Mumbai News : मुंबईतील एका प्रसिद्ध रेस्टॉरंटमध्ये (Mumbai News) धक्कादायक घटना घडली आहे. ऑनलाईन ऑर्डर केलेल्या जेवणामध्ये (Mumbai Restaurant) चक्क उंदीर निघाल्याचा दावा पीडित व्यक्तीने केला आहे. यानंतर त्या व्यक्तीला 75 तास रुग्णालयात अॅडमिट करण्यात आले होते. राजीव शुक्ला असे पीडित व्यक्तीचे नाव आहे. प्रयागराजमधील रहिवाशी असलेल्या राजीव शुक्ला मुंबईतील वरळी येथे कामानिमित्त आले होते. […]
Adani Group : काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) सातत्याने भाजपवर अदानी-अंबानीची सरकार म्हणून टीका करत असतात. परंतु आता काँग्रेसचं सरकार असलेल्या राज्यात अदानी समूहाने 12400 कोटी रुपयांची गुंतवणूक करण्याचा निर्णय घेतला आहे. तेलंगणा सरकार आणि अदानी समूह (Adani Group) यांच्यात चार सामंजस्य करारही करण्यात आले आहेत. दावोस येथे सुरू असलेल्या वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमदरम्यान तेलंगणाचे […]
Kulbhushan Jadhav : इराणने मंगळवारी पाकिस्तानातील जैश अल-अदल या दहशतवादी संघटनेवर हवाई हल्ले केले. जैश अल-अदल सीमेपलीकडून इराणमध्ये दहशतवादी कारवाई घडवून आणत होता. याच संघटनेने भारतीय नागरिक कुलभूषण जाधव (Kulbhushan Jadhav) यांचे अपहरण केले होते. जैश अल-अदलच्या सदस्यांनीच कुलभूषण जाधव यांचे इराणमधून अपहरण केले होते, त्यानंतर त्यांना आयएसआय या दहशतवादी संघटनेच्या ताब्यात देण्यात आले होते. […]
Mumbai-Bangalore flight : स्पाइसजेट एअरलाइन्सच्या (SpiceJet Airlines) मुंबई-बंगळुरू फ्लाइटमधील (Mumbai-Bangalore flight) एक प्रवासी 1.30 तास टॉयलेटमध्ये अडकल्याची धक्कादायक घटना घडली आहे. तांत्रिक बिघाडामुळे टॉयलेटचे गेट न उघडल्याने प्रवाशाला बाहेर पडता आले नाही. विमान बंगळुरूच्या केम्पागौडा आंतरराष्ट्रीय विमानतळावर उतरले तेव्हा ग्राउंड स्टाफने टॉयलेटचा दरवाजा तोडून प्रवाशाला बाहेर काढले. लँडिंगच्या वेळीही टॉयलेटमध्ये अडकल्यामुळे पीडित मुलगी खूपच घाबरली […]
Ayodhya Ram Mandir : अयोध्येत राम मंदिराच्या (Ayodhya Ram Mandir) प्राणप्रतिष्ठा सोहळ्याची जोरदार तयारी सुरु आहे. या सोहळ्यासाठी देशभरातून भाविक जमा होत आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्या हस्ते प्राणप्रतिष्ठा होणार आहे. परंतु या प्राणप्रतिष्ठा सोहळ्यावर बंदी घालण्याची मागणी करणारी जनहित याचिका उच्च न्यायालयात दाखल करण्यात आली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार्या […]
Rohit Sharma : अफगाणिस्तानविरुद्धच्या (IND vs AFG) टी-20 मालिकेत एकही धावा करता न आल्यामुळे रोहित शर्मावर (Rohit Sharma) टीका होत आहे. मात्र, माजी क्रिकेटपटू आकाश चोप्राने (Akash Chopra) रोहित शर्मावर पूर्ण विश्वास व्यक्त केला आहे. रोहित शर्मा जेव्हाही आक्रमक क्रिकेट खेळतो तेव्हा तो अधिक चांगली कामगिरी करतो, असे आकाश चोप्राचे मत आहे. रोहित शर्मा 14 […]
Passenger Hits Pilot : दिल्ली-गोवा इंडिगो 6E-2175 फ्लाइटमध्ये (Delhi-Goa Indigo Flight) एक घक्कादायक घटना घडली होती. फ्लाइटच्या उड्डाणाला 10 तास उशीर लागल्याने एका प्रवाशाने पायलटला (Passenger Hits Pilot) कानाखाली मारली होती. या घटनेचा व्हिडिओ सोशल मिडियावर व्हायरल झाला होता. साहिल कटारिया असे मारहाण करणाऱ्या व्यक्तीचे नाव होते. परंतु या घटनेला एअरलाइनचे गैरव्यवस्थापन जबाबदार असल्याचे एका […]
YS Sharmila : वायएसआर तेलंगणा पक्ष काँग्रेसमध्ये विलीन केल्यानंतर वाय.एस. शर्मिला (YS Sharmila) यांच्याकडे काँग्रेस हायकमांडने मोठी जबाबदारी सोपवली आहे. त्यांची आंध्र प्रदेश काँग्रेसच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. आंध्रचे विद्यमान मुख्यमंत्री जगन मोहन रेड्डी (YS Jagan Mohan Reddy) यांच्या त्या बहीण आहेत. वाय.एस. शर्मिला यांनी 4 जानेवारी रोजी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. तेव्हापासून त्यांच्याकडे […]
Sujay Vikhe : गेल्या काही दिवसांपासून नगर लोकसभेसाठी (Ahmednagar Loksabha) वेगवेगळ्या नावांची चर्चा सुरु आहे. भाजपकडून खासदार सुजय विखे यांची उमेदवारी निश्चित मानली जात आहे. त्यांच्यासमोर महाविकास आघाडीकडून अद्याप उमेदवार फायनल झालेला नाही. त्यामुळे विखेंविरोधात कोण याची उत्सुकता राजकीय वर्तुळात आहे. संदर्भात खासदार सुजय विखे (Sujay Vikhe) म्हणाले की उमेदवार सर्व क्षेत्रातील जाण आणि अभ्यासू […]