नाशिक : स्वतःच्या पक्षाला धक्का देत अचानक सत्यजित तांबे यांनी अपक्ष फॉर्म भरून नाशिक पदवीधर निवडणूक चर्चेत आली आहे. नाशिक पदवीधरसाठी काँग्रेसने विद्यमान आमदार सुधीर तांबे यांना उमेदवारी जाहीर केली होती. पण अनपेक्षित घडामोड घडून सुधीर तांबे यांच्या ऐवजी सत्यजीत तांबे यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला. सत्यजीत तांबे यांच्या या धक्कातंत्रामुळे काँग्रेससह महाविकास आघाडीला […]
नवी दिल्लीः राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेत आज अत्यंत दुर्दैवी घटना घडली. यात्रेत चालताना काँग्रेसचे खासदार संतोखसिंह चौधरी यांना अचानक छातीत दुखू लागले.अस्वस्थ वाटू लागले. आजूबाजूच्या कार्यकर्त्यांनी त्यांना तत्काळ रुग्णालयात दाखल केलं. संतोखसिंह चौधरी यांना ह्द्यविकाराचा झटका आल्याचं निदान डॉक्टरांनी केलं. मात्र उपचारादरम्यान संतोखसिंह यांचा मृत्यू झाला. खासदार संतोखसिंह चौधरी भारत जोडो यात्रेत चालत होते. त्यावेळी चालत […]
कोल्हापूर : विशाळगडावरील अतिक्रमणे हटविण्याचा निर्णय झालेला असताना देखील स्थानिक आमदार पुन्हा एकदा परस्पर व गुपचूप प्रशासकीय बैठक लावून काय साध्य करू पाहत आहेत ? असा खडा सवाल विचारत आमदारांनी शे-पाचशे मतांसाठी विशाळगडच्या अस्तित्वावर घाव घालण्याचा प्रयत्न करू नये, असा इशारा छत्रपती संभाजीराजे यांनी आमदार विनय कोरे यांना दिला आहे. छत्रपती संभाजीराजे यांनी आपल्या सोशल […]
बीड : माजलगाव येथील भाजपा नेते मोहनराव जगताप यांचे पुतणे विश्वजीत जगताप यांचा रात्री बीड येथील गेवराईजवळ अपघात होऊन जागीच मृत्यू झाला आहे. हा भीषण अपघात शुक्रवारी रात्री बारा वाजेच्या दरम्यान घडला आहे. माजलगाव येथील छत्रपती नागरी सहकारी पतसंस्थेचे चेअरमन जीवनराव जगताप यांचे चिरंजीव विश्वजीत जगताप (वय २२) हे काही कामानिमित्त औरंगाबादला गेले होते. काम […]
आपला देश हा उत्सवप्रिय देश आहे. वर्षभरात अनेक सण-उत्सव आपल्याकडे साजरे केले जातात. पण नव्या वर्षात येणारा पहिला सण म्हणजे मकर संक्रांत. संपूर्ण महाराष्ट्रात मकर संक्रात हा सण उत्सवात साजरा केला जातो. परंतु, अनेकांना मकर संक्रात नेमकी का साजरी केली जाते? याबद्दल माहिती नसते. आजच्या दिवशी सूर्य मकर राशीतून दुसऱ्या राशीमध्ये दरवर्षी याच दिवशी प्रवेश […]
पुणे : महेंद्र गायकवाड, शुभम शिदनाळे, सिकंदर शेख, बालारफिक शेख यांनी आपापल्या प्रतीस्पर्ध्याना पराभूत करताना महाराष्ट्र केसरीच्या माती गटातून उपांत्य फेरीत प्रवेश केला. उपांत्य फेरीत सिकंदर शेख समोर बाला रफिक शेखचे तर महेंद्र गायकवाड समोर शुभम शिदनाळेचे आव्हान असणार आहे. माती विभागाच्या उपांत्यपूर्व फेरीत माजी ‘उपमहाराष्ट्र केसरी’ असणारा लातूरच्या शैलेश शेळकेला सोलापूरच्या महेंद्र गायकवाडने ५-२ […]
नांदेड : सत्यजीत तांबे यांनी पक्षाशी बंडखोरी करत उमेदवारी दाखल करणं गंभीर असल्याचे मत माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे नेते अशोक चव्हाण यांनी यावेळी व्यक्त केले आहे. जर मुलाची इच्छा होती, तर त्याच्या नावेही उमेदवारी दाखल करता आली असती. पण उमेदवारी अर्ज दाखल न करता मुलाने उमेदवारी दाखल करणं ही गंभीर विषय असल्याचे मत अशोक चव्हाणंनी […]
मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आनंद परांजपेंना हायकोर्टानं दिलासा दिला आहे. राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याविरोधात अपशब्द वापरल्याप्रकरणी दाखल गुन्ह्यांत तूर्तास अटक करणार नाही, अशी ग्वाही राज्य सरकारनं हायकोर्टात दिली आहे. कल्याण डोंबिवली परिसरातील चार विविध पोलीस ठाण्यात यासंदर्भात दाखल गुन्हे एकत्र करून ते रद्द करण्यासाठी आनंद परांजपे यांनी हायकोर्टात याचिका दाखल करण्यात आली होती. […]