- Letsupp »
- Author
- Ninad K
Ninad K
-
तामिळनाडूत BJP ला मोठा धक्का, गंभीर आरोप करत दिग्गज अभिनेत्रीचा रामराम
नवी दिल्ली : एकीकडे आगामी लोकसभेत दक्षिण भारतात विजयाची स्वप्न पाहणाऱ्या भाजपला निवडणुकांपूर्वीच मोठा धक्का बसला आहे. गेल्या 25 वर्षांपासून भाजपसोबत असलेल्या तमिळनाडूतील दिग्गज अभिनेत्री गौतमी तडीमल्ला (Gautami Tadimalla) यांनी भाजपवर गंभीर आरोप करत पक्षाला रामराम केला आहे. एकापत्राद्वारे त्यांनी आपण राजीनामा देत असल्याचे सांगितले आहे. ज्या व्यक्तीने आपली फसवणूक केली आहे त्याला पक्षाच्या एका […]
-
Video : ‘आय विश’ म्हणत राज्यातील ड्रग्ज कारवाईत समीर वानखेडेंची एन्ट्री; फडणवीसांवरही केले भाष्य
मुंबई : राज्यात सध्या ललित पाटीलमुळे (Lalit Patil) ड्रग्ज तस्करीचा मुद्दा चांगलाच गाजत असून, आता यात मध्यंतरीच्या काळात शाहरूख खानाच्या (Shahrukh Khan) मुलावर कारवाई केलेल्या समीर वानखेडेंची (Sameer Wankhede) एन्ट्री झाली आहे. सध्या सुरू असलेल्या कारवाईबाबत त्यांनी भाष्य करत मत व्यक्त केले आहे. या सर्व प्रकरणात काही राजकारण्यांची नावे समोर येत असल्याचे आपल्या वाचनात आल्याचे […]
-
शिरूरच्या लोकसभेवरून महायुतीत मिठाचा खडा?; वळसे पाटलांनी दावा ठोकल्याने संघर्ष वाढणार
पुणे : राज्याचे विद्यमान उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी आपल्या सोबत राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार घेऊन राज्याच्या सत्तेत वाटा तर मिळवला. मात्र, आगामी लोकसभा निवडणुकीच्या जागा वाटपावरून महायुतीमध्ये खटके उडण्याची चिन्ह दिसत आहेत. त्यास कारण शिरूर लोकसभेची (Shirur Loksabha Seat) जागा ठरताना दिसत असून, सीटिंग सीट ज्यांची आहे त्यांना त्या जागा सोडल्या जातील असं ठरल्याचे […]
-
जरांगेंनी फोडला भुजबळांचा हुकमी एक्का; गोळाबेरीज करताना होणार दमछाक
नाशिक : एकीकडे मराठा आरक्षाणाच्या (Maratha Reservation) मागणीसाठी मनोज जरांगे पाटलांनी (Manoj Jarange Patil) रान पेटवलं असून, हे आरक्षण कसं देता येईल किंवा यातून काय मार्ग काढता येईल यावर सत्ताधारी कोंडीत सापडलेले असतानाच आता जरांगे पाटलांनी सत्ताधारी पक्षात असलेलेम मंत्री छगन भुजबळ (Chagan Bhujbal) यांचा हुकमी एक्का फोडला आहे. मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक […]
-
कंत्राटी भरती GR बाबत वडेट्टीवारांचा सत्ताधाऱ्यांना घाम फोडणारा दावा; अजितदादाही टार्गेट
मुंबई : कंत्राटी भरतीचा जीआर रद्द करत काल (दि.20) राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavsi) यांनी उद्धव ठाकरेंसह (Uddhav Thackeray) शरद पवारांवर जोरदार हल्लाबोल केला होता. त्यानंतर आता विरोधीपक्ष नेते विजय वडेट्टीवार (Vijay Wadettiwar) यांनी सत्ताधाऱ्यांना घाम फोडणारा दावा केला आहे. त्यामुळे येत्या काळात कंत्राटी भरतीवरून विरोधक आणि सत्ताधाऱ्यांमध्ये जोरदार जुंपण्याची शक्यता आहे. यावेळी वडेट्टीवारांनी […]
-
