नवी दिल्ली : रविवारी झालेल्या नेपाळ विमान अपघातात उत्तर प्रदेशातील गाझीपूर जिल्ह्यातील ४ तरुणांचा मृत्यू झाला आहे. चौघांचीही एकमेकांशी घट्ट मैत्री होती. नेपाळ विमान अपघातात बळी गेलेले सोनू जैस्वाल, अनिल राजभर, विशाल शर्मा आणि अभिषेक कुशवाह यांची लहानपणापासूनच घट्ट मैत्री होती. त्यांच्या गावांमधील अंतर फक्त तीन किमी आहे. जहूराबाद बाजारपेठेला लागून असल्याने या सर्वांची येथे अनेकदा […]
हैदराबाद: हैदराबादचे शेवटचे निजाम उस्मान अली खान यांचे नातू निजाम मीर बरकत अली खान सिद्दीकी मुकर्रम जाह यांचे तुर्कीमध्ये निधन झाले आहे. ते हैदराबादचे आठवे निजाम होते. वयाच्या ८९ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला आहे. काही दिवसांपासून आजारी असलेले राजकुमार मुकर्रम जाह यांचे शनिवारी रात्री 10.30 वाजता निधन झाले. इस्तंबूल येथील त्यांच्या कार्यालयाने याबाबत […]
बारामती : “तिसऱ्या मजल्यावरुन चौथ्या मजल्यावर जायला निघालो पण मध्येच वीज गेली अन् चौथ्या मजल्यावर पोहोचायच्या काही संकेद आधीच आमची लिफ्ट धाडकन खाली आदळली. परमेश्वराचे आणि तुम्हा सगळ्या लोकांचे आशीर्वाद म्हणून मी अपघातातून वाचलो नाहीतर आज श्रद्धांजली सभाच घ्यावी लागली असती,” असा जीवघेणा अनुभव विधानसभेतील विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी सांगितला. ते बारामतीत बोलत होते. […]
सांगली : राज्यात पदवीधर निवडणुकीची मोठ्या प्रमाणात चर्चा सुरु आहे. येत्या ३० जानेवारीला पदवीधर निवडणूका आहेत. याच दिवशी नगरविकास,विधी व न्याय,वैद्यकीय शिक्षण या विभागांच्या परिक्षा आहेत.यामुळे तब्बल १० हजारांहून अधिक ‘पदवीधर’ निवडणूकीच्या मतदानापासून वंचित राहतील. या मुद्द्याकडे भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी निवडणूक आयोगाचे लक्ष वेधले आहे. आमदार पडळकर यांनी निवडणूक आयोगाला यासंदर्भात पत्र लिहले […]
मुंबईः राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आंतरराष्ट्रीय पातळीवर महत्वाच्या समजल्या जाणाऱ्या दावोस येथील वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमसाठी रवाना झाले आहेत. या परिषदेदरम्यान मुख्यमंत्री जागतिक पातळीवरील विविध उद्योग तसेच आर्थिक समूहांच्या प्रमुखांशी चर्चा करणार असल्याचे सांगण्यात आले. “या आंतरराष्ट्रीय परिषदेच्या माध्यमातून महाराष्ट्रात जास्तीत जास्त परदेशी गुंतवणूक व्हावी, यासाठी संपूर्णपणे प्रयत्नशील राहीन.” अशा शब्दात ट्विट करून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे […]
अहमदनगर – शहरातील कोठला परिसरातील मंगळवार बाजारात 7 वाजताच्या सुमारास किरकोळ कारणावरून दोन गटात वाद झाले. या वादाचे रूपांतर दगडफेकीत झाले. यानंतर एका गटाकडून तुफान दगडफेक करण्यात आली. यात 2 युवक जखमी झाले आहेत तर 3 वाहनावर दगडफेक झाल्याने त्यांचे नुकसान झाले आहे. पोलिसांनी मोहसीन नावाच्या तरुणाला ताब्यात घेतले असून परिसरातील सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घेतले […]
तिरुअनंतपुरम – तिसऱ्या आणि शेवटच्या वनडेमध्ये भारताने श्रीलंकेचा 317 धावांनी पराभव करत तीन सामन्यांची मालिका 3-0 अशी जिंकली. वनडे इतिहासातील हा सर्वात मोठा विजय आहे. श्रीलंककेडून नुवानिदू फर्नांडोने सर्वाधिक 19 रन्स केल्या. कसून राजथाने 13 धावांचं योगदान दिलं. तर कर्णधार दासून शनाकाने 11 रन्स केल्या. तर 6 फलंदाजांना दुहेरी आकडाही गाठता आला नाही. गोलंदाजीत भारताकडून […]