नागपूर : कोराडी ते तिडंगीदरम्यान अतिउच्च दाबवाहिनीचे काम करणाऱ्या महापारेषणच्या साहाय्यक अभियंत्यासह कर्मचाऱ्याला मारहाण केल्या प्रकरणात सावनेरचे आमदार व माजी मंत्री सुनील केदार यांना जिल्हा न्यायालयाने एक वर्षाची शिक्षा सुनावली. 2017 मध्ये महापारेषणच्या साहाय्यक अभियंत्यासह कर्मचाऱ्याला मारहाण केल्याप्रकरणी सुनील केदार यांना दोषी ठरवण्यात आले आहे. नागपूर जिल्हा सत्र न्यायालयानं आज हा निर्णय दिला आहे. नागपूर […]
मुंबई : ज्येष्ठ लेखक आणि मराठी विश्वकोश मंडळाचे अध्यक्ष राजा दीक्षित यांनी आपल्या पदाचा तडकाफडकी राजीनामा दिला आहे. राजीनाम्यानंतर त्यांची मराठी भाषा, शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी भेट घेतली. दीक्षित यांनी राजीनामा देताना भाषा आणि वित्त विभागाच्या कारभारावर टीका केली आहे. करमणूकप्रधान, उत्सवी पद्धतीच्या उपक्रमांवर उधळपट्टी कशासाठी? अशी विचारणा दीक्षित यांनी केली आहे. भाषा […]
नवी दिल्ली : संसदेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन ३१ जानेवारीपासून सुरू होणार असून ६ एप्रिलपर्यंत चालणार आहे. यादरम्यान 66 दिवसांत 27 बैठका होणार आहेत, अशी माहिती केंद्रीय संसदीय कामकाज मंत्री प्रल्हाद जोशी यांनी दिली. दरम्यान, 14 फेब्रुवारी ते 12 मार्चपर्यंत सुट्टी असणारा आहे. प्रल्हाद जोशी म्हणाले, संसदेचे हिवाळी अधिवेशन 7 डिसेंबर 2022 ते 29 डिसेंबर 2022 या […]
पुणे : एमपीएससीने परीक्षा अभ्यासक्रम पद्धतीमध्ये केलेल्या बदलाच्या विरोधात पुण्यातील अलका टॉकीज चौकात एमपीएसी विद्यार्थ्यांनी आंदोलन सुरू केले आहे. विद्यार्थी आक्रमक झाले असून आज (ता.13 जानेवारी) सकाळपासूनच चौकात ठाण म्हणून बसले आहेत. आयोगाकडून परीक्षा अभ्यासक्रम पद्धतीमध्ये करण्यात आलेला बदल हा 2025 पासून लागू करावा, अशी मागणी विद्यार्थ्यांनी केली आहे. दरम्यान, या पार्श्वभूमीवर चौकात पोलीस बंदोबस्त […]
नवी दिल्ली : माजी केंद्रीय मंत्री आणि राष्ट्रीय जनता दलाचे (आरजेडी) ज्येष्ठ नेते शरद यादव यांचे आज निधन झाले. ७५ वर्षीय शरद यादव यांना गुडगावमधील फोर्टिस रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. शरद यादव यांची मुलगी सुभाषिनी यांनी शरद यादव यांच्या निधनाची सोशल मीडियावरून दिली. सुभाषिनी यादव यांनी ट्विटरवर लिहिले की, “पापा राहिले नाहीत.” त्यानंतर फोर्टिस […]
सांगली : “कितीही वादळं आली. कितीही संकटं आली तरी देशमुख वाडा आहे तिथेच राहणार’ असं म्हणत काँग्रेस नेते अमित देशमुख यांनी भाजपमध्ये जाण्याच्या चर्चेला पूर्णविराम दिला आहे. गेल्या काही दिवसांपासून लातूरमधील देशमुख बंधू भाजपात जाणार अशी चर्चा सुरु आहे. यावर स्वतः अमित देशमुख यांनी आज सांगलीतील विटामधील एका कार्यक्रमात स्पष्टीकरण दिलं आहे. भाजपनेते आमदार संभाजी […]
दिल्ली : भारत सरकारच्या माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने खोट्या बातम्या पसरवणाऱ्या सहा यूट्यूब चॅनेलवर कारवाई केली आहे. या सहा चॅनेलचे 20 लाखापेक्षा जास्त सबस्क्राईबर होते. याशिवाय या चॅनलच्या व्हिडिओंना 50 कोटींहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत. या वाहिन्यांची नावे आहेत- नेशन टीव्ही, सरोकार भारत, नेशन 24, संवाद समाचार, स्वर्णिम भारत, संवाद टीव्ही. Total around 111 videos, […]
पुणे : तुम्ही जर विंडोजचे युजर्स असाल तर तुमच्यासाठी ही बातमी आहे. विंडोज७ आणि विंडोज ८ ही दोन व्हर्जन आता तुम्हाला तुमच्या लॅपटॉप किंवा कंम्प्युटरमध्ये वापरता येणार नाहीत. विंडोजकडून या संबंधीत सविस्तर सुचना देण्यात आल्या असुन आता विंडोज७ किंवा विंडोज ८ ऐवजी तुम्ही विंडोजचं कुठल व्हर्जन वापरायचं या बाबत माहिती देण्यात आली आहे. १० जानेवारीपासून […]
“आम्ही सध्या भाजपसोबत युती करणार नाहीत. भाजपसोबत असलेल्या पक्षालाही पाठिंबा देखील देणार नाहीत. मात्र शिंदे गटाने जर भाजपसोबत युती तोडली तर त्यांना पाठिंबा देण्याचा विचार करू” असं म्हणत वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी शिंदे गटासोबत युतीच्या चर्चेला विराम दिला आहे. मागच्या काही दिवसापासून प्रकाश आंबेडकर नककी कोणाशी युती करणार याच्या चर्चा रंगल्या होत्या. […]