक (Chinchwad by-election) बिनविरोध करण्याचा आमचा प्रयत्न आहे. यासाठी सगळ्या पक्षांच्या नेत्यांना भेटणार आहेत. याची जबाबदारी आमदार महेश लांडगे (Mahesh Landge) यांच्याकडे दिली आहे, अशी माहिती उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी दिली. निवडणूक होऊ नये झाली तर कशी लढवायची यासाठी आम्ही आजची बैठक बोलवली होती. भाजपमधून काही नेत्यांनी पोटनिवडणूक […]
मुंबई : महाविकास आघाडी सरकारच्या काळात मला अडकवण्याचा प्लॅन होता, असा आरोप देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांनी केल्याने महाराष्ट्रात खळबळ माजली. या दाव्याला अॅड. गुणरत्न सदावर्ते (Gunratna Sadavarte) यांनी दुजोरा दिला आहे. अॅड. गुणरत्न सदावर्ते यांनी मोठा दावा केला. एसटी कर्मचाऱ्यांनी केलेल्या आंदोलनामध्ये मी कर्मचाऱ्यांची बाजू मांडत होतो, त्यामुळे मला अडकवण्याचा प्रयत्न करण्यात आला. पोलिसांनी […]
मुंबई – न्यूझीलंड विरुद्धच्या तिसऱ्या सामन्यात भारतीय कर्णधार रोहित शर्माने अनेक दिवसांच्या कालावधी नंतर शतकीय खेळी करत अनेक विक्रमला गवसणी घातली आहे. रोहितने या सामन्यात 30 वे एकदिवसीय आंतरराष्ट्रीय शतक साजरे केले. असा कारनामा करणारा तो जगातील आणि भारतातील तिसरा फलंदाज ठरला आहे. त्याने ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार रिकी पॉंटिंगच्या शतकांची बरोबरी केली आहे. या अगोदर […]
नवी दिल्ली : माझी घरी ड्रामा क्वीन म्हणून ओळख आहे. मला छोटेसे जरी खरचटले किंवा लागले तरी मी खूप आरडाओरडा करायचे आणि सगळीकडे माहोल तयार करायचे. मात्र, माझ्या या ड्रामाचा मलाच खूप त्रास झाला असता… अन् माझ्या मुलाच्या जन्मावेळी वेळी मी घरातच प्रसूत झाले असते, अशी भावना राष्ट्रवादी काँग्रेसच्या बारामतीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी व्यक्त […]
मुंबई : देशभरात उद्या प्रजासत्ताक दिन (Republic Day) मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. मुंबईबरोबरच देशभरात प्रजासत्ताक दिनाची मोठी तयारी सुरु आहे. कोणताही अनुचित प्रकार घडू नये, म्हणून पोलिसांनी सर्व सावधगिरी बाळगली आहे. शिवाजी पार्कवर हवाई हल्ल्याचा कट असल्याचा इशारा गुप्तचर विभागाने दिल्याने खळबळ उडाली आहे. गुप्तचर विभागाच्या या इशाऱ्यानंतर मुंबई पोलीस (Mumbai Police) अलर्ट मोडवर […]
नवी मुंबई : बॉलिवूड क्वीन (Bollywood Queen) कंगना रणौत (Kangana Ranaut) नेहमीच वेगवेगळ्या कारणांनी चर्चेत असते. वादग्रस्त विधानाने तिने बॉलिवूडमधील अनेकांशी पंगा घेतला आहे. 2021 मध्ये आक्षेपार्ह ट्विटनंतर तिचे ट्विटर (Twitter) अकाउंट सस्पेंड झाले होते. सध्या ती ‘इमर्जन्सी’ चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. पण तिने चाहत्यांसाठी एक गुडन्यूज दिली आहे. तिचे बंद झालेले ट्वीटर अकाऊंट आता […]
औरंगाबाद : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या उपस्थितीत औरंगाबादच्या विभागीय कार्यालयात बैठक पार पडत आहे. मात्र याच बैठकीसाठी आलेल्या शिंदे गटाचे आमदार रमेश बोरनारे (Ramesh Bornare) यांची गाडी पोलिसांनी अडवल्याने आमदार बोरनारे यांनी पोलिसांशी हुज्जत घालण्यास सुरवात केली. त्यामुळे पोलीस (Police) आणि बोरनारे यांच्या शाब्दिक बाचाबाची पाहायला मिळाली. तर सर्व आमदारांच्या गाड्या सोडत असताना […]
नवी दिल्ली : मी आणि माझ्या वडिलांच्या विराेधातील जुन्या केसेस भाजप (BJP) पुन्हा सक्रिय करुन आम्हाला जेलमध्ये टाकतील. त्यामुळे आम्ही भाजप जाॅईन करताे, असे एकदा एका नेत्याने मला फाेन करुन सांगितले. तेव्हा त्यांना बाेलावले आणि चर्चा केली. मी त्यांना म्हटले की घाबरण्याचे काही कारण नाही, काहीही हाेणार नाही. मात्र, माझ्या भोळेपणाचा त्या नेत्याने फायदा घेतला. तसेच […]
अहमदनगर : साईबाबांच्या दर्शनासाठी (Saibaba Darshan) जनसंपर्क कार्यालयातून अतिमहत्त्वाच्या व्यक्तींना ‘व्हीआयपी पास’ (VIP pass) दिला जातो. पण गेल्या काही दिवसांपासून व्हीआयपी नावाखाली गोरखधंदा केला जात आहे. याचा बंदोबस्त करण्यासाठी शिर्डी देवस्थानाने (Shirdi Temple) कठोर पावले उचलली आहेत. आमदार, खासदार, विश्वस्तांचे बोगस पीए आणि एजंटांना साईमंदिर परिसरात ‘नो एण्ट्री’ करण्यात आलीय. देवस्थानाच्या निर्णयामुळे साईबाबांचे ‘व्हीआयपी दर्शन’ […]