छत्रपती संभाजीनगर : औरंगाबादच्या नामांतराच्या विरोधात छत्रपती संभाजीनगर (Chhatrapati Sambhajinagar ) जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आजपासून साखळी उपोषणाला सुरुवात झाली. मात्र यावेळी या उपोषणास्थळी चक्क औरंगजेबाचे होर्डिंग (Aurangzeb Hoarding) झळकवण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला. उपोषण सुरू असतानाच काही तरुण हातात औरंगजेबाचे होर्डिंग घेऊन उपोषणास्थळी दाखल झाले होते. ‘जिंदाबाद जिंदाबाद, औरंगाबाद जिंदाबाद’ अशा घोषणा यावेळी देण्यात आल्या […]
अहमदनगर : ओढून-ताणून आलेलं शिंदे-फडणवीस सरकार राज्याच्या जनतेला अजिबात रुचलेलं नाही. त्यामुळं जनतेच्या मनात माेठा राेष निर्माण झाला आहे. स्थानिक स्वराज्य संस्थेच्या (Sthanik Swarajya Sanstha) निवडणुका सातत्याने पुढे ढकलण्याचा प्रयत्न सरकार करीत आहे. मुळातच आगामी काेणत्याही निवडणुका घेण्यासाठी सरकारची घाबरगुंडी उडाली असल्याची घणाघाती टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) यांनी केली. आगामी काळात […]
भाजपचे ( BJP ) ज्येष्ठ नेते व राज्याचे महसुल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील ( Radhakrishna Vikhe Patil ) यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे ( NCP ) अध्यक्ष शरद पवार ( Sharad Pawar ) यांना टोला लगावला आहे. पोपटवाल्या भविष्यकारांची उपासमार करु नका, अशा शब्दात त्यांनी शरद पवारांना खोचक टोला लगावला आहे. पवारांनी देशात बदलाचे वारे वाहायला लागले […]
पुणे : पुणे महापालिका (Municipal Corporation) हद्दीत भटक्या कुत्र्यांचा उपद्रव वाढत चालला आहे. २९ डिसेंबर २०१७ मध्ये चंदननगर भागामध्ये एका दीड वर्षाच्या मुलावर भटक्या कुत्र्यांनी हल्ला केला होता. यामध्ये त्याच्या डोळ्याला गंभीर इजा झाली होती. तसेच १० फेब्रुवारी २०२३ मध्ये ब्रम्हा सनसिटी या सोसायटीमध्ये चार- पाच कुत्र्यांनी एका लहान मुलावर हल्ला केला होता. पुणे शहरात […]
ग्वाल्हेर : यशस्वी जैस्वालने इराणी चषकातील पदार्पणाच्या सामन्यात इतिहास रचला आहे. ग्वाल्हेरमध्ये मध्य प्रदेशविरुद्ध पहिला सामना खेळणाऱ्या यशस्वीने दुसऱ्या डावातही शतक झळकावले. त्याच सामन्यातील पहिल्या डावात त्याने 213 धावा केल्या होत्या. त्याचबरोबर दुसऱ्या डावातही शतक झळकावण्यात तो यशस्वी ठरला. इराणी चषकाच्या एका सामन्यात द्विशतक आणि शतक झळकावणारा तो पहिला भारतीय खेळाडू ठरला आहे. उर्वरित भारताचे […]
मुंबई : तुनिषा शर्मा हत्याकांड प्रकरणातील (Tunisha Sharma Suicide Case) आरोपी शीझान खानला (sheezan khan ) 1 लाखांच्या जातमुचलक्यावर जामीन मंजूर करण्यात आला. वसई कोर्टाकडून (Vasai Court) हा जामीन मंजूर करण्यात आला. त्याचा पासपोर्ट जमा करण्याचे कोर्टाचे निर्देश आहेत. दरम्यान तुनिषा आणि शिझान एकाच मालिकेत काम करत होते. दोघांचे प्रेमसंबंध होते. तुनिषाने मालिकेच्या सेटवर शिझानच्याच […]
मुंबई : शिवसेनेच्या ( Shivsena ) शिंदे गटाचे मंत्री शंभूराजे देसाई ( Shambhuraje Desai ) यांनी ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत ( Sanjay Raut ) यांच्यावर जोरदार निशाणा साधला आहे. राऊत यांच्या डोक्यावर परिणाम झाला असल्याचे ते बोलले आहेत. संजय राऊत हे सध्या पश्चिम महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आहेत. त्यांनी कोल्हापूर व सांगली येथील सभेत शिंदे गटावर […]
अमरावती : उद्धव ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांची आमदार रवी राणा यांच्या अमरावती जिल्ह्यातील बडेनरा मतदारसंघात सभा आयोजित करण्यात आली होती. खासदार नवनीत राणा ह्या नेहमी उद्धव ठाकरे यांच्यावर टीका करतात. याचा समाचार घेत सुषमा अंधारे यांनी नवनीत राणांची खिल्ली उडवत त्यांना इशारा दिला. सुषमा अंधारेंनी नवनीत राणा यांचा अक्का असा उल्लेख केला. ईडी, […]
“माझे सासरे सदूराव शिंदे भारतीय संघातील खेळाडू. ते गुगली बॉलर होते. त्यामुळे माझ्या लग्नात अनेक क्रिकेटपटू आले होते. त्यानंतर या सर्व खेळाडूंशी जवळीक निर्माण झाली. मग मी गरवारे क्लबचा अध्यक्ष झालो.” अशी आठवण शरद पवार यांनी आज बारामतीमध्ये बोलताना सांगितली. बारामतीमधील विद्या प्रतिष्ठानच्या तारांगण युवा महोत्सवात महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी जेष्ठ नेते शरद पवार यांची मुलाखत घेतली. […]