पुणे : राज्यात H3N2 चं संकट वाढतंय. शुक्रवारपर्यंत राज्यात 170 रुग्ण आढळून आले आहेत. पुणे (Pune), छत्रपती संभाजीनगरमध्ये (Chhatrapati Sambhajinagar) सर्वाधीक फैलाव झाला आहे. सर्दी, ताप, खोकला किंवा कोरोनासंबंधी (Corona) कोणतेही लक्षणं जाणवत असेल तर अजिबात दुर्लक्ष करु नका. कारण देशासह महाराष्ट्रात H3N2 चं संकट वाढतंय. या व्हायरसमुळे देशात तीन मृत्यू झाले आहेत तर महाराष्ट्राच्याही […]
अहमदनगर : मी शांत आहे तोपर्यंत ठीक आहे, मात्र ठरवलं त्यांचा कार्यक्रम करत असतो, हा माझा स्वभाव आहे. परंतु आता थांबायचं नाही. शेवगावात येऊन भांडणे लावायची,जनतेला भावनात्मक करून,जातीयवाद करून मते मिळवायची. आपली राजकीय पोळी भाजून घ्यायची हा विद्यमान लोकप्रतिनिधी (Monica Rajle) यांचा धंदा असून विद्यमान लोकप्रतिनिधींचा आगामी विधानसभा निवडणुकीत पराभव करायचा हे एकमेव ध्येय समोर […]
मुंबई : दापोलीतील साई रिसॉर्टप्रकरणी (Sai Resort case) तत्कालीन उपजिल्हाधिकारी जयराम देशपांडे (Jairam Deshpande) यांना ईडीने अटक केली आहे. त्यांच्यावर बेकायदेशीर परवाना दिल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे. या संदर्भात भाजप नेते किरीट सोमय्या (Kirit Somayya) यांनी ट्विट करत जयराम देशपांडे यांनी अनिल परब, सदानंद कदम यांच्या संगनमताने फसवी परवानगी दिल्याचे म्हटले आहे. याआधी ठाकरे गटाचे […]
पुणे : नुकत्याच पार पडलेल्या कसबा पेठ विधानसभा पोटनिवडणुकीत (Kasba byelection) भाजपचा दारुण पराभव झाल्याने पुणे भाजपातील (BJP) नेतृत्व बदलाची कुजबूज सुरू झाली आहे.महाविकास आघाडीचे उमेदवार रवींद्र धंगेकर (Ravindra Dhangekar) यांनी भाजपच्या बालेकिल्याला सुरुंग लावत भाजपचे उमेदवार हेमंत रासने (Hemant Rasane) यांचा 11 हजार 40 मताधिक्याने दणदणीत पराभव केला आहे. यामुळे कसब्यातील पराभवाला जबाबदार कोण […]
मुंबई : जुनी पेन्शन लागू (Old Pension Scheme) करण्यासंदर्भात विधान परिषदेत चांगलीच खडाजंगी झाली. त्यामुळे विधानपरिषदेच कामकाज दिवसभरासाठी तहकूब करण्यात आले. जुनी पेन्शन लागू केल्याने सरकारी तिजोरीवर (Government Employees) नेमका किती बोजा पडतोय हे सरकार सांगू शकलेले नाही. सचिव किंवा आयएएस दर्जाचे अधिकारी चुकीची आकडेवारी देऊन सरकारची दिशाभूल करतात, अशी प्रतिक्रिया आमदार सत्यजित तांबे (satyajeet […]
नवी दिल्ली : संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा (Parliamentary Budget Session) दुसरा टप्पा सुरू असून आज पुन्हा राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी माफी मागावी या मागणीवरून दोन्ही सभागृहात गदारोळ झाला. लंडनमध्ये भारताची प्रतिमा डागाळल्याबद्दल भाजप नेत्यांनी राहुल गांधींनी माफी मागावी, अशी मागणी करत असताना काँग्रेसने अदानी (Adani Group) मुद्द्यावरून सरकारला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला. भाजप नेत्यांनी राहुल […]
मुंबई : मालाड पूर्व (Malad East) भागातील आनंद नगर (Anand Nagar) परिसरात झोपडपट्टीत भीषण आग लागली आहे. आगीनंतर धुराचे लोट उठत आहेत. मिळालेल्या माहितीनुसार ही आग लेव्हल 3 ची आहे. यात एकाचा मृत्यू आहे 15 ते 20 सिलेंडरचे स्फोट झाले आहेत. आगीची माहिती मिळताच अग्निशमन दल घटनास्थळी पोहोचून त्यावर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न करत आहे. आतापर्यंत […]
नवी दिल्ली : केंद्रीय आरोग्य मंत्रालयाला तामिळनाडू, केरळ, आसाम, कर्नाटक आणि अंदमान आणि निकोबार बेटांमधील रेडक्रॉस (Red Cross) सोसायटीच्या प्रादेशिक शाखांमध्ये कथित भ्रष्टाचाराच्या तक्रारी प्राप्त झाल्या होत्या. तामिळनाडूतील एका अधिकाऱ्यांनी सांगितले की, राज्य शाखेच्या कामकाजातील गंभीर आरोप राज्यपालांच्या निदर्शनास आणून दिले आहेत. रेडक्रॉसच्या (Red Cross Society) पाच शाखांमध्ये भ्रष्टाचार आणि आर्थिक अनियमिततेच्या तक्रारींवरून रेड क्रॉस […]
अहमदनगर : कर्जत (Karjat) तालुक्यातील कोपर्डी (Kopardi) येथे शेतातील बोअरवेलमध्ये ऊसतोड कामगाराचा पाच वर्षांचा मुलगा पडला. त्याला वाचवण्यासाठी प्रशानाकडून बचावकार्य युद्धपातळीवर सुरु आहे. आज सायंकाळी ही घटना घडली. या परिस्थितीवर तालुका प्रशासन लक्ष ठेवून आहे.कोपर्डी (ता.कर्जत) येथील संदीप ज्ञानदेव सुद्रीक यांच्या उसाच्या शेतात ऊसतोड करणाऱ्या कामगारांचा पाच वर्षाचा मुलगा सागर बुधा बरेला (रा.चिडियापूर, मध्यप्रदेश) हा आज सायंकाळी […]
मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी उद्धव ठाकरे यांना आणखी एक मोठा दिला आहे. ठाकरे गटाचे ज्येष्ठ नेते आणि उद्धव ठाकरे यांचे विश्वासू सुभाष देसाई (Subhash Desai) यांचा मुलगा भूषण देसाई (Bhushan Desai) यांनी शिंदेच्या शिवसेनेत प्रवेश केला आहे. आज बाळासाहेब भवन येथे हा पक्ष प्रवेश संपन्न झाला. उद्धव ठाकरे यांचे निकटवर्ती सुभाष […]