महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषद अस्थायी समितीच्या मान्यतेने संस्कृती प्रतिष्ठान आयोजित ६५ वी मानाची कुस्ती स्पर्धा पुण्यात सुरू आहे.
मुंबई : आयपीएलचे माजी चेअरमन ललित मोदी यांना कोरोनाची बाधा झाली आहे. लंडनमधील एका रुग्णालयात त्यांना दाखल करण्यात आलं आहे. त्यांची प्रकृती खालावल्यामुळे ऑक्सिजन सपोर्टवर ठेवण्यात आलं आहे. स्वत: ललित मोदी यांच्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन फोटो शेअर करत माहिती दिली आहे. तसंच त्यांना पुढील उपचारासाठी लंडनला एअरलिफ्ट करण्यात आल्याचंही त्यांनी सांगितलं असून त्याचेही फोटो पोस्ट […]
दिल्ली : दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांनी त्यांच्या कार्यालयावर सीबीआयने छापा टाकल्याचा आरोप केला आहे. शनिवारी संध्याकाळी 4 वाजता त्यांनी ट्विट केले की, “आज पुन्हा सीबीआय माझ्या कार्यालयात पोहोचली आहे. त्यांचे स्वागत आहे. त्यांनी माझ्या घरावर छापा टाकला, माझ्या कार्यालयावर छापा टाकला, माझ्या लॉकरची झडती घेतली, माझ्या गावातही तपास केला. माझ्याविरुद्ध काहीही मिळाले नाही. ते […]
पुणे : पुणे आणि पिंपरी चिंचवड या दोन ठिकाणच्या निवडणुका निवडणूक आयोगाला जेव्हा वाटेल तेव्हा त्या लावल्या जातील. पण निवडणुकामध्ये उमेदवार द्यायचे कि नाही याबाबत त्या त्या वेळेची परिस्थिती बघून आम्ही योग्य निर्णय घेऊ, अशी भूमिका राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी घेतली आहे अजित पवार दोन दिवस पुणे-पिंपरी चिंचवड दौऱ्यावर आहेत. त्यावेळी ते माध्यमांशी […]
पुणे : प्राथमिक आणि द्वितीय संपर्क केंद्र डायल-112 या कार्यप्रणालीत आता व्हॉट्सअॅप, ट्विटर, फेसबुक, ईमेल इत्यादी माध्यमातून प्राप्त होणाऱ्या तक्रारींचाही समावेश करण्यात आला आहे. या एकत्रित प्रणालीचे लोकार्पण आज राज्याचे उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते पुणे येथे करण्यात आले. राज्यातील गुन्हे आणि कायदा-सुव्यवस्थेवरील वरिष्ठ पोलिस अधिकार्यांच्या परिषदेच्या प्रारंभी हे लोकार्पण त्यांनी केले. महाराष्ट्र […]
मुंबई : बॉलिवूडचा बादशाह शाहरुख खानचा ‘पठाण’ सिनेमा येत्या 25 जानेवारीला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. ‘पठाण’चा ट्रेलर नुकताच आऊट झाला आहे. किंग खान सध्या ‘पठाण’च्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. सिनेमाच्या प्रमोशनसाठी शाहरुखने ‘इंटरनॅशनल लीग टी 20’साठी दुबईच्या स्टेडियममध्ये हजेरी लावली आहे. आज या सिनेमाचा ट्रेलर बुर्ज खलिफावर झळकणार आहे. Brace yourselves for a visual spectacle – catch #PathaanTrailer […]
नवी दिल्ली : लोकसभा सचिवालयाने राष्ट्रवादी काँग्रेसच्या एका खासदाराचे सदस्तत्व रद्द केले आहे. यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसची लोकसभेतील सदस्य संख्या एकाने कमी झाली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यासाठी मोठा धक्का मानला जात आहे. यासंदर्भातील अधिसूचनाही काढली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार मोहम्मद फैजल यांना अपात्र ठरवले आहे. फैजल यांना न्यायालयाने हत्येचा प्रयत्न करण्याच्या प्रकरणात दोषी […]
मुंबई : नाशिक पदवीधर निवडणुकीत अपक्ष उमेदवार म्हणून सत्यजित तांबे यांनी फॉर्म भरल्यानंतर राजकीय वर्तुळात खळबळ उडली आहे. नाशिक पदवीधर निवडणुकीत एका पाठोपाठ एक ट्विस्ट समोर येत आहेत. अशातच अपक्ष उमेदवार शुभांगी पाटील यांनी मुंबई गाठली असून त्या महाविकास आघाडीच्या बैठकीला उपस्थित राहण्याची शक्यता आहे. नाशिक पदवीधर मतदार संघाच्या निवडणुकीतील अपक्ष उमेदवार शुभांगी पाटील या […]
नाशिक : स्वतःच्या पक्षाला धक्का देत अचानक सत्यजित तांबे यांनी अपक्ष फॉर्म भरून नाशिक पदवीधर निवडणूक चर्चेत आली आहे. नाशिक पदवीधरसाठी काँग्रेसने विद्यमान आमदार सुधीर तांबे यांना उमेदवारी जाहीर केली होती. पण अनपेक्षित घडामोड घडून सुधीर तांबे यांच्या ऐवजी सत्यजीत तांबे यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला. सत्यजीत तांबे यांच्या या धक्कातंत्रामुळे काँग्रेससह महाविकास आघाडीला […]
नवी दिल्लीः राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेत आज अत्यंत दुर्दैवी घटना घडली. यात्रेत चालताना काँग्रेसचे खासदार संतोखसिंह चौधरी यांना अचानक छातीत दुखू लागले.अस्वस्थ वाटू लागले. आजूबाजूच्या कार्यकर्त्यांनी त्यांना तत्काळ रुग्णालयात दाखल केलं. संतोखसिंह चौधरी यांना ह्द्यविकाराचा झटका आल्याचं निदान डॉक्टरांनी केलं. मात्र उपचारादरम्यान संतोखसिंह यांचा मृत्यू झाला. खासदार संतोखसिंह चौधरी भारत जोडो यात्रेत चालत होते. त्यावेळी चालत […]