Maya operating system : सायबर सुरक्षेच्या विरोधात संरक्षण मंत्रालयाने मोठे पाऊल उचलले आहे. आता Maya OS नावाची स्वदेशी विकसित ऑपरेटिंग सिस्टिम संगणकांत इंस्टॉल केली जाणार आहे. या वर्षअखेरीस ही सिस्टिम अस्तित्वात येणार आहे. ही नवीन ओएस मायक्रोसॉफ्टच्या विंडोजची जागा घेईल. सरकाराचे या सिस्टिमद्वारे सायबर हल्ल्यांपासून संगणकांचे संरक्षण करण्याचे उद्दिष्ट आहे. ही नवीन ओएस लवकरच सशस्त्र […]
India Vs Pakistan Hockey Match ; आशियाई चॅम्पियन्स ट्रॉफी 2023 च्या शेवटच्या साखळी सामन्यात भारतीय संघाने पाकिस्तानचा 4-0 असा पराभव केला. भारतासाठी हरमनप्रीतने सामन्यात दोन गोल केले. एक गोल जुगवीर सिंगने तर एक गोल आकाशदीपने केला. उपांत्य फेरीत भारताचा सामना जपानशी होणार आहे. त्याचबरोबर या पराभवाने पाकिस्तानचे उपांत्य फेरीत खेळण्याचे स्वप्नही भंगले आहे. भारतीय हॉकी […]
Digital Data Protection Bill : राज्यसभेने ‘डिजिटल पर्सनल डेटा प्रोटेक्शन बिल 2023’ मणिपूरच्या मुद्द्यावर विरोधी सदस्यांनी सभात्याग केल्यानंतर आवाजी मतदानाने मंजूर केले. लोकसभेनेही सोमवारी (7 ऑगस्ट) हे विधेयक मंजूर केले आहे. सर्वोच्च न्यायालयाने ‘गोपनीयतेचा अधिकार’ हा मूलभूत अधिकार म्हणून घोषित केल्यानंतर सहा वर्षांनी हे विधेयक आले आहे. डिजिटल पर्सनल डेटा प्रोटेक्शन बिल 2023 मध्ये ऑनलाइन […]
Hari Narake Passed Away : ज्येष्ठ सामाजिक लेखक प्रा. हरी नरके यांचे आज सकाळी निधन झाले होते. त्यांच्या निधनानंतर लेखक संजय सोनावणी यांनी धक्कादायक खुलासे केले होते. यानंतर त्यांच्या मृत्यूची चौकशी झाली पाहिजे अशी अनेकांकडून करण्यात आली आहे. यावर कॅबिनेट मंत्री छगन भुजबळ यांनी देखील संशय व्यक्त केला आहे. 20 दिवसात 20 किलो वजन कसं […]
Prithvi Shaw : भारताचा युवा फलंदाज पृथ्वी शॉने इंग्लंडच्या नॉर्थहॅम्प्टनमधील काउंटी ग्राउंडवर शानदार द्विशतक ठोकले आहे. नॉर्थम्प्टनशायरसाठी तिसऱ्या सामन्यात सलामी येताना पृथ्वी शॉने 81 चेंडूंमध्ये (14 चौकार, 2 षटकार) शतक झळकावले. पृथ्वी शॉने 129 व्या चेंडूवर द्विशतक पूर्ण केले. त्याने आपल्या द्विशतकात 24 चौकार आणि 8 षटकार ठोकले. पृथ्वी शॉने लिस्ट ए क्रिकेटमध्येही विक्रमांचा पाऊस […]
Manipur Violence: मणिपूरमधील परिस्थितीजन्य वांशिक हिंसाचार आहे. याला राजकीय मुद्दा बनवू नका. मणिपूरची स्थिती जाणून घेण्यासाठी देशाच्या पंतप्रधानांनी मला पहाटे 4 वाजता फोन केला आणि दुसऱ्या दिवशी सकाळी 6.30 वाजता झोपेतून उठवलं. विरोधक म्हणतात की मोदीचं मणिपूरडे लक्ष नाही. तीन दिवस आम्ही इथून सतत काम केले. 16 व्हिडिओ कॉन्फरन्स केल्या, 36,000 जवान पाठवले. मुख्य सचिव […]
Pakistan Interim PM: पाकिस्तानचे पंतप्रधान शहबाज शरीफ आज राष्ट्रपती आरिफ अल्वी यांना नॅशनल असेंब्ली विसर्जित करण्याची औपचारिक शिफारस करणार आहेत. संसदेच्या कनिष्ठ सभागृहाचा पाच वर्षांचा कार्यकाळ 12 ऑगस्ट रोजी संपत आहे. एआयवाय न्यूज, डेली पाकिस्तान आणि पाकिस्तान ऑब्झर्व्हरच्या वृत्तानुसार, शेहबाज शरीफ यांच्या राजीनाम्यानंतर जलील अब्बास जिलानी काळजीवाहू पंतप्रधान होऊ शकतात. जलील अब्बास जिलानी हे पंतप्रधान […]
Amit Shah on Rahul Gandhi : नरेंद्र मोदींनी 2014 पासून 2023 पर्यंतच्या 9 वर्षात नव्या राजकीय युगाची सुरुवात केली. गेल्या तीस वर्षात देशाचे राजकारण भ्रष्टाचार, घराणेशाही आणि तुष्टीकरणाने नासावले होते. अशा राजकारणाला कंटाळलेल्या जनतेने मोदींना जनादेश दिला. भारताच्या लोकशाहीला या तीन भस्मासूरांनी घेरलं होतं. नरेंद्र मोदींनी भ्रष्टाचार, घराणेशाही आणि तुष्टीकरण संपवून गुणवत्तेला प्राधान्य दिले आहे, […]
Gmail Translation Feature: Google ची ईमेल सेवा Gmail ही जगभरात सर्वाधिक वापरली जाणारी ईमेल सेवा आहे. आता Google ने Gmail अॅपमध्ये एक नवीन फीचर जारी केले आहे. याद्वारे यूजर्स संपूर्ण ईमेलचे भाषांतर करू शकणार आहेत. याआधी हे फीचर फक्त वेब व्हर्जनवर उपलब्ध होते. पण आता कंपनीने Gmail च्या Android आणि iOS अॅप्सवरही हे फीचर आणण्यास […]
Nagpur news : नागपूरमध्ये विदर्भवाद्यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या घरासमोर आंदोलन पुकारले आहे. संविधान चौकापासून फडणवीसांच्या घरापर्यंत हा लॉग मार्च काढण्यात आला आहे. लॉग मार्चमुळे विदर्भवाद्यांची संविधान चौकात मोठी गर्दी पाहायला मिळते आहे. वेगळ्या विदर्भासह अनेक मागण्या या मोर्चामधून करण्यात येत आहेत. वेगळ्या विदर्भासाठी मोर्चेकरी आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले. पोलिसांनी फडणवीसांच्या घरासमोर बॅरिकेट लावले आहेत. […]