शाई फेक झाली की शर्ट बदलतो अन् तिसऱ्या मिनिटाला कामाला लागतो : चंद्रकांतदादा पाटील
अमरावती : माझ्या बॅगेत नेहमी आठ शर्ट असतात, एकावर शाई फेकली की दुसरा शर्ट घालतो आणि तिसऱ्या मिनिटाला कामाला लागतो असे विधान राज्याचे उच्च व तंत्र शिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी केले आहे. ते अमरावती येथे पत्रकारांशी बोलत होते. काही दिवसांपूर्वी सोलापूरमध्ये आणि त्याआधी पुण्यातील एका कार्यक्रमादरम्यान चंद्रकांत पाटील यांच्यावर शाईफेकीच्या घटना घडल्या होत्या. […]
-
धर्मशालात दुखापतग्रस्त हार्दिक पांड्या खेळणार?; BCCI ने दिली मोठी अपडेट
Hardik Pandya Health Update : विश्वचषक सामन्यात काल (दि. 19) पुण्यात झालेल्या बांग्लादेशविरूद्धच्या सामन्यात दुखापतग्रस्त झालेल्या हार्दिक पांड्याच्या हेल्थबाबत बीसीसीआयने मोठी अपडेट दिली आहे. काल प्राथमिक उपारानंतर हार्दिकला पुण्याहून बंगळुरू येथे हलवण्यात आले असून, त्याच्यावर इंग्लंडचे तज्ज्ञ डॉक्टर उपचार करणार असल्याचे सांगितले जात आहे. मात्र, येत्या रविवारी (दि. 22) धर्मशाला येथे होणाऱ्या न्यूझीलंडविरूद्धच्या सामन्यात पांड्या […]
-
ललित पाटील प्रकरणात उद्धव ठाकरे आरोपीच्या पिंजऱ्यात; फडणवीसांकडून धक्कादायक खुलासे
मुंबई : पुण्यातील ससून रूग्णालायतून पळ काढलेल्या ड्रग्ज तस्कर ललित पाटीलच्या (Lalit Patil) मुसक्या आवळल्यानंतर अनेकांच्या पायाखालची जमीन सरकली असतानाच राज्याचे उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांनी (Devendra Fadnavis) अनेक प्रश्न उपस्थित करत राज्याचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना आरोपीच्या पिंजऱ्यात उभे केले आहे. या प्रकरणात अजून खूप खोलात जायचे असल्याचे सांगत त्यांनी ललित पाटीलबाबत ठाकरे गटाला […]
-
Video : बारामतीमध्येच अजित पवार सापडावा, फक्त मला ‘काका’ म्हणू नको; राज ठाकरेंची टोलेबाजी
पुणे : अजित पवारांना (Ajit Pawar) रामराम ठोकत राष्ट्रवादीत उभी फूट पाडत अजित पवारांनी शिंदे-फडणवीसांसोबत हातमिळवणी केली. त्यानंतर त्यांच्यावर विरोधी पक्षातील विविध नेत्यांनी टिकेची झोड उठवली. मात्र, याकडे अजितदादांनी कधी उत्तर दिली तर, कधी कानाडोळा केला. पण, आता मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी (Raj Thackeray) अजित पवारांना उद्देशून मला कधी काका म्हणू नको असं सल्ला देत […]
-
भारतीय गोलंदाजांची चांगली कामगिरी; विजयासाठी बांग्ला टायगर्सने भारताला दिलं 257 धावांचंं टार्गेट
पुणे : पुण्यातील एमसीए मैदानावर प्रथम फलंदाजी करण्यासाठी उतरलेल्या बांग्लादेशच्या फलंदाजांनी कडवी झूंज देत भारतासमोर विजयासाठी 257 धावांचा डोंगर उभा केला आहे. सामन्याच्या शेवटच्या षटकामध्ये बांग्लादेशच्या फलंदाजांना बुमराहाच्या भेदक गोलंदाजीमुळे जोरदार फटकेबाजी करता आली नाही. बुमराहने 10 षटकात 41 धावा देत 2 बळी घेतले. तर, सिराज आणि जडेजानेही प्रत्येकी दोन विकेट घेतल्या. बांग्लादेशने 50 षटकात […]